Jump to content

हमें तुमसे प्यार कितना (गीत)

मराठीपिडिया कडून
किशोर कुमार यांच्या आवाजातील गीत आजही लोकप्रिय आहे

साचा:माहितीचौकट गाणे

हमें तुमसे प्यार कितना हे हिंदी गीत आहे जे मजरूह सुलतानपुरी यांनी लिहले होते, तर संगीत राहुलदेव बर्मन यांनी दिले होते. १९८१ च्या "कुदरत" या हिंदी चित्रपटासाठी सारेगामा म्युझिक लेबल अंतर्गत हे गाणे तयार केले गेले.

किशोर कुमार आणि परवीन सुलताना यांनी हे गाणे चित्रपटात स्वतंत्रपणे गायले होते. राग भैरवीमध्ये हे गाणे रचले गेले.[]

भारतीय संगीतक्षेत्रात या गाण्याला मानाचे स्थान आहे. प्रदर्शित झाल्यापासून आजही हे गाणे खूप लोकप्रिय आहे. सुलताना यांना फिल्मफेअर पुरस्कार या गाण्यासाठी मिळाला होता.

चित्रपटात सादरीकरण[संपादन | स्रोत संपादित करा]

कुदरत चित्रपटात हे गाणे दोन वेळा ऐकवले गेले. पहिल्यांदा परिवीन सुलताना यांच्या आवाजात, तर किशोर कुमार यांच्या आवाजात दुसऱ्यांदा गाणे ऐकवले गेले.

राजेश खन्ना आणि हेमा मालिनी यांच्यावर हे गाणे चित्रित केले गेले.

लोकप्रियता[संपादन | स्रोत संपादित करा]

भारतीय संगीतक्षेत्रात या गाण्याला मानाचे स्थान आहे. प्रदर्शित झाल्यापासून आजही हे गाणे खूप लोकप्रिय आहे.

पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]

सुलताना यांना फिल्मफेअर पुरस्कार या गाण्यासाठी मिळाला होता. किशोर कुमारांना या फिल्मफेअर पुरस्काराचे नामांकन मिळाले होते.

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी