क्रिकेट विश्वचषक, २०११
साचा:Infobox cricket tournament इ.स. २०११ची आय.सी.सी. क्रिकेट विश्वचषक स्पर्धा फेब्रुवारी १९ ते एप्रिल २, इ.स. २०११च्या दरम्यान भारत, श्रीलंका व बांगलादेशमध्ये खेळवण्यात आली. चौदा देश भाग घेत असलेल्या या स्पर्धेत ५० षटकांचे एक-दिवसीय सामने खेळण्यात आले.[१] फेब्रुवारी १७ रोजी उद्घाटन सोहळा होउन[२] १९ फेब्रुवारीला पहिला सामना साचा:Cr आणि साचा:Crमध्ये ढाका येथे शेर-ए-बांगला मैदानात खेळला गेला.[३] प्रत्येकी सात संघ असलेल्या दोन गटांत साखळी सामने झाल्यावर त्यांतील सर्वोच्च चार-चार संघानी बाद फेरीत भाग घेतला. एप्रिल २ रोजी मुंबईच्या वानखेडे मैदानात खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने श्रीलंकेचा ६ गडी राखून पराभव करीत विश्वविजेतेपद मिळवले. यजमान संघाने विश्वविजेतेपद जिकण्याची ही प्रथमच वेळ आहे.
या विश्वचषकाचे यजमानपद भारत, श्रीलंका आणि बांगलादेश बरोबरच पाकिस्तानलाही मिळणार होते पण २००९मध्ये श्रीलंका क्रिकेट संघावर लाहोरमध्ये झालेल्या जीवघेण्या हल्ल्यानंतर आय.सी.सी.ने पाकिस्तानकडून यजमानपद काढून घेतले[४] आणि संयोजन समितीचे मुख्यालय लाहोरहून मुंबईला हलवण्यात आले.[५] पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आलेले १४ साखळी सामने व एक उपांत्य सामना इतर यजमान देशांत खेळण्यात आले.[६] पैकी आठ सामने आणि उपांत्य फेरी भारत तर चार साखळी सामने आणि दोन साखळी सामने प्रत्येकी श्रीलंका आणि बांगलादेशात खेळले गेले.[७]
या स्पर्धेत साचा:Crने साचा:Crचा केलेला पराभव सगळ्यात मोठा धक्कादायक निकाल होता.[८] आयर्लंडच्या केव्हिन ओ'ब्रायनने ६३ चेंडूत ११३ धावा काढीत विश्वचषकांतील सर्वात वेगवान शतक ठोकण्याचा मॅथ्यू हेडनचा विक्रम आपल्या नावावार करून घेतला.[९] श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानने स्पर्धेत सर्वात जास्त ५०० धावा काढल्या तर भारताच्या झहीर खान आणि पाकिस्तानच्या शहीद आफ्रिदीने प्रत्येकी सगळ्यात जास्त बळी (२१) मिळवले. युवराजसिंग स्पर्धावीर ठरला.
पात्रता[संपादन | स्रोत संपादित करा]
आयसीसी नियमा प्रमाणे, १० पूर्ण सदस्य स्पर्धेस पात्र आहेत.[१०] तसेच २००९ मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळवल्या गेलेल्या पात्रता फेरीतून ४ संघ पात्र झाले.
पात्र संघ[संपादन | स्रोत संपादित करा]
- एसीए (४)
- एसीए (२)
- एसीसी (४)
- ईएपी (२)
- ईसीसी (३)
मैदान[संपादन | स्रोत संपादित करा]
स्पर्धेच्या मैदानांची माहिती आयसीसीने २ नोव्हेंबर २०१० रोजी मुंबईत प्रसिद्ध केली. श्रीलंकेत स्पर्धेसाठी दोन नवीन मैदान कॅंडी व हंबन्टोटा येथे बांधण्यात आले.[११]
पंच[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:Main स्पर्धेसाठी १८ पंचाची नियुक्ती करण्यात आली: ५ ऑस्ट्रेलिया, ६ आशिया, ३ इंग्लंड, २ न्यू झीलंड व प्रत्येकी १ दक्षिण आफ्रिका व वेस्ट इंडीज. साचा:Col-begin-small साचा:Col-2
- ऑस्ट्रेलिया
- साचा:Flagicon सायमन टॉफेल
- साचा:Flagicon स्टीव डेव्हिस
- साचा:Flagicon रॉड टकर
- साचा:Flagicon डॅरिल हार्पर
- साचा:Flagicon ब्रुस ऑक्सेंफोर्ड
- न्यू झीलंड
- दक्षिण आफ्रिका
- पाकिस्तान
- भारत
- इंग्लंड
- श्रीलंका
- वेस्ट इंडीज
पारितोषिक रक्कम[संपादन | स्रोत संपादित करा]
क्रिकेट विश्वचषक, २०११ च्या विजेत्याला $ ३० लाख मिळतील, आयसीसीने स्पर्धेसाठी $ १०० लाख ठेवण्याचे जाहीर केले. हा निर्णय २० एप्रिल २०१० रोजी दुबईत झालेल्या आयसीसी बोर्ड मिटींग मध्ये घेण्यात आला.[१२][१३]
चिन्ह[संपादन | स्रोत संपादित करा]
स्पर्धेचा प्रतिनिधी[संपादन | स्रोत संपादित करा]
स्टंपी[१४] हा क्रिकेट विश्वचषक, २०११ स्पर्धेचा अधिकृत प्रतिनिधी आहे. त्याला सर्व प्रथम प्रदर्शित कोलंबो, श्रीलंका येथे झालेल्या कार्यक्रमात २ एप्रिल २०१० रोजी करण्यात आले. तो एक १० वर्षाचा तरूण हत्ती आहे, तो खूप निश्चयी तसेच जोशपूर्ण आहे. त्याचे नाव ठरवण्यासाठी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.[१५] अधिकृतपणे नावाची घोषणा २ ऑगस्ट २०१० रोजी करण्यात आली.[१६]
अधिकृत गाणे[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:Main क्रिकेट विश्वचषक, २०११ चे अधिकृत गाणे "दे घुमा के", शंकर-एहसान-लॉय ह्या त्रिकुटाने रचले आहे. हे गाणे हिंदी, बांगला व सिंहलीज भाषेत गायलेले आहे.[१७] हे गाणे शंकर महादेवन आणि दिव्या कुमार ह्यांनी गायलेले आहे. विश्वचषक स्पर्धेच्या उद्घाटन समारोहात हे गाने गायले जाणार आहे.[१८]
प्रक्षेपण[संपादन | स्रोत संपादित करा]
आयसीसीने स्पर्धेचे हक्क ईएसपीएन-स्टार क्रिकेटला २ अब्ज अमेरिकन डॉलरच्या मोबदल्यात विकले. ही स्पर्धा २२० देशात दाखवली जाईल.[१९]
संघ[संपादन | स्रोत संपादित करा]
सर्व संघांनी १९ जानेवारी २०१० पर्यंत १४ खेळाडूंचा संघ जाहीर केला.
सामने[संपादन | स्रोत संपादित करा]
सर्व वेळा भारतीय प्रमाण वेळ (यूटीसी+५:३०), श्रीलंका प्रमाण वेळ (यूटीसी+५:३०) व बांगलादेश प्रमाण वेळ (यूटीसी+६)
साखळी सामने[संपादन | स्रोत संपादित करा]
खालील तक्त्यात:[२०]
- सा = सामने खेळले
- वि = विजयी
- सम = समसमान
- हा = हार
- अणि = अणिर्नित
- नेरर = नेट रन रेट
- गुण = एकुन गुण
प्रत्येक गटातुन पहिले चार संघ उपांत्यपुर्व फेरी साठी पात्र होतील (हिरवा रंग).
| रंग माहिती | |
|---|---|
| पहिले चार संघ उपांत्य फेरी साठी पात्र. | |
| साखळी सामन्यात बाद संघ | |
गट अ[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:Main साचा:2011 Cricket World Cup Group A
गट ब[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:Main साचा:2011 Cricket World Cup Group B साचा:Hidden begin
बाद फेरी[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:Main साचा:क्रिकेट विश्वचषक,२०११ - बाद फेरी
उपांत्य पूर्व फेरी[संपादन | स्रोत संपादित करा]
| २३ मार्च २०११ १४:३० | |||
| साचा:Cr-rt | ११३/० - ११२/१० | साचा:Cr | शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका |
| २४ मार्च २०११ १४:३० | |||
| साचा:Cr-rt | २६१/५ - २६०/६ | साचा:Cr | सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियम, अमदावाद |
| २५ मार्च २०११ १४:३० | |||
| साचा:Cr-rt | १७२/१० - २२१/८ | साचा:Cr | शेर-ए-बांगला क्रिकेट मैदान, ढाका |
| २६ मार्च २०११ १४:३० | |||
| साचा:Cr-rt | २२९/६ - २३१/० | साचा:Cr | रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो |
उपांत्य फेरी[संपादन | स्रोत संपादित करा]
| २९ मार्च २०११ १४:३० | |||
| साचा:Cr-rt | २१७/१० - २२०/५ | साचा:Cr | रणसिंगे प्रेमदासा मैदान, कोलंबो |
| ३० मार्च २०११ १४:३० | |||
| साचा:Cr | २६०/९ - २३१/१० | साचा:Cr-rt | पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान, मोहाली |
अंतिम सामना[संपादन | स्रोत संपादित करा]
| २ एप्रिल २०११ १४:३० | |||
| साचा:Cr-rt | २७४/६ - २७७/४ | साचा:Cr | वानखेडे स्टेडियम, मुंबई |
बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:२०११ क्रिकेट विश्वचषक साचा:क्रिकेट विश्वचषक, २०११ - संघ साचा:क्रिकेट विश्वकप क्रम साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट, २०११ साचा:आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचे भारतीय दौरे
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:Cite
- ↑ Record-breaking O'Brien sees Ireland stun England | Cricket News | Cricbuzz.com
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ Venues of 2011 World Cup by ICC Retrieved on 10 March 2010.
- ↑ Prize Money for ICC Cricket World Cup 2011 confirmed by the ICC. Retrieved on 25 April 2010.
- ↑ क्रिकेट विश्वचषक २०११च्या बक्षिसाची रक्कम Official site.
- ↑ 2011 World Cup mascot to be called 'Stumpy' NDTV Cricket. Retrieved on 2 Aug, 2010.
- ↑ First Look: Mascot for 2011 Cricket World Cup by Rediff Sport. Retrieved on 2 April 2010.
- ↑ ICC to name ICC Cricket World Cup 2011 mascot on 2 August. ICC. Retrieved on 2 Aug, 2010.
- ↑ Shankar-Ehsaan-Loy score a hit with World Cup songसाचा:मृत दुवा Hindustan Times. Retrieved on 9 January 2011.
- ↑ "De ghuma ke... Countdown to World Cup begins today". Indian Express. Retrieved on 9 January 2011.
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ २०११ क्रिकेट विश्वचषक अधिक्रुत संकेतस्थळ. विश्वचषक गुणतालिका. आयसीसी. २६ जुन २०१० रोजी पाहिले