Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
झेन - मराठीपिडिया Jump to content

झेन

मराठीपिडिया कडून

साचा:बौद्ध धर्म झेन हा महायान बौद्ध पंथाचा एक उपपंथ आहे. हा चीन आणि जपान देशांतील प्रचलित बौद्ध संप्रदाय आहे. इसवी सनाच्या सहाव्या शतकात चीनमध्ये त्याचा उदय झाला. संस्कृत ‘ध्यान’, पाली ‘ज्झान’, जपानी ‘झेन्ना’ या उच्चारांचे ‘झेन’शी साम्य आहे. समाधी, मनन किंवा चिंतन हा झेनचा मूलभूत अर्थ असून विश्व व मानवी जीवन यांचे वास्तव स्वरूप जाणण्यासाठी विचार केंद्रित करण्याची ती एक पद्धत आहे.

बुद्धत्वाच्या प्राप्तीवर झेनचा भर आहे. सूत्रे आणि सिद्धांतांच्या केवळ ज्ञानास झेन महत्त्व देत नाही तर अनुभवी गुरूच्या मार्गदर्शनाखाली थेट आकलनास हा पंथ महत्त्व देतो. झेनमताचा उपदेश महायान पंथातील योगाचार आणि तथागत गर्भसूत्र या स्रोतांवर आधारलेला आहे.

संस्थापक[संपादन | स्रोत संपादित करा]

झेन बौद्ध धर्माचा पहिला उद्गाता 'बोधीधर्म' याने सहाव्या शतकात चीनमध्ये झेन विकसित केला. विमलकीर्ती या ग्रंथाचा झेन विचारांवर मोठा प्रभाव आहे. झेन हा शब्द 'ध्यान' या शब्दावरून पुढे आला. बुद्धाने ध्यान साधनेची रहस्ये महाकश्यप या आपल्या शिष्याला शिकवली.महाकश्यपाने त्यांचा उपदेश आनंद या शिष्याला केला. या परंपरेतील बोधिधर्म हा शेवटचा म्हणजे २८ वा आचार्य होय. चीन व जपान या देशात बोधिधर्माने झेनचा प्रसार केला. बोधिधर्माच्या गुरूंचे नाव प्रज्ञातर होते.साचा:संदर्भ

तत्त्वज्ञान[संपादन | स्रोत संपादित करा]

जपानी शब्द 'झेन', चीनीमधील 'छाअन' शब्द आणि भारतीय संस्कृतीमधील 'ध्यान' या सगळ्यांचा अर्थ चिंतन असा होतो. बुद्धाला जे कळले ते जाणणे आणि स्वतःच्या मनाची ध्याना-चिंतनामधून मुक्तता करून घेणे हे झेनचे ध्येय असते. झेनमध्ये ताओ, वेदांत आणि योगातील सारगर्भता आहे.साचा:संदर्भ झेनला गुरू आणि शिष्य असतात; काही नियमांशी बांधिलकी असते, पण प्रत्येकाला मोकळीक असते. साटोरी व कोआन ह्या झेन परंपरेतील दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. साटोरी म्हणजे साक्षात्कार व कोआन म्हणजे कूटप्रश्न किंवा सूत्र होय.साचा:संदर्भ

गुरू शिष्य परंपरा[संपादन | स्रोत संपादित करा]

गुरू शिष्य परंपरेला झेनमध्ये महत्त्वाचे स्थान आहे. साक्षात्कार हे झेनचे इप्सित असते. सर्व शिष्यांना ध्यान विहाराचे नियम गुरुकुलाप्रमाणे पाळावे लागतात. विद्यार्थ्यांना विचार करण्यासाठीकाही प्रश्न दिले जातात, त्यांना कोआन म्हणतात.

चहापान विधी[संपादन | स्रोत संपादित करा]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
चहापानविधी

झेन मध्ये चहा आणि चहापानाच्या कलेलाही महत्त्व आहे. कारण, एकदा बोधिधर्म ध्यान करीत असताना झोपी गेले व त्यामुळे नंतर तो स्वतःवर इतका चिडले की त्यांनी स्वतःच्या पापण्याच कापून टाकल्या. त्या जमिनीवर पडल्या आणि त्यातून चहाचे पहिले रोपटे उगवले. चहापानाच्या विधीला झेन मध्ये एक स्वतंत्र स्थान आहे. चहा अतिशय समारंभपूर्वक बनवला जाई आणि शिष्यांना दिला जाई. या चहापानाच्या विधीशिवाय इतर कुठलेही कर्मकांड झेन मध्ये नाही.[१]

प्रसार[संपादन | स्रोत संपादित करा]

बौद्ध धर्माचे सार बोधिधर्म या प्रसिद्ध झेन भिक्खूकडून इ.स. ५२० मध्ये भारतातून चीनमध्ये नेले गेले. शांत अशा (ध्यान) स्थितीतील बोधिधर्माकडून साक्षात्काराचे ज्ञान हे उत्तराधिकाऱ्यांना दिले गेले आणि त्या पद्धतीने ते पुढच्या पिढ्यांना मिळत राहिले. अशा प्रकारे झेनचा चीनमध्ये प्रसार झाला, तेथे तो रुजला आणि चीनमधून यथावकाश तो जपानमध्ये पसरला. इसवी सनाच्या सातव्या शतकाच्या शेवटी शेवटी जपानमध्ये झेनचा प्रसार होवू लागला. येईसाई नावाचा जपानी भिक्खू चीनमध्ये जाऊन झेनचे शिक्षण घेऊन आला. त्याने इ.स. ११९१ मध्ये क्योतो शहरात एका ध्यान विहाराची स्थापना केली. जपानचे जीवन, कला, साहित्य, आचरण, नीतीतत्त्वे या साऱ्यांवर झेनचा प्रभाव पडलेला आढळतो.[२]

हाइकू[संपादन | स्रोत संपादित करा]

जपानी कला, काव्य, कुंभारकाम यावर झेनचा लोभस असा ठसा दिसतो. कुठलीही निश्चित दिशा सूचित न करणारे जीवन ही कल्पना बहुतेक काव्यात आणि चित्रात दिसते. यातून जीवनाचे सहजपणे व्यक्त होते. हाइकू म्हटले तर झेन मधून स्फुरलेली काव्यशाखा बाशो (१६४३-१६९४) या कलाकारामुळे हाइकू हा काव्यप्रकार रुळला. यात कमीतकमी शब्दात विचार वाचकांपर्यंत पोचवले जातात. उदा. एक खाली पडलेलं फूल झाडावरती परतलं? ते तर होतं फुलपाखरू !

साहित्यावर प्रभाव[संपादन | स्रोत संपादित करा]

'नोह' नाटके ही झेन कथाच आहेत. झेन हे चैतन्य फक्त शांती आणि समाज यांच्यापुरते मर्यादित नाही तर त्याचा अर्थ होतो - कला आणि काम यांना समर्पण, समाधानाचे उत्कट अवस्था, आंतरिक सौदर्याचा आविष्कार, अस्पर्शनीय अशी अपूर्णतेची मोहकता.

हे सुद्धा पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

साचा:बौद्ध विषय सूची

  1. ↑ झेन, पांडे सुरुची (२००१) ग्रंथाली प्रकाशन
  2. ↑ झेन, पांडे सुरुची (२००१)