स्वर्णगौरी व्रत

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
गौरी हब्बा

स्वर्णगौरी व्रत हे महिलांचे एक धार्मिक व्रत आहे.कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा या प्रांतात भाद्रपद महिन्याच्या शुक्ल तृतीया तिथीला महिला हे व्रत करतात. या व्रताला गौरी हब्बा असेही नाव आहे.[१]

महत्त्व

पार्वती देवीच्या पूजेशी जोडले गेलेले हे व्रत आहे. पार्वती एक दिवस आपल्या माहेरी येते आणि दुस्या दिवशी आपल्या घरी म्हणजे कैलास पर्वतावर परत जाते अशी या व्रताच्या मागील धारणा आहे.

स्वरूप

हळदी कुंकू

विवाहित महिला वैवाहिक सुखासाठी हे व्रत करतात आणि अविवाहित मुली भावी सुखी आयुष्यासाठी हे व्रत करतात. या दिवशी देवी पार्वतीची पूजा केली जाते आणि उपवास केला जातो. विवाहित महिलांच्या माहेराहून त्यांच्यासाठी पूजासाहित्य , पोशाख पाठविले जातात. ते परिधान करून महिला देवीची पूजा करतात.[१] पार्वती देवीची मातीची मूर्ती तयार करून तिची पूजा केली जाते. १६ गाठींच्या दोरकाचे पूजन्ही या दिवशी करतात. या व्रतात घरातील सोन्याची, सोन्याच्या दागिन्यांची ही पूजा करण्याची पद्धती प्रचलित आहे.[२]

हे ही पहा

हरितालिका

संदर्भ