वर्धा नदी

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

वर्धा नदी उपसा जलसिंचनासाठी प्रस्तावित अजून सरा धरण दापोरी कासार या गावाजवळ माननीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना सन २००१ मध्ये या कामाचे भूमिपूजन केले होते परंतु उपलब्ध नसल्याकारणाने प्रस्तावित धरणाच्या अपुऱ्या कामाचे २०२५ पर्यंत प्रकल्प पूर्ण तपासण्यासाठी पाटबंधारे विभाग विकास महामंडळ, नागपूर कडून काम झपाट्याने चालू आहे. हिंगणघाट तालुक्यातील ४८ गावांना सिंचनाची सोय होऊन बागायती शेती करणार्या शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारेल या प्रकल्पासाठी एकूण १ हजार हेक्टर जमीन पाण्याखाली जाणार आहे.

संगमानंतर वर्धा नदी चंद्रपूर जिल्ह्यातून प्रथम पूर्वेस, पुढे आग्‍नेयेस व नंतर महाराष्ट्र-आंध्र प्रदेश राज्यांच्या सीमेवरून पूर्वेस वाहू लागते. त्यानंतर चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यांच्या सरहद्दीवरून दक्षिणेकडे वाहत आलेल्या वैनगंगा नदीला सेवनीजवळ ती मिळते. वर्धा-वैनगंगा यांचा संगमानंतरचा प्रवाह प्राणहिता या नावाने महाराष्ट्र राज्य (गडचिरोली जिल्हा) व आंध्र प्रदेश राज्य यांच्या सरहद्दीवरून दक्षिणेस वाहत जाऊन गोदावरीला मिळतो.

एराई, वेणा, पोथरा, वेंबळा, निर्गुडा, जाम, कार या वर्धा नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत. वर्धा व तिच्या उपनद्यांना पावसाळ्यात भरपूर पाणी असते, मात्र उन्हाळ्यात त्या कोरड्या पडून अनेक ठिकाणी डबकी तयार होतात.

वर्धा नदीचा प्रवाह-मार्ग खचदरीतून आहे असे मानले जाते (उगमापासून ते पैनगंगा नदीला मिळेपर्यंत वर्धा नदीचे पात्र खोल व खडकाळ आहे). वर्धा नदीचे खोरे सुपीक आहे.

भूवैज्ञानिक दृष्ट्या वायव्येकडील भाग दख्खन ट्रॅपचा, तर दक्षिण, आग्‍नेय भाग निग्‍न, उच्च गोंडवन प्रदेशाचा आहे. वर्धेच्या सखल मैदानी प्रदेशात काळी, सुपीक रेगूर मृदा आहे; तसेच हा स्तरित खडकांचा भाग असल्याने येथे दगडी कोळशाचे साठे विपुल प्रमाणात सापडतात.साचा:भूगोलावरील अपूर्ण लेख साचा:माहितीचौकट वर्धा वर्धा नदी मध्य भारतातील एक नदी आहे. ही मध्य प्रदेश राज्यात सातपुडा पर्वतात बेतूलजवळच्या मुलताई येथे उगम पावून, दक्षिणेकडे वहाते व महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात येते. ती वर्धा जिल्ह्याच्या उत्तर आणि पश्चिम सीमांवरून वाहते आणि चंद्रपूर जिल्ह्यात जाते. तेथे वर्धा नदीला पैनगंगा येऊन मिळते. नंतरची वर्धा नदी, वैनगंगेला मिळून प्राणहिता नदी बनते. ही प्राणहिता, पुढे आंध्र प्रदेश राज्यात जाऊन गोदावरीला मिळते.

वेणा(वुण्णा) ही नागपूर जिल्ह्यातून व हिंगणघाट तालुक्यातून वाहत येऊन सावंगी या गावाजवळ वर्धा नदीला मिळते, तर बाखली नदी आर्वी शहराजवळ मिळते. यशोदा नदी आर्वी तालुक्यात उगम पावते व देवळी तालुक्यातून वाहत वाहत पुढे वर्धा नदीला मिळते.

राजुरा, घुगुस व बल्लारपूर ही ठिकाणे वर्धा नदीच्या काठी वसलेली आहेत.

वर्धा नदीला मिळणाऱ्या उपनद्या (क्रमाने)

पहा : जिल्हावार नद्या

साचा:विस्तार

साचा:भारताच्या नद्या this river is pollute by many companis wich are near this river the village wich next to river the person are cause many diseases because of polluted water and indian goverment is not taking care