अदिति

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:विस्तार

अदिति (संस्कृत: अदितिः ; IAST: Āditi) वैदिक देवता. ही आदित्यांची माता, दक्षप्रजापतीची कन्या व कश्यपप्रजापतीची पत्नी. आठ पुत्रांपैकी आठव्या सूर्याला तिने टाकल्याने तो नभस्थ झाला. ही तपस्येमुळे विष्णूमाता व सर्वदेवमाता झाली, असे पुराणे सांगतात. नरकासुराने नेलेली हिची कुंडले कृष्णाने नरकासुरमर्दन करून परत आणून दिली.[१]

आदितीला बारा मुलगे होते, त्यापैकी मित्र, वरुण, धाता, आर्यमा (अर्यमन), अंशुमान,भग , विवस्वान, आदित्य, पर्जन्य, इंद्र,त्वष्टा,पूषा, विष्णू आहेत.[२]

पौराणिक कथा

कश्यप मरीचि ऋषी यांचा पुत्र आहे, कश्यप ऋषींना अदिती आणि दिती या दोन बायका होत्या. देवांचा जन्म आदितीच्या गर्भाशयातून झाला आणि दैत्यांचा जन्म दितीच्या गर्भाशयातून झाला. श्रीकृष्णाची आई देवकी 'अदितीचा अवतार' असल्याचे म्हटले जाते.[२][३]

संदर्भ यादी