Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
रामप्पा मंदिर - मराठीपिडिया

रामप्पा मंदिर

ImportMaster (चर्चा | योगदाने)द्वारा २३:५०, १ मे २०२२चे आवर्तन
(फरक) ←मागील आवृत्ती | सध्याची आवृत्ती (फरक) | नविनतम आवृत्ती→ (फरक)

रामप्पा मंदिर ह्या मंदीराला काकतीय रुद्रेश्वर (रामप्पा) मंदीर (Ramappa Temple) असेहा संबोधतात. हे मंदीर तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यातील व्यंकटापूर मंडळातील पालमपेट ह्या ठिकाणी हे मंदीर वसलेले आहे. हे मंदीर मुलुगुपासून १५ किमी (९.३ मैल), वरंगलपासून ६६ किमी (४१ मैल), हैदराबादपासून २०९ किमी (१३० मैल) अंतरावर आहे. हे एक शिव मंदीर आहे. शिवाच्या रुद्रेश्वर अवताराची इथे पुजा केली जाते. महाशिवरात्री हा मुख्य उत्सव साजरा केला जातो. हे १३ व्या शतकातील काकतीय राजवटीत बनवलेले एक शिव मंदीर आहे. २०२१ मध्ये ह्या मंदीराचा जागतिक वारसा स्थळांच्या (युनेस्को जागतिक वारसा स्थळ- UNESCO World Heritage Site) यादीत समावेश करण्यात आले.[][]

इतिहास संपादन

जागतिक वारसा असलेले हे मंदीर १३ व्या शतकातील आहे. मंदीरातील एका शिलालेखानुसार काकतीय घरण्यातील राजा महाराजा गणपती देव यांच्या कल्पनेतून ह्या मंदीराची उभारणी झाली आहे. त्यांचा सेनापती रुद्र देव याने १२१३ मध्ये हे मंदीर बांधण्यास घेतले, त्यासाठी त्याने कर्नाटकामधून रामप्पा ह्या कुशल कारागिरास बोलवले. चालुक्य आणि होयसळ स्थापत्य शैलीत प्रभुत्व मिळवलेल्या रामप्पा हे मंदिर इतके सुंदर घडवीले की हे मंदिर रुद्र देवाच्या नावानं न ओळखले जाता रामाप्पाच्या नावाने ओळखले जाऊ लागले. शिलालेखानुसार मंदिर पूर्ण व्हायला चाळीस वर्षे लागली. मंदीराच्या गर्भगृहात शिवलिंगाची स्थापना केली आहे त्याची भगवान रुद्रेश्वर किंवा रामलिंगेश्वर या दोन्ही नावांनी पूजा केली जाते. [] हे भारतातील एकमेव असे मंदीर आहे की त्याचे नाव हे मंदीरातील विराजमान देवाच्या नावाऐवजी ते मंदीर बांधणाऱ्याच्या नावावर आहे.

इटालियन प्रवासी मार्को पोलोने भारतात काकतिया साम्राज्याच्या भेटीदरम्यान त्यांने या मंदिराला भेट दिली होती, मार्को पोलो या मंदिराच्या स्थापत्य सौंदर्याने इतका प्रभावित झाला होता आणि त्याने कथितपणे मंदिराला "मंदिरांच्या आकाशगंगेतील सर्वात तेजस्वी तारा" असे संबोधले.[] रामप्पा मंदिर आहेत इतके सुंदर.

वर्णन संपादन

रामाप्पा मंदिर ६ फूट (१.8 मीटर) उंच तारेच्या आकाराच्या व्यासपीठावर भव्यपणे उभे आहे. गर्भगृहासमोरील सभामंडपात असंख्य कोरीव खांब आहेत ज्यांना प्रकाश आणि अवकाश यांचा अद्भूत संयोजन करणारा प्रभाव निर्माण करण्यासाठी स्थान दिले आहे. मुख्य रचना लालसर वाळूच्या दगडात आहे, परंतु बाहेरील गोल स्तंभांमध्ये काळ्या बेसाल्टचे मोठे कंस आहेत जे लोह, मॅग्नेशियम आणि सिलिका यांनी समृद्ध आहे. ज्यांच्यावर पौराणिक प्राणी, स्त्री नृत्यमुद्रेची, सुरसुंदरींची, मदनिका व अप्सरांची अशी विविध शिल्पे कोरलेली आहेत आणि ही काकतीय कलेची उत्कृष्ट नमुने आहेत, त्यांच्यावरील नाजूक कोरीव काम, कामुक मुद्रा आणि लांबलचक शरीरे आणि डोके यांच्यासाठी उल्लेखनीय आहेत. मंदिराच्या मंडोवरावर महाभारत आणि रामायणातील प्रसंग कोरलेले आहेत. मुख्य मंदिरासमोर असलेली नंदीची एक विशाल एकपाषाणी काळी कुळकुळीत मूर्ती आहे जवळजवळ नऊ फूट उंचीची ही नंदीची मूर्ती सुस्थितीत आहे. मुख्य मंदिराच्या दोन्ही बाजूला दोन लहान शिव मंदिरे आहेत.

रामाप्पा मंदिराच्या गर्भगृहाच्या द्वारशाखेवर भगवान शिवाच्या नृत्यमुद्रा कोरलेल्या आहेत ती शिल्पे पाहूनच प्रख्यात कुचिपुडी नर्तक आणि कुलगुरू श्री नटराज रामकृष्णन यांनी लोकांच्या विस्मृतीत गेलेली पेरिनी शिवतांडवम (पेरिनी नृत्य)चे पुनरुज्जीवन केले. जयापा सेनानी यांनी नृत्य रथनावलिडमध्ये लिहिलेली नृत्याची मुद्राही या शिल्पांमध्ये दिसते. गाभाऱ्या बाहेरील मंडपात कोरीव खांब आहेत त्यातल्या एका खांबावर एकाच पाषाणातून कोरलेली कृष्णलीला आहे. [] वारंवार युद्धे, लूट आणि विध्वंस आणि नैसर्गिक आपत्तींनंतरही मंदिर अबाधित राहिले. १७ व्या शतकात मोठा भूकंप झाला ज्यामुळे काही नुकसान झाले. पाया घालण्याच्या 'सँडबॉक्स तंत्रा'मुळे ते भूकंपापासून वाचले.[] जवळजवळ सर्व पुरातन मंदीरे ही त्यांच्या बांधणीत वापरण्यात आलेल्या जड दगडामुळे मोडकळास निघाले आहेत, परंतु ह्या मंदीराच्या बांधकामात वापरण्यात आलेला दगड हा हलका असल्यामुळे हे मंदीर अबाधित आहे.[]

स्थान संपादन

हे मंदीर तेलंगणातील मुलुगु जिल्ह्यातील व्यंकटापूर मंडळातील पालमपेट ह्या ठिकाणी हे मंदीर वसलेले आहे. हे मंदीर मुलुगुपासून १५ किमी (९.३ मैल), वारंगलपासून ६६ किमी (४१ मैल), हैदराबादपासून २०९ किमी (१३० मैल) अंतरावर आहे.

गुगल मॅपवर रामप्पा मंदीर

चित्रदालन संपादन

हे देखील पहा संपादन

संदर्भ संपादन