वर्धा

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट शहर वर्धा हे महाराष्ट्राच्या विदर्भ भागातील वर्धा जिल्ह्याचे मुख्यालय व प्रमुख शहर आहे. वर्धा शहर वर्धा याच नावाच्या नदीकाठावर वसले असून ते नागपूरच्या ७५ किमी नैऋत्येस तर अमरावतीच्या १०० किमी आग्नेयेस स्थित आहे. १८६६ साली स्थापित झालेले हे शहर कापूस व्यापाराचे एक प्रमुख केंद्र मानले जाते. २०११ साली शहराची लोकसंख्या सुमारे १.०६ लाख होती.

सेवाग्राम हे वर्धा शहराजवळील एक गाव आहे . येथील सेवाग्राम आश्रमासाठी हे ठिकाण प्रसिद्ध आहे. १९३६ ते १९४८ दरम्यान सेवाग्राम आश्रम हे महात्मा गांधींचे निवासस्थान होते.


इतिहास

१८५० च्या दशकात वर्धा (त्यावेळच्या नागपूर जिल्ह्याचा भाग) इंग्रजांच्या हाती पडले आणि त्यांनी वर्ध्याला मध्यप्रदेशात सामील केले. सन १८६२ मध्ये प्रशासकीय सुविधेच्या हेतूने वर्धेला वेगळे केले गेले आणि पुलगावजवळील कवठा इथे जिल्हा मुख्यालय बनवल्या गेले. १८६६ मध्ये, जिल्हा मुख्यालय, पालखवाडी गावात हलवण्यात आले. इंग्लिश शहर-नियोजक सर बॅचलर आणि सर रेजिनाल्ड क्रॅडॉक ह्यांनी गावातील झोपड्या नष्ट करून एक नवीन शहर बांधले.आहे .जवळूनच वाहणाऱ्या वर्धा नदीवरून शहराचे नाव वर्धा असे देण्यात आले

वर्धा आणि जवळील सेवाग्राम ही दोन्ही गावे भारतीय स्वातंत्र्य चळवळीची प्रमुख केंद्रे होती.

भूगोल आणि हवामान

वर्धा साचा:Coord येथे स्थित आहे.[१] वर्धा शहराची समुद्रसपाटीपासूनची सरासरी उंची साचा:Convert आहे. वर्धा शहर वर्धा नदीकाठावर वसले असून ते नागपूरच्या ७५ किमी नैऋत्येस तर अमरावतीच्या १०० किमी आग्नेयेस स्थित आहे.

साचा:Weather box

लोकसंख्या आणि प्रशासन

वर्धा शहर नगरपालिका परिषद (श्रेणी- अ) द्वारे संचालित आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, नगरपालिकाच्या मर्यादेत सुमारे १०५,५४३ नागरिक आहेत.[२] शहरीकरणामुळे सिंदी, सावंगी, बोरगाव, पिपरी, म्हसळा, नळवाडी आणि चितोडा या शेजारच्या गावांना विकसित करण्यास मदत झाली आहे.

२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार वर्धा जिल्ह्याची लोकसंख्या १,२९६,१५७ आहे[३] त्यात ५२% पुरुष आणि ४८% महिलांचा समावेश आहे.[४] वर्धाचा सरासरी साक्षरता दर ८०% आहे, जो देशाच्या राष्ट्रीय सरासरी ५९.५% पेक्षा जास्त आहे. पुरुष साक्षरता ८३% आणि महिला साक्षरता दर ७६% आहे. वर्धा मध्ये, ११% लोकसंख्या सहा वर्षाखालील आहे. वर्धा हे जिल्ह्यातील सर्वात मोठे शहर आहे.

धर्म

शहराच्या लोकसंख्येत प्रामुख्याने हिंदू आणि बौद्ध धर्माचे लोक आहेत. ह्याशिवाय मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख धार्मिक सुद्धा अल्पसंख्यक समुदायाने आहेत.

सांस्कृतिक

सन १९६९ मध्ये मराठी साहित्य संमेलन वर्धा शहरामध्ये आयोजित करण्यात आले होते. त्या परिषदेचे अध्यक्ष पुरुषोत्तम शिवराम रेगे होते.

शिक्षण

वर्ध्यामधील विश्वशांती स्तूप

वर्धा विदर्भातील एक महत्त्वाचे शैक्षणिक केंद्र आहे. तिथे अनेक प्रसिद्ध महाविद्यालये आणि विद्यापीठे आहेत. प्रमुख शैक्षणिक संस्थांची यादी खालीलप्रमाणे आहे:

वाहतूक

वर्धा आणि त्याच्या जवळील रेल्वे स्थानकांचा नकाशा

वर्धा शहर महाराष्ट्रातील इतर शहरांशी रस्त्याने चांगल्या रीतीने जोडलेले आहे. नव्याने घोषित राष्ट्रीय महामार्ग क्र ३६१ (नागपूर-वर्धा-यवतमाळ-नांदेड-लातूर-तुळजापूर) शहरातुन जाईल. तसेच नागपूर-औरंगाबाद-मुंबई एक्स्प्रेस हायवे या मार्गावरून जातो.

भारतीय रेल्वेचे वर्धा रेल्वे स्थानक हे हावडा-नागपूर-मुंबई रेल्वेमार्गावरील एक मोठे स्थानक आहे. मुंबईहून नागपूर व कोलकात्याकडे जाणाऱ्या बहुतेक सर्व गाड्यांचा वर्ध्याला थांबा आहे. जवळील सेवाग्राम रेल्वे स्थानकाजवळ मुंबई-नागपूर व दिल्ली-चेन्नई रेल्वेमार्ग जुळतात.

शहराच्या सर्वात जवळचे विमानतळ डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, नागपूर आहे जे शहराच्या केंद्रस्थानापासून ७० किमी अंतरावर आहे.

संदर्भ

साचा:संदर्भयादी