अनंत कात्रे

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:उल्लेखनीयता

अनंत कात्रे (जन्म : २१ सप्टेंबर १९१८) हे संस्कृतचे शिक्षक, संस्कृतविषयक नियतकालिंकांचे संपादन करणारे पंडित आहेत.

कात्रे हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातल्या गारगोटी तालुक्यातील शेळोली गावचे. वयाच्या १६व्या वर्षापर्यंत त्यांनी आपल्या वडिलांकडेच वेदाध्ययन करून या‌‍ज्ञिकीचे काम केले. विविध ठिकाणी ज्ञानार्जन केल्यानंतर त्यांनी इचलकरंजीमध्ये गोविंदराव हायस्कूलमध्ये सन १९५४ पासून २४ वर्षे संस्कृतचे अध्यापन केले. त्यानंतरची १५ वर्षे ते इचलकरंजीतील पंडित लक्ष्मणशास्त्री जोशी मुरगुडकर स्मारक संस्कृत वाग्विहारमाला या संस्कृत प्रचार व शिक्षणविषयक त्रैमासिकाचे संपादक होते.साचा:संदर्भ हवा

निवृत्त झाल्यापासून कात्रे गुरुजी पुण्याच्या पटवर्धन वेदपाठशाळे मध्ये २४ वर्षे संस्कृत साहित्याचे व वेद शास्त्रांचे अध्यापन करत आहेत. आजही वयाच्या १०० व्या वर्षी ते घरी आलेल्या विद्यार्थ्याला तितक्याच तळमळीने समाधानपूर्वक शिकवतात.

सन्मान आणि पुरस्कार

  • कात्रे गुरुजींनी केलेल्या संस्कृतविषयक कार्यासाठी ३० डिसेंबर २०१७ रोजी त्यांचा, करवीर पीठाचे शंकराचार्य यांच्या अध्यक्षतेखाली, इचलकरंजीच्या गोविंदराव हायस्कूल येथे, साताऱ्याच्या वैदिक धर्म संवर्धिनी सभेचे अध्यक्ष गोविंदशास्त्री जोशी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.साचा:संदर्भ हवा