आंबेडकर स्टुडंट्स असोसिएशन

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

आंबेडकर स्टूडंट्स असोसिएशन (संक्षिप्त: एएसए) ही भारतातील एक विद्यार्थी संघटना आहे जी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (एससी / एसटी), इतर मागासवर्गीय (ओबीसी), धार्मिक अल्पसंख्याक आणि इतर उत्पीडित समुदायातील विद्यार्थ्यांचे प्रतिनिधीत्व करते.[१][२][३] ही संघटना दलित आणि इतर उपेक्षित समुदायातील विद्यार्थ्यांच्या निवेदनासाठी कार्य करते.[४]

इतिहास

इ.स. १९९३ मध्ये अभ्यासक राजशेखर यांच्या नेतृत्वात हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीमधील दलित विद्यार्थ्यांच्या गटाने एएसएची स्थापना केली होती.[५][६]

भूमिका

एएसए हैदराबाद विद्यापीठ,[५] मुंबई विद्यापीठ,[७] पांडिचेरी विद्यापीठ,[८] टाटा सामाजिक विज्ञान संस्था,[९] केंद्रीय गुजरात विद्यापीठ,[१०] केंद्रीय केरळ विद्यापीठ[११] आणि पंजाब विद्यापीठ येथे कार्यरत आहेत.[१२] आंबेडकरवाद[१३][१४] आणि निषेध मोर्चे यावर एएसए नियमित सेमिनार आणि कार्यक्रम आयोजित करते.[१५][१६][१७] ही संघटना अनुसूचित जाती/ जमाती/ अंध विद्यार्थ्यांसाठी[१८] आणि फी समस्यांसाठी देखील कार्य करते.[१९] ही संघटना सक्रियपणे विद्यापीठांतील कॅम्पसमध्ये आरक्षणाच्या अंमलबजावणी काम[२०] आणि जात भेदभावाच्या घटना थांबवते.[२१]

हे सुद्धा पहा

संदर्भ

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे