कोसल

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search
चित्र:Mahajanapade.svg
प्राचीन भारताच्या सोळा महाजनपदे

कोसल हे प्राचीन भारतातील सोळा महाजनपदांपैकी एक होते.

प्रदेश

हिमालयाच्या पायथ्याशी आधुनिक नेपाळउत्तर प्रदेशच्या परिसरात कोसलचे राज्य होते. हे बलाढ्य व मोठे राज्य होते त्यामुळे त्याचे दोन विभाग करून शरयू नदी सीमा ठरविली होती. शरयूच्या उत्तरेस उत्तर कोसलचे राज्य असून श्रावस्ती ही त्याची राजधानी होती. या नदीच्या दक्षिणेकडे दक्षिण कोसलचे राज्य होते आणि कुशावती नगरी त्याची राजधानी होती. या राज्याच्या प्रभावाखाली शाक्यकोलीय ही राज्ये होती. शरयू नदीमुळे कोसलचे उत्तर व दक्षिण असे दोन भाग पडलेले होते. पुढे रामाने हे दोन भाग लवकुश यांना वाटून दिले.[१] लवाने उत्तर कोसलची राजधानी श्रावस्ती तेथे नेली, तर कुशाने दक्षिण कोसलची राजधानी कुशावती येथे हलविली.

राजे व राज्यकर्ते

प्रारंभी कंस या पराक्रमी राजाने काशीचे राज्य जिंकून घेतले. बुद्धाच्या समकालीन प्रसेनजित हा सम्राट कोसलच्या सिंहासनावर आरूढ झालेला होता. याने आपल्या राज्याचा बराच मोठा विस्तार केलेला होता. शाक्य गणराज्याची मुलगी प्रसेनजितची पत्नी होती. प्रसेनजितचचा पुत्र विद्दुभ याने शाक्य राज्यावर आक्रमण केले होते.

संकिर्ण

कोसल राज्यात शेती व व्यापाराची भरभराट झालेली होती. अयोध्या, साकेत व श्रावस्ती ही मोठी व्यापारी ठिकाणे कोसल राज्यात होती. नंतर हे राज्य मगधात विलिन झाले. बौद्ध काळातील बलाढ्य राज्यात कोसलाचा समावेश होतो. गौतम बुद्धाने बराच काळ श्रावस्ती येथे वास्तव्य केले होते.

संदर्भ आणि नोंदी

साचा:संदर्भयादी

साचा:महाजनपदे