ग्रीन पार्क
उत्तर प्रदेश क्रिकेट संघाचे होम ग्राउंड असलेले आणि प्रकाशझोताची सुविधा असलेले भारतातील कानपूर शहरामध्ये वसलेल्या ग्रीन पार्क स्टेडियम ह्या बहुउपयोगी मैदानाची आसनक्षमता ३३,००० इतकी आहे. [१] सदर मैदान उत्तर प्रदेश क्रीडा विभागाच्या नियंत्रणात आहे. उत्तर प्रदेशतील ह्या एकमेव आंतरराष्ट्रीय मैदानावर अनेक आंतरराष्ट्रीय कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळवले गेले आहेत. त्याशिवाय विवो आयपीएलचे २ सामने १९ आणि २१ मे २०१६ रोजी येथे खेळवले गेले होते. जगातील सर्वात मोठा हाताने बदलावा लागणारा धावफलक ह्या मैदानावर आहे. गंगा नदी जवळ वसलेले हे मैदान भारतातील दुसरे सर्वात मोठे मैदान आहे. मैदानाचे नाव हे येथे घोडदौडीला येणारी ब्रिटीश महिला मॅडम ग्रीनच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. ह्या मैदानाचे टोपण नाव 'बिलियर्ड्स टेबल' असे आहे. मैदाना समोर असलेल्या मॅकरॉबर्ट हॉस्पिटलमध्ये जन्मलेला दिवंगत क्रिकेट खेळाडू आणि प्रशिक्षक बॉब वूल्मरच्या आठवणीत सदर मैदानाला वूल्मर्स टर्फ असेही संबोधले जाते.
इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]

१९४० च्या दशकात घोडदौडीचा सराव करणाऱ्या मॅडम ग्रीनच्या नावावरून ह्या मैदानाचे नाव ग्रीन पार्क असे पडले. मैदानाच्या मागून वाहणाऱ्या गंगा नदीच्या किनाऱ्याजवळ कानपूर शहराच्या इशान्येकडील सिव्हिल लाईन्स येथे हे मैदान वसलेले आहे. भारतातील हे एकमेव मैदान आहे जेथे विद्यार्थ्यांसाठी एक गॅलरी उपलब्ध आहे. ग्रीन पार्क वर जगातील सर्वात मोठा हाताने बदलावा लागणारा धावफलक आहे. [२] त्याशिवाय मैदानामध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यांदरम्यान वापरल्या जाणाऱ्या दोन व्हिडियो स्क्रीन सुद्धा आहेत.
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला कसोटी विजय डिसेंबर १९५९ मध्ये येथे नोंदवला होता. टर्फवर खेळवला गेलेला हा पहिलाच सामना होता [३] ऑफ-स्पिनर जसु पटेल ह्यांची १४ बळींची कामगिरी भारताला विजय मिळवून देण्यात मोलाची ठरली.
१९५८/५९ मध्ये सुभाष गुप्तेने वेस्ट इंडीजचे १०२ धावांमध्ये ९ गडी बाद केले, यष्टिरक्षक नरेन ताम्हाणेने झेल सोडल्यामुळे तो केवळ लान्स गिब्सला बाद करु शकला नाही.
१९५७ नंतर ह्या मैदानावर भारताने आजवर फक्त दोन कसोटी सामने गमावले आहेत ते वेस्ट इंडीज विरुद्ध. १९५८ मधील सुभाष गुप्तेची स्वप्नवत कामगिरी वेस हॉलच्या १० बळींमुळे झाकोळून गेली आणि भारताच्या १९८३ च्या विश्वचषक विजयाचा आनंद माल्कम मार्शलच्या भीतीदायक गोलंदाजीने हिरावून घेतला. ह्या मैदानावर सर्वात जास्त कसोटी धावा करण्याचा विक्रम गुंडप्पा विश्वनाथच्या (७७६ धावा) नावावर आहे. ज्यामागोमाग सुनील गावस्कर (६२९ धावा) आणि मोहम्मद अझरुद्दीन (५४३ धावा) ह्यांचा क्रमांक लागतो. कसोटी क्रिकेटमध्य कपिल देवने मैदानावर सर्वात जास्त २१ गडी बाद केले आहेत आणि त्यामागोमाग हरभजनसिंगने २० गड्यांना तंबूत धाडले आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरने ह्या मैदानावर सर्वाधिक ३४२ धावा केल्या आहेत, त्यान तर विनोद कांबळीने २१७ तर सौरभ गांगुलीने २०८ धावा फटकावल्या आहेत. सर्वात जास्त ९ एकदिवसीय बळी जवागल श्रीनाथ आणि त्यानंतर अजित आगरकरच्या (८ बळी) नावावर आहेत.
सुविधा[संपादन | स्रोत संपादित करा]

एंड्स
मैदानाजवळ असलेल्या एल्गिन मिल आणि डीएव्ही कॉलेजमुळे येथील एंडला मिल एण्ड आणि होस्टेल एंड अशी नावे दिली गेली आहेत.
खेळपट्टी
मैदानाची खेळपट्टी नेहमीच फिरकी गोलंदाजांना मदत करत असलेली आहे. जसु पटेल, सुभाष गुप्ते आदींनी याचा फायदा घेतला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांची यादी[संपादन | स्रोत संपादित करा]
कसोटी सामने[संपादन | स्रोत संपादित करा]
ह्या मैदानांवर खेळवल्य गेलेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.[४]
| दिनांक | यजमान संघ | विरोधी संघ | निकाल | फरक | धावफलक |
|---|---|---|---|---|---|
| १२–१४ जानेवारी १९५२ | साचा:Cr | साचा:Cr | पराभूत | ८ गडी राखून | धावफलक |
| १२–१७ डिसेंबर १९५८ | साचा:Cr | साचा:Cr | पराभूत | २०३ धावा | धावफलक |
| १९–२४ डिसेंबर १९५९ | साचा:Cr | साचा:Cr | विजयी | ११९ धावा | धावफलक |
| १६–२१ डिसेंबर १९६० | साचा:Cr | साचा:Cr | अनिर्णित | - | धावफलक |
| १–६ डिसेंबर १९६१ | साचा:Cr | साचा:Cr | अनिर्णित | - | धावफलक |
| १५–२० फेब्रुवारी १९६४ | साचा:Cr | साचा:Cr | अनिर्णित | - | धावफलक |
| १५–२० नोव्हेंबर १९६९ | साचा:Cr | साचा:Cr | अनिर्णित | - | धावफलक |
| २५–३० जानेवारी १९७३ | साचा:Cr | साचा:Cr | अनिर्णित | - | धावफलक |
| १८–२३ नोव्हेंबर १९७६ | साचा:Cr | साचा:Cr | अनिर्णित | - | धावफलक |
| २–८ फेब्रुवारी १९७९ | साचा:Cr | साचा:Cr | अनिर्णित | - | धावफलक |
| २–७ ऑक्टोबर १९७९ | साचा:Cr | साचा:Cr | विजयी | २५३ धावा | धावफलक |
| २५–३० डिसेंबर १९७९ | साचा:Cr | साचा:Cr | अनिर्णित | - | धावफलक |
| ३० जानेवारी – ४ फेब्रुवारी १९८२ | साचा:Cr | साचा:Cr | अनिर्णित | - | धावफलक |
| २१–२५ ऑक्टोबर १९८३ | साचा:Cr | साचा:Cr | पराभूत | १ डाव आणि ८३ धावा | धावफलक |
| ३१ जानेवारी – ५ फेब्रुवारी १९८५ | साचा:Cr | साचा:Cr | अनिर्णित | - | धावफलक |
| १७–२२ डिसेंबर १९८६ | साचा:Cr | साचा:Cr | अनिर्णित | - | धावफलक |
| ८–१२ डिसेंबर १९९६ | साचा:Cr | साचा:Cr | विजयी | २८० धावा | धावफलक |
| २२–२५ ऑक्टोबर १९९९ | साचा:Cr | साचा:Cr | विजयी | ८ गडी | धावफलक |
| २०–२४ नोव्हेंबर २००४ | साचा:Cr | साचा:Cr | अनिर्णित | - | धावफलक |
| ११–१३ एप्रिल २००८ | साचा:Cr | साचा:Cr | विजयी | ८ गडी | धावफलक |
| २४–२७ नोव्हेंबर २००९ | साचा:Cr | साचा:Cr | विजयी | १ डाव आणि १४४ धावा | धावफलक |
| २२–२६ सप्टेंबर २०१६ | साचा:Cr | साचा:Cr | विजयी | १९७ धावांनी | धावफलक |
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय[संपादन | स्रोत संपादित करा]
ह्या मैदानांवर खेळवल्या गेलेल्या कसोटी सामन्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.[५]
आंतरराष्ट्रीय टी२०[संपादन | स्रोत संपादित करा]
ह्या मैदानांवर खेळवल्या गेलेल्या टी२० सामन्यांची यादी खालीलप्रमाणे आहे.[६]
| दिनांक | संघ १ | संघ २ | निकाल | फरक | धावफलक |
|---|---|---|---|---|---|
| २६ जानेवारी २०१७ | साचा:Cr | साचा:Cr | साचा:Cr | ५ धावा | धावफलक |