रिपब्लिकन सेना
Appearance
रिपब्लिकन सेना हा एक राजकीय पक्ष आहे.[१][२][३] याची स्थापना आनंदराज आंबेडकर यांनी २१ नोव्हेंबर १९९८ रोजी केली. आनंदराज आंबेडकर हे यशवंत आंबेडकर यांचा मुलगा आणि बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत.[४][५] हा पक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर विचारधारेवर अर्थात आंबेडकरवादाच्या आधारित आहे. हा पक्ष प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात आहे.[६][७][८][९][१०][११] रिपब्लिकन सेनेच्या समर्थकांनी २०११ मध्ये दादर, मुंबई येथे इंदू मिलच्या जागेवर कब्जा केला होता. आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची (समानतेचा पुतळा) दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागणीवर प्रकाश टाकला.[११][१२] प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात वंचित बहुजन आघाडी बरोबरही पक्षाने काम केले आहे.[१][२][३]