Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageStore::getPageByNameViaLinkCache ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
बोधिवृक्ष - मराठीपिडिया Jump to content

बोधिवृक्ष

मराठीपिडिया कडून

साचा:विकिडेटा माहितीचौकट बोधिवृक्ष किंवा महाबोधी वृक्ष म्हणजेच ‘ज्ञानाचा वृक्ष’ (Knowledge Tree) होय. बोधगया येथील महाबोधी विहाराच्या पश्चिमेला जो पिंपळ आहे, तोच महाबोधी वृक्ष या नावाने प्रसिद्ध आहे. या पिंपळाच्या वृक्षाखाली सिद्धार्थाला इ.स.पू. ५२८ मध्ये वयाच्या ३५ व्या वर्षी संबोधी (ज्ञान/बुद्धत्व) प्राप्ती होऊन ते बुद्ध बनले, तेव्हापासून पिंपळांच्या झाडाला बोधिवृक्ष संबोधिण्यात येते. ज्या स्थानी बुद्धांना संबोधी प्राप्त झाली, त्या जागी वज्रासनाचे प्रतीक म्हणून एक विस्तीर्ण लाल शिलाखंड एका चबुतऱ्यावर बसवलेला आहे. सम्राट अशोक बुद्धांचा अनुयायी झाला व नित्यनियमाने बोधिवृक्षाचे दर्शन घेऊ लागला. तेव्हा त्यांची पत्‍नी राणी तिश्यरक्षिता हिने मत्सरग्रस्त होऊन तो वृक्ष उपटून टाकला. पण सम्राट अशोकांनी तो पुन्हा लावला. अशोकांची कन्या संघमित्रा हिने या बोधिवृक्षाची एक फांदी श्रीलंकेत नेली व तेथील अनुराधापुरा या ठिकाणी नेऊन लावली. इ.स.पू दुसऱ्या शतकात पुष्पमित्र शुंगने आणि इ.स. ६०० मध्ये शशांक राजाने बोधगयेतील बोधिवृक्ष पुन्हा तोडला होता.

चिनी प्रवासी झ्यूझांग यांने बोधिवृक्षाबाबत विस्ताराने लिहिले आहे. परंतु जेव्हा जेव्हा बोधिवृक्ष तोडला गेला तेव्हा प्रत्येक वेळी नवा बोधिवृक्ष त्याठिकाणी लावला गेला.[]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
बोधिवृक्षाखाली ध्यानस्थ बुद्ध शिल्प

बौद्ध धर्मीय या वृक्षाला अतिशय पवित्र मानतात व त्याची पूजा करतात. भारहूत व बोधगया येथील शिल्पकामात गजराज (हत्ती) हे बोधिवृक्षाची पूजा करीत आहेत अशी चित्रे कोरलेली दिसतात. गया माहात्म्य, अग्नी पुराण, वायू पुराण इ. ग्रंथात बोधगया व बोधिवृक्ष यांचा पुष्कळ महिमा गायलेला आहे.[] इ.स. १८६२ मध्ये ब्रिटिश पुरातत्त्व अधिकारी अलेक्झांडर कनिंगहॅम यांनी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षणाच्या पहिल्या खंडामध्ये याची प्रथम नोंद घेतली.

उत्सव[संपादन | स्रोत संपादित करा]

बोधी दिवस[संपादन | स्रोत संपादित करा]

गौतम बुद्धांना ८ डिसेंबर रोजी बोधिवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली याचे स्मरण म्हणून बोधी दिवस हा सण म्हणून साजरा केला जातो. त्या दिवशी बौद्ध अनुयायी एकमेकांना भेटून “बुदू सरणयी” (बुद्धांमुळे तुमचे जीवन प्रकाशमान होवो) अशा सदिच्छा देतात. []

उद्गम आणि वारसा[संपादन | स्रोत संपादित करा]

प्रख्यात बोधिवृक्ष आजही अस्तित्वात आहे. परंतु त्याचा पुष्कळसा ऱ्हास झालेला आहे; एक मोठे खोड, पश्चिमेकडील तीन फांद्या, अजूनही हिरव्या आहेत, परंतु अन्य फांद्या सालीसह वाळल्या आहेत. त्या हिरव्या फांद्या कदाचित् मूळ बोधिवृक्षाच्या असाव्यात, कारण तेथे असंख्य एकत्रित खोडे उघडपणे दिसतात. बोधिवृक्षाचे नियमितपणे निश्चित पुनरुजीवन झाले आहे. सध्याचा पिंपळ आजूबाजूच्या परिसरापेक्षा ३० फूट उंच ओट्यावर आहे. इ.स. १८११ मध्ये बोधिवृक्ष पूर्ण चैतन्याने बहरलेला होता. जेव्हा तो डॉ बुकॅनन (हॅमिल्टन) यांनी पाहिला तेव्हा त्यांनी त्यांचे वर्णन करतांना म्हटले आहे की, त्याचे वय १०० वर्षापेक्षा जास्त नसावे.[]

तथापि, पुढे तो वृक्ष कुजला आणि इ.स. १८७६ मध्ये वादळात नष्ट झाला. इ.स. १८८१ मध्ये बकिंगहॅम (Cunningham) यांनी त्याच जागेवर पुन्हा नवीन बोधिवृक्ष लावला.[][] अलेक्झांडर बकिंगहॅम इ.स. १८९२ मध्ये म्हणतात. “मी इ.स.१८७१ मध्ये आणि इ.स. १८७५ मध्ये बोधिवृक्ष पाहिला. तो पूर्णतः कुजलेला होता. नंतर अल्पावधीतच मी इ.स. १८७६ मध्ये बोधिवृक्ष पाहिला तर त्याचा काही भाग वादळामुळे पश्चिमेकडील भिंतीवर पडलेला होता आणि जुना पिंपळ नष्ट झालेला होता. तथापि, बोधिवृक्षाच्या मूळ जुन्या झाडाच्या अनेक बिया जमा होऊन त्यांपासून झालेल्या नवीन रोपट्यांनी पुन्हा ती जागा घेतली होती.”

बोधगया[संपादन | स्रोत संपादित करा]

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
इ.स. १८१० बोधिवृक्षाखालील छोटेसे विहार.

[]

बोधगया येथील सध्याचा महाबोधिवृक्ष

पुस्तके[संपादन | स्रोत संपादित करा]

‘बुद्ध परंपरा आणि बोधिवृक्ष’ नामक मराठी पुस्तक हेमा सानेंनी लिहिले आहे. बौद्ध तत्त्वज्ञानामधील साधेपणा, स्पष्टता व सर्वव्यापीपणा हा जगात औत्सुक्य आणि चिंतनाचा विषय बनून राहिला आहे. आज एकविसाव्या शतकातही अनेक अंगांनी त्याचा वेध घेतला जात आहे. हे पुस्तक बुद्धचरित्र व परंपरांचा वेध घेत बोधिवृक्षाचा बुद्धाच्या आयुष्याशी संबंध व संदर्भ जोडते.

सिद्धार्थ गौतम म्हणजेच गौतम बुद्ध यांच्या चरित्रात वृक्षांची भूमिका महत्त्वाची असल्याचे लक्षात येते. ज्या वृक्षाखाली ध्यान करताना बुद्धाला ज्ञानप्राप्ती झाली तो अश्वत्थ (पिंपळ) म्हणजेच सिद्धार्थचा ज्ञानवृक्ष बोधिवृक्ष हे बहुतेकांना माहित असते; पण छोटा सिद्धार्थ सर्वप्रथम जम्बूवृक्षाखाली ध्यानस्थ झाला.

दोन शालवृक्षांच्या मध्यावर त्याचे महापरिनिर्वाण झाले, अशी माहिती वनस्पतीशास्त्रज्ञ हेमा साने यांनी या पुस्तकामधून दिली आहे. बुद्धचरित्र, बुद्धपर्व भारतातील धर्म, बुद्धाचा धर्म, बुद्ध होणे म्हणजे काय?, भिक्षू होणे म्हणजे काय?, बुद्ध समाजाचा तारणहार कसा आहे, बौद्ध वाड्मय यांचा परिचय पुस्तकातील पहिल्या भागात करून दिला आहेत.

दुसऱ्या भागात सिद्धार्थ गौतमपूर्वीची बुद्धांची परंपरा, त्या प्रत्येक बुद्धांचा ज्ञानवृक्ष यांची माहिती आहे. तन्हकर बुद्धाचा बोधिवृक्ष सप्तपर्णी, मेधंकर आणि पळस, सरणंकरचा पाटला आणि पाडल वृक्ष, दीपंकर आणि पिम्पर्णी, कौंडण्यचा मोई, मंगल, सुमन, रेवत, शोभित आणि नागचाफा अशा बुद्धांशी संबंधित विविध वृक्षांची माहिती यात दिली आहे. सिद्धार्थ गौतमाशी संबंधित जांभूळ, पिंपळ, अशोक, कदंब या झाडांची ओळखही लेखिकेने करून दिली आहे.

चित्रदालन[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:कॉमन्स वर्ग

साचा:गौतम बुद्ध साचा:बौद्ध विषय सूची