एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट क्रिकेट मैदान

एम. चिन्नास्वामी स्टेडियम (कन्नड: ಚಿನ್ನಸ್ವಾಮಿ ಕ್ರೀಡಾಂಗಣ ; रोमन लिपी: M. Chinnaswamy Stadium) हे भारतातील बंगळूर, कर्नाटक स्थित क्रिकेटचे मैदान आहे. नयनरम्य कब्बन पार्क, क्वीन्स रोड, कब्बन आणि उपनगरीय एम्.जी. रोड यांच्या कवेत आणि बंगळूर शहराच्या मध्यभागी वसलेले हे मैदान सुमारे चार दशके जूने आहे. पूर्वी ते कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA) स्टेडियम म्हणून ओळखले जाई. नंतर एम. चिन्नास्वामी यांना श्रद्धांजली म्हणून त्यांचे नाव मैदानाला देण्यात आले. त्यांनी असोसिएशनची चार देशके सेवा केली तसेच ते १९७७ ते १९८० दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI)चे अध्यक्ष सुद्धा होते. ३८,००० आसनक्षमता[१] असलेले हे मैदान नियमित परणे कसोटी सामने, आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने, प्रथम श्रेणी क्रिकेट सामने आणि त्याच बरोबर इतर सांस्कृतिक आणि संगीत कार्यक्रमांचे आयोजन देखील करते. कर्नाटक राज्य क्रिकेट संघ आणि इंडियन प्रीमियर लीग फ्रंचायसी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ह्या संघांचे ते होम ग्राउंड आहे. मैदानाचे मालकी हक्क कर्नाटक राज्य सरकारकडे आहेत आणि ते सध्या ९९ वर्षांसाठी KSCAला भाडेतत्त्वावर देण्यात आले आहे. चिन्नास्वामी मैदान हे भारतातील आणि कदाचित जगातील पहिले असे मैदान आहे, जेथे मोठ्या प्रमाणावर वीजेचे उत्पादन करण्यासाठी सौर पॅनेल बसवले गेले. KSCA ने "गो ग्रीन" उपक्रमाअंतर्गत हे पॅनेल बसवले.

इतिहास आणि विकास

कर्नाटक सरकारच्या पुढाकाराने मैदानाची कोनशीला १९६९ मध्ये बसविण्यात आली आणि १९७० मध्ये बांधकाम सुरू करण्यात आले. १९७२-७३ च्या मोसमात मैदान प्रथम प्रथम-श्रेणी सामन्यांसाठी वापरले गेले. आणि वेस्ट इंडीच्या १९७४-७५ मोसमातील दौऱ्यावेळी मैदानाला कसोटी दर्जा मिळाला.

मैदानावर पहिली कसोटी २२ ते २९ नोव्हेंबर १९७४ दरम्यान खेळवली गेली. योगायोगाने, ही वेस्ट इंडीजचा महान फलंदाज व्हिव्हियन रिचर्ड्स आणि गॉर्डन ग्रीनीज यांची पदार्पणाची कसोटी होती. क्लाईव्ह लॉईडच्या नेतृत्वाखालील वेस्ट इंडीजच्या संघाने मन्सूर अली खान पतौडीच्या भारतीय संघाचा २५६ धावांच्या मोठ्या फरकाने दणदणीत पराभव केला. भारतीय संघाने त्यांचा पहिला कसोटी विजय ह्याच मैदानावर १९७६-७७ च्या मोसमात टोनी ग्रेगचा इंग्लिश संघाविरुद्ध नोंदवला. मैदानावरील पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना ६ सप्टेंबर १९८२ रोजी खेळवला गेला. भारताने ह्या सामन्यान श्रीलंकेचा सहा गडी राखून पराभव केला.

ह्या मैदानावर १९९६ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी पहिल्यांदा प्रकाश दिवे लावले गेले. प्रकाशझोतात खेळवला गेलेला पहिला सामना होता पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान ह्यांच्या दरम्यानचा उपांत्यपुर्व सामना. ९ मार्च १९९६ रोजी खेळवल्या गेलेल्या ह्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ३९ धावांनी चित्तथरारक विजय मिळवला. २००७ मध्ये, भारत आणि पाकिस्तान दरम्यान भारताची अवस्था ६१/४ अशी दयनीय झालेली असताना सौरव गांगुली आणि युवराज सिंगने ३०० धावांची भागीदारी करताना अनेक विक्रम मोडीत काढले. दिवसाच्या शेवटी भारताची धावसंख्या ३६५/५ अशी होती, की पूर्ण भारतात पहिल्या दिवसाची ही सर्वोच्च धावसंख्या आहे. ह्या मैदानावरील ही सर्वोच्च भागीदारी आहे. ह्या मैदानावरील, सौरव गांगुलीच्या २३९ धावा ही डावखोऱ्या फलंदाजाची सर्वोच्च धावसंख्या आहे.

सन २००० मध्ये बीसीसीआयने बंगळूरला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे केंद्र घोषित केल्यानंतर, ह्या मैदानावरील ह्या अकादमीमधून अनेक क्रिकेटपटू तयार झाले आहेत. मिस वर्ल्ड १९९६ कार्यक्रम ह्याच मैदानावर पार पडला होता. कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेने मैदानाची क्षमता ७०,००० पर्यंत वाढविण्याचे नियोजित केले आहे. त्याशिवाय ७० ते ८० हजार आसनक्षमतेचे आणखी एक क्रिकेट मैदान तयार करण्याचे सुद्धा ठरवले आहे. परंतू, आजपर्यंत ह्यापैकी कोणतीही योजना आजवर अंमलात आली नाही. बंगळूर फ्रंचायसी, रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे हे होम ग्राउंड आहे. आयपीएलच्या पहिल्या मोसमात मैदानाचे सुशोभिकरण करण्यात आले. त्याला कर्नाटकचे निशाण आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरच्या लाल आणि पिवळ्या रंगात रंगविले गेले.

साचा:Wide image

आकडेवारी आणि विक्रम

प्रकार कसोटी एकदिवसीय टी२०
सर्वात मोठी धावसंख्या साचा:Cr ६२६ वि साचा:CrName साचा:Cr ३८३/६ वि साचा:CrName साचा:Cr २०२/६ वि साचा:CrName
सर्वात लहान धावसंख्या साचा:Cr २१४ वि साचा:CrName साचा:Cr १६६/४ वि साचा:CrName साचा:Cr १२२/९ वि साचा:CrName
सर्वोत्कृष्ट फलंदाजी साचा:Flagicon युनिस खान २६७ वि साचा:CrName साचा:Flagicon रोहित शर्मा २०९ वि साचा:CrName साचा:Flagicon आंद्रे फ्लेचर ८४* वि साचा:CrName
सर्वोत्कृष्ट गोलंदाजी साचा:Flagicon हरभजन सिंग ११/२२४ वि साचा:CrName साचा:Flagicon युवराजसिंग ५/३१ वि साचा:CrName साचा:Flagicon युझवेंद्र चहल ६/२५
सर्वात मोठी भागीदारी साचा:Flagicon युनिस खानइंझमाम उल हक ३२४ वि साचा:CrName साचा:Flagicon शेन वॉटसनब्रॅड हॅडिन १८३ वि साचा:CrName साचा:Flagicon मोहम्मद हफीझशोएब मलिक १०६ वि साचा:CrName
सर्वाधिक धावा साचा:Flagicon सचिन तेंडूलकर ८६९ साचा:Flagicon सचिन तेंडूलकर ५३४ साचा:Flagicon सुरेश रैना १०३
सर्वाधिक बळी साचा:Flagicon अनिल कुंबळे ४१ साचा:Flagicon झहीर खान १४ साचा:Flagicon युझवेंद्र चहल

आंतरराष्ट्रीय सामन्यांची यादी

कसोटी

आजवर मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[३]:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
२२-२७ नोव्हेंबर १९७४ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr २६७ धावा धावफलक
२८ जानेवारी-२ फेब्रुवारी , १९७७ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr १४० धावा धावफलक
१५-२० डिसेंबर, १९७८ साचा:Cr साचा:Cr अनिर्णित धावफलक
१९-२४ सप्टेंबर, १९७९ साचा:Cr साचा:Cr अनिर्णित धावफलक
२१-२६ नोव्हेंबर, १९७९ साचा:Cr साचा:Cr अनिर्णित धावफलक
९-१४ डिसेंबर, १९८१ साचा:Cr साचा:Cr अनिर्णित धावफलक
१४-१९ सप्टेंबर, १९८३ साचा:Cr साचा:Cr अनिर्णित धावफलक
१३-१७ मार्च, १९८७ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr १६ धावा धावफलक
१२-१७ नोव्हेंबर, १९८८ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr १७२ धावा धावफलक
२६-३० जानेवारी, १९९४ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr डाव आणि ९५ धावा धावफलक
१८-२० ऑक्टोबर, १९९५ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ८ गडी धावफलक
२५-२८ मार्च, १९९८ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ८ गडी धावफलक
२-६ मार्च, २००० साचा:Cr साचा:Cr साचा:Cr डाव आणि ७१ धावा धावफलक
१९-२३ डिसेंबर, २००१ साचा:Cr साचा:Cr अनिर्णित धावफलक
६-१० ऑक्टोबर, २००४ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr २१७ धावा धावफलक
२४-२८ मार्च, २००५ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr १६८ धावा धावफलक
८-१२ डिसेंबर, २००७ साचा:Cr साचा:Cr अनिर्णित धावफलक
९-१३ ऑक्टोबर, २००८ साचा:Cr साचा:Cr अनिर्णित धावफलक
९-१३ ऑक्टोबर, २०१० साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ७ गडी धावफलक
३१ ऑगस्ट-३ सप्टेंबर, २०१२ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ५ गडी धावफलक
१४-१८ नोव्हेंबर, २०१५ साचा:Cr साचा:Cr अनिर्णित धावफलक
४-८ मार्च, २०१७ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ७५ धावा धावफलक

एकदिवसीय

आजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[४]:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
२६ सप्टेंबर १९८२ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ६ गडी धावफलक
२० जानेवारी १९८५ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ३ गडी धावफलक
१४ ऑक्टोबर १९८७ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr १६ धावा धावफलक
२७ ऑक्टोबर १९८९ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ३ गडी धावफलक
२६ फेब्रुवारी १९९३ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ४८ धावा धावफलक
१० नोव्हेंबर १९९३ साचा:Cr साचा:Cr no result धावफलक
०९ मार्च १९९६ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ३९ धावा धावफलक
२१ ऑक्टोबर १९९६ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr २ गडी धावफलक
१४ मे १९९७ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ८ गडी धावफलक
२० मे १९९८ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ४ गडी धावफलक
०४ एप्रिल १९९९ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr १२३ धावा धावफलक
२५ मार्च २००१ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ६० धावा धावफलक
१२ नोव्हेंबर २००३ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ६१ धावा धावफलक
१९ नोव्हेंबर २००५ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ६ गडी धावफलक
०६ जून २००७ आफ्रिका XI आशिया XI आशिया XI ३४ धावा धावफलक
२९ सप्टेंबर २००७ साचा:Cr साचा:Cr no result धावफलक
२३ नोव्हेंबर २००८ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr १९ धावा धावफलक
०७ डिसेंबर २०१० साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ५ गडी धावफलक
२७ फेब्रुवारी २०११ साचा:Cr साचा:Cr बरोबरी धावफलक
०२ मार्च २०११ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ३ गडी धावफलक
०६ मार्च २०११ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ५ गडी धावफलक
१३ मार्च २०११ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ६० धावा धावफलक
१६ मार्च २०११ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ७ गडी धावफलक
०२ नोव्हेंबर २०१३ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ५७ धावा धावफलक

टी२०

आजवर मैदानावर झालेल्या आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[५]:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
२५ डिसेंबर २०१२ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ५ गडी धावफलक
२० मार्च २०१६ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ७ गडी धावफलक
२१ मार्च २०१६ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ३ गडी धावफलक
२३ मार्च २०१६ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr १ धाव धावफलक
०१ फेब्रुवारी २०१७ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ७५ धावा धावफलक

प्रतिमासंग्रह

संदर्भ आणि नोंदी

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे

साचा:क्रिकेट विश्वचषक, २०११ - मैदान साचा:भारतातील क्रिकेट मैदाने