विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम
साचा:गल्लत साचा:माहितीचौकट क्रिकेट मैदान महाराष्ट्र, भारतातील नागपूर येथे २००८ साली बांधले गेलेले विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियम हे न्यू व्हीसीए म्हणून सुद्धा ओळखले जाते.हे नागपूर-वर्धा रस्त्यावर असलेल्या जामठा या गावी स्थित आहे.
मैदानाचे उद्घाटन २००८ साली झाले आणि शहरातले मुख्य मैदान म्हणून ह्या मैदानाने विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदानाची जागा घेतली. नवीन विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमची एक अव्वल दर्जाचे मैदान म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने स्तुती केली आहे.[१]
व्हीसीए स्टेडियम हे विदर्भ आणि मध्य विभाग ह्या संघाचे अनुक्रमे रणजी करंडक आणि दुलीप करंडक स्पर्धांसाठी होम ग्राउंड आहे.
≤[संपादन | स्रोत संपादित करा]
सचिन तेंडुलकर म्हणाला,"ह्या मैदानावर अपेक्षेपेक्षा चांगल्या सुविधा आहेत." रिकी पाँटिंगने चेंजिंग रुमच्या सुखसोईंची प्रशंसा केली.[२] डेक्कन चार्जर्सवर दोन-धावांनी विजय मिळवल्यानंतर राजस्थान रॉयल्सचा कर्णधार शेन वॉर्न “मैदानाची मोठ्या आकाराबाबत” आनंदित होता. “मायकेल लंबने मिड-विकेटच्या दिशेने मारलेला फटका क्षेत्ररक्षकाने झेलला. आता, जर हे एम.ए. चिदंबरम मैदान किंवा एम. चिन्नास्वामी मैदान असते तर चेंडू जणू संघाच्या हॉटेलकडे जाणाऱ्या टॅक्सीमध्येच पडला असता. आपल्याला अशाच मोठ्या मैदानांची गरज आहे.,” वॉर्न म्हणाला.[३] मैदान सरळ ८० यार्ड आणि ८५ यार्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या दिशेने आहे, त्यामुळे (खेळण्याच्या क्षेत्रानुसार) ते जगातील सर्वात मोठ्या मैदानांपैकी एक आहे.[४]
कसोटी विक्रम[संपादन | स्रोत संपादित करा]
- सर्वोच्च सांघिक धावसंख्या: ५६६/८घो, भारत वि न्यू झीलंड, २०१०-११.
- निचांकी सांघिक धावसंख्या: ७९, दक्षिण आफ्रिका वि भारत, २०१५/१६.
- सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या: २५३*, हाशिम आमला (ऑ) वि भारत, २०१०-११.
- डावातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी: ८/२१५, जेसन क्रेझा (ऑ) वि भारत, २००८-०९.
एकदिवसीय विक्रम[संपादन | स्रोत संपादित करा]
- सर्वोच्च सांघिक धावसंख्या: ३५४/७, भारत वि ऑस्ट्रेलिया, २००९-१०.[५]
- निचांकी सांघिक धावसंख्या: १२३, कॅनडा वि झिम्बाब्वे, २८ फेब्रुवारी २०११.
- सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या: १५६, जॉर्ज बेली (ऑ) वि भारत, २०१३-१४.
- डावातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी: ४/३३, मिशेल जॉन्सन (ऑ) वि न्यू झीलंड फेब्रुवारी २०११.
आंतरराष्ट्रीय टी२० विक्रम[संपादन | स्रोत संपादित करा]
- सर्वोच्च सांघिक धावसंख्या: २१९/५, श्रीलंका वि भारत, २००९-१०.
- निचांकी सांघिक धावसंख्या: ७९/१०, भारत वि न्यू झीलंड, २०१६-१७.
- सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या: ७८, कुमार संगाकारा (श्री) वि भारत, २००९-१०.
- डावातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजी: ४/११ मिशेल सँटनर (न्यू) वि भारत, २०१६-१७.
संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]
साचा:संदर्भयादी साचा:भारतातील क्रिकेट मैदाने
- ↑ नागपूरमध्ये भारत-न्यूझीलंड कसोटी होणार – टाइम्स ऑफ इंडिया
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ बॉलर्स इन विथ चान्स ॲट द व्हीसीए स्टेडियम इन नागपूर – स्पोर्ट – डीएनए. डीएनएइंडिया.कॉम. २३ डिसेंबर २०१३ रोजी पाहिले.
- ↑ [१] साचा:Wayback
- ↑ धोणीच्या फटकेबाजीमुळे मालिकेमध्ये बरोबरी | भारत वि. ऑस्ट्रेलिया, २रा ए.दि., नागपूर अहवाल | क्रिकेट न्यूज. इएसपीएन क्रिकइन्फो. २५ ऑक्टोबर २०१६ रोजी पाहिले.