होरेस हेमॅन विल्सन

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
होरेस विल्सन

होरेस हेमॅन विल्सन (२६ सप्टेंबर, १७८६ - ८ मे, १८६०) हा इंग्लिश ओरिएंटलिस्टसाचा:मराठी शब्द सुचवा होता. त्यांनी सेंट थॉमसच्या हॉस्पिटलमध्ये वैद्यकशास्त्राचा अभ्यास केला आणि १८०८ साली भारतात ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या वतीने बंगाल येथे सहायक-शल्य चिकित्सक म्हणून रुजू झाले. त्यांचे धातुविज्ञानविषयक ज्ञानमुळे त्यांना कलकत्त्यातील टाकसाळीत रस घेतला, तेथे ते जॉन लेडनच्या संपर्कात आले.

विल्सनना भारतीय प्राचीन भाषेत व साहित्यात रुची आली आणि ते हेन्री थॉमस कोलेब्रुकच्या विनंती वरून १८११ मध्ये ते बंगालच्या एशियाटिक सोसायटीचे सचिव म्हणून नियुक्त झाले. १८१३ साली त्यांनी संस्कृत भाषेतील कालिदासच्या मेघदूत काव्याचे इंग्लिशमध्ये भाषांतर केले. १८१९ साली त्यांनी पहिला संस्कृत-इंग्रजी शब्दकोश तयार केला.[१] या विल्सनच्या शब्दकोशाचे पुढील काम रुडॉल्फ रोथओटो फोन बोह्त्लिंगक या जोडीने १८५३ ते १८७६ या काळात केले.

विल्सनना आयुर्वेद आणि पारंपारिक भारतीय वैद्यकीय आणि शस्त्रक्रिया पद्धतींमध्ये मोठा रस होता. कलकत्ता येथील मेडिकल आणि फिजिकल सोसायटीतील त्यांच्या प्रकाशनांमधील कॉलेराकुष्ठरोगाबद्दलचे निरीक्षण नोंदविले आहे.

१८२७ साली विल्सनने प्रकाशित केलेल्या पुस्तकात हिंदूंच्या नाट्यकलेचे स्पष्टीकरण नमूद केले आहे. त्यात भारतीय नाटकांचा संपूर्ण सर्वेक्षण आहे व सहा पूर्ण नाटकांचे व २३ एकांकिकाचे भाषांतर आहे. त्यांचे १८२८ साली प्रकाशित झालेले मॅकेन्झी कलेक्शन हे ओरिएंटल, विशेषतः दक्षिण भारतीय हस्तलिखिते आणि कर्नल कॉलिन मॅकेन्झी यांनी जमवलेल्या पुरातन वास्तू यांचे वर्णनात्मक पुस्तक आहे. विल्सनने पहिल्या बर्मा युद्धावर राजकीय व भौगोलिक भाष्य १८२७ साली प्रकाशित केले. बंगालच्या बाह्य वाणिज्य आढावा या विषयावर त्यांनी १८२७ साली पुस्तक लिहिले. १८४० साली विल्सनने विष्णू पुराणाचे इंग्रजीत भाषांतर केले. १८०५ ते १८३५ सालचा ब्रिटिशांचा भारतातील इतिहास विल्सनने लिहिला.

त्यांनी सार्वजनिक शिक्षण समितीचे सचिव म्हणून अनेक वर्षे काम केले व कलकत्ता येथील संस्कृत महाविद्यालयाचा अभ्यासक्रम अधोरेखीत केला. विल्सन हे शाळांमध्ये इंग्रजी शिकवण्याचा एकमात्र माध्यम बनविण्याच्या विरोधकांपैकी एक प्रमुख विरोधी होते. १८३२ साली ऑक्सफर्ड विद्यापीठाने डॉ. विल्सन यांना संस्कृतच्या आभ्यासासाठी नव्याने स्थापलेल्या विभागाचे पहिले प्रमुख म्हणून निवडले. १८३६ साली त्यांना ईस्ट इंडिया कंपनीत प्रमुख ग्रंथपाल म्हणून नियुक्त करण्यात आले. त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी कॉलेज येथे काही काळ शिकवले. ते कलकत्ता येथील मेडिकल आणि फिजिकल सोसायटीचे सदस्य होते आणि रॉयल एशियाटिक सोसायटीचे संथापक सभासद होते व १८३७ पासून ते त्यांच्या मृत्यू पर्यत निदेशक होते.

८ मे १८६० रोजी विल्सन यांचे निधन झाले. त्यांना लंडन मधील केन्सल ग्रीन कबरस्तानमध्ये दफन केले गेले.

संदर्भ

साचा:संदर्भयादी