प्रकाश आंबेडकर

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट पदाधिकारी

प्रकाश यशवंत आंबेडकर ( १० मे, १९५४), बाळासाहेब आंबेडकर नावाने लोकप्रिय, हे भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते व वकील आहेत. ते भारिप बहुजन महासंघ या राजकीय पक्षाचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आहेत.[१] आंबेडकर हे दोनदा लोकसभा व एकदा राज्यसभा असे एकूण तीन वेळा संसदचे सदस्य (खासदार) राहिलेले आहेत.[२] २०१८ मध्ये त्यांनी सुमारे १०० लहान-मोठ्या राजकीय पक्षांना एकत्र घेत वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाची स्थापना केली.

सुरुवातीचे जीवन व शिक्षण

प्रकाश आंबेडकर यांचा जन्म १० मे १९५४ रोजी बॉम्बे स्टेट (सध्याचे मुंबई) मध्ये झाला. त्यांचे प्रकाश हे नाव त्यांचे आजोबा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ठेवलेले आहे. इ.स. १९७२ मध्ये ते मुंबईतील सेंट स्टॅनीसलायस हायस्कूल मधून दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यानंतर इ.स. १९७८ मध्ये त्यांनी सिद्धार्थ कला महाविद्यालयामधून बी.ए. पदवीचे शिक्षण पूर्ण केले. पुढे इ.स. १९८१ मध्ये त्यांनी सिद्धार्थ विधी महाविद्यालयाामधून त्यांनी एलएलबी पदवी मिळवली.[३]

कारकीर्द

भारिप बहुजन महासंघ

साचा:मुख्य इ.स. १९९४ पूर्वी प्रकाश आंबेडकर हे भारतीय रिपब्लिकन पक्षात कार्यरत होते. त्यांनी ४ जुलै १९९४ रोजी भारिप बहुजन महासंघ या राजकीय पक्षाची स्थापना केली.[४] हा पक्ष बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा लाभलेल्या भारतीय रिपब्लिकन पक्षाचा एक गट होता.[५] १९९३-९४ च्या काळात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि शिवसेना-भारतीय जनता पक्ष या राजकीय पक्षांना मात देण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी भारतीय रिपब्लिकन पक्षाची वेगळ्या पद्धतीने बांधणी करून 'अकोला पॅटर्न' राबविला आणि जिल्हा परिषदसारख्या स्थानिक स्वराज राजकारणात प्रभाव निर्माण केला. त्यानंतर १९९५ च्या आसपास याचा विस्तार करत काही दलितेतर पक्ष आणि संघटनांना सामील करून घेऊन 'भारिप-बहुजन महासंघाची' मोट बांधली.[६]

या पक्षाचे महाराष्ट्राच्या विधानसभांवरील निवडूण आलेले उमेदवार[७]

  • इ.स. २०१४ मध्ये, १३व्या विधानसभेवर एक सदस्य निवडूण गेला होता — बळीराम सिरस्कार (बाळापूर).[८]
  • इ.स. २००९ मध्ये, १२व्या विधानसभेवर एक सदस्य निवडूण गेला होता — हरिदास पंढरी भदे (अकोला पूर्व).[९]
  • इ.स. २००४ मध्ये, ११व्या विधानसभेवर एक सदस्य निवडूण गेला होता — भडे हरिदास पंढरी (बोरगाव मंजू).[१०]
  • इ.स. १९९९ मध्ये, १०व्या विधानसभेवर तीन सदस्य निवडूण गेले होते — रामदास मणिराम बोडखे (अकोट), दशरथ मोतीराम भांडे (बोरगाव मंजू) आणि, वसंत धोडा सूर्यवंशी (साक्री).[११]

संसद सदस्य

प्रकाश आंबेडकर हे इ.स. १९९० ते १९९६ दरम्यान राज्य सभेचे सदस्य (खासदार) होते.[१२][१३] ते अकोला लोकसभा मतदारसंघातून इ.स. १९९८ (ते १९९९ पर्यंत) मध्ये भारतीय रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार १२व्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडूण आले, त्यानंतर याच मतदारसंघातून ते दुसऱ्यांदा इ.स. १९९९ (ते २००४ पर्यंत) मध्ये भारिप बहुजन महासंघ पक्षाचे उमेदवार म्हणून १३व्या लोकसभा निवडणुकीमध्ये निवडूण आले.[१४][१५] आंबेडकर हे १२व्या व १३व्या लोकसभा निवडणुकांमध्ये सलग दोन वेळा संसद सदस्य (खासदार) म्हणून निवडून आले होते.[१६][१७]

"महाराष्ट्र बंद"चे आवाहन

१ जानेवारी २०१८ रोजी, पुणे जिल्ह्यातील कोरेगाव भिमा येथे झालेल्या हिंसाचारास येथील "जय स्तंभा"ला मानवंदना देण्यासाठी गेलेल्या बौद्ध, अनुसूचित जाती व ओबीसी लोकांवर हिंदुत्ववादी लोकांकडून हल्ला करण्यात आला होता. आंबेडकरांनी या हिंदुत्ववादी लोकांची माथी भडकल्याचा आरोप संभाजी भिडे व मिलींद एकबोटे या दोघांवर ठेवला आणि दोघांची पोलीस चौकषी व कडक कारवाईची मागणी केली. महाराष्ट्र शासन व पोलीस यंत्रणा दोषींवर काहीही कारवाई करत नाही म्हणून त्यांनी ३ जानेवारी २०१८ रोजी महाराष्ट्रीय जनतेस "महाराष्ट्र बंद"चे आवाहन केले. या बंदास लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आणि तो यशस्वी ठरला, मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात बंद पाळण्यात आला होता. त्यानंतर नव्याने प्रकाश आंबेडकर हे आंबेडकरवादी व बहुजन समाजाच्या केंद्रस्थानी आले. विशेषतः तरूण वर्ग त्यांचा समर्थक बनला.[१८][१९]

वंचित बहुजन आघाडी

साचा:मुख्य आंबेडकर यांनी २०१८ मध्ये वंचित बहुजन आघाडी या राजकीय पक्षाची स्थापन केली.[२०] जवळजवळ १०० लहान राजकीय पक्ष व सामाजिक संघटना बहुजन वंचित आघाडी सोबत आहेत.[२१] ह्या पक्षाने, एआयएमआयएम या मित्रपक्षासह सन २०१९ मधील, १७व्या लोकसभा निवडणूकीमध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण ४८ जागा लढवल्या होत्या. एआयएमआयएमचा एकमेव उमेदवार निवडूण आला मात्र वंबआचे सर्व उमेदवार पराभूत झाले. बऱ्यांच उमेदवारांवर १ लाखांवर मते घेतली होती.[२२][२३] प्रकाश आंबेडकर हे अकोल्यासह सोलापुर मतदारसंघातून उभे होते, परंतु त्यांचा दोन्ही जागेवर पराभव झाला.[२४]

१४ मार्च २०१९ रोजी, प्रकाश आंबेडकरांनी भारिप बहुजन महासंघ पक्षाला वंचित बहुजन आघाडी या पक्षात विलीन करण्याचे जाहीर केले. आंबेडकर म्हणाले की, "भारिप बहुजन महासंघाच्या माध्यमातून सामाजिक अभियांत्रिकीचा 'अकोला पॅटर्न'ला यश मिळाले असले तरी भारिप या शब्दामुळे पक्षाच्या विस्ताराला मर्यादा आल्यात." त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ही व्यापक अर्थाने स्वीकारार्ह झाली असल्याने २०१९ च्या १७व्या लोकसभा निवडणुकीनंतर वंचित बहुजन आघाडीमध्ये भारिप बहुजन महासंघ विलीन करणार असल्याचे त्यांनी सांगीतले.[२५][२६][२७][२८]

वैयक्तिक जीवन

कुटुंब

प्रकाश आंबेडकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकररमाबाई आंबेडकर यांचे थोरले नातू आहेत. त्यांचे वडीलांचे नाव यशवंत आंबेडकर (भैयासाहेब) व आईचे नाव मीराबाई आंबेडकर आहे. आंबेडकर कुटुंब हे बौद्ध धर्मीय आहे. त्यांना धाकटे दोन भाऊ व एक बहीण आहे – भीमराव आंबेडकर, आनंदराज आंबेडकर व रमाबाई आंबेडकर. रमाबाई ह्या आनंद तेलतुंबडे यांच्या पत्नी आहेत. प्रकाश आंबेडकर यांचा विवाह २७ नोव्हेंबर १९९३ रोजी चित्पावन ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या अंजली मायदेव यांच्याशी झाला.[२९] अंजली आंबेडकर ह्या निवृत्त प्राध्यापिका आहेत. प्रकाश व अंजली या दाम्पत्यांना सुजात नावाचा एकुलता एक मुलगा आहे. आंबेडकरांना सामाजिक व राजकीय कार्यांमध्ये त्यांची पत्नी व मुलगा मदत करीत असतात.[३०]

संपत्ती

मार्च २०१९ मध्ये, लोकसभा उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रकाश आंबेडकरांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार, त्यांच्या नावे ४१.८१ लाख रूपयांची संपत्ती आहे. त्यांची पत्नी अंजली आंबेडकर यांच्या नावे ७३.८६ लाख रूपये तर मुलगा सुजात यांच्या नावे ९.५५ लाख रूपये इतकी संपत्ती आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या नावे एकही वाहन नाही.[३][३१][३२]

लेखन साहित्य

प्रकाश आंबेडकर यांनी अनेक पुस्तके लिहीली आहेत. त्यापैकी काही खालीलप्रमाणे:

  • आंबेडकरी चळवळ संपली आहे[३३]
  • अंधेरी नगरी चौपट राजा
  • महाराष्ट्राचा उद्याचा मुख्यमंत्री वारकरी आणि वारकरीच
  • कॅन इट बी स्टॉप्ड![३४]
  • राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक भष्टाचार[३५]
  • ऐतिहासिक आंबेडकर भवनाचा वारसा आपण जपणार की नाही??[३६]

त्यांच्यावरील पुस्तके

  • प्रकाशपर्व (डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांचं चरित्र, लेखक उमेश चव्हाण)

हे सुद्धा पहा

संदर्भ

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे

साचा:डॉ. बाबासाहेब आंबेडकर

  1. साचा:संकेतस्थळ स्रोत
  2. https://parliamentofindia.nic.in/ls/lok13/biodata/13MH19.htm
  3. ३.० ३.१ साचा:संकेतस्थळ स्रोत
  4. The Bharipa Bahujan Mahasangh founded on 4 July 1994 — The constitution of the BBM, page no. 1; Available to the Election Commission of India.
  5. साचा:संकेतस्थळ स्रोत
  6. साचा:संकेतस्थळ स्रोत
  7. साचा:संकेतस्थळ स्रोत
  8. साचा:संकेतस्थळ स्रोत
  9. साचा:संकेतस्थळ स्रोत
  10. साचा:संकेतस्थळ स्रोत
  11. साचा:संकेतस्थळ स्रोत
  12. साचा:संकेतस्थळ स्रोत
  13. साचा:संकेतस्थळ स्रोत
  14. साचा:संकेतस्थळ स्रोत
  15. साचा:संकेतस्थळ स्रोत
  16. साचा:संकेतस्थळ स्रोत
  17. https://www.parliamentofindia.nic.in/ls/lok13/biodata/13MH19.htm
  18. साचा:संकेतस्थळ स्रोत
  19. साचा:संकेतस्थळ स्रोत
  20. साचा:संकेतस्थळ स्रोत
  21. साचा:संकेतस्थळ स्रोत
  22. साचा:स्रोत बातमी
  23. साचा:संकेतस्थळ स्रोत
  24. साचा:संकेतस्थळ स्रोत
  25. साचा:संकेतस्थळ स्रोत
  26. साचा:संकेतस्थळ स्रोत
  27. साचा:संकेतस्थळ स्रोत
  28. साचा:संकेतस्थळ स्रोत
  29. साचा:संकेतस्थळ स्रोत
  30. साचा:संकेतस्थळ स्रोत
  31. साचा:संकेतस्थळ स्रोत
  32. साचा:संकेतस्थळ स्रोत
  33. https://maharashtradesha.com/prakash-ambedkar-comment-on-congress-nap/
  34. साचा:Cite book
  35. साचा:Cite book
  36. साचा:संकेतस्थळ स्रोत