बोरखेडा बुद्रुक

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

बोरखेडा बुद्रुक हे गाव महाराष्ट्र राज्यातल्या जळगाव जिल्यातील चाळीसगाव या तालुक्यात आहे.चाळीसगावपासून हे गाव १२ किलोमीटर अंतरावर आहे .

प्रशासन

इथला कारभार हा ग्रामपंचायतीमार्फत चालतो. हे गाव मेहुणबारे पोलीस स्टेशनाच्या हद्दीत येते.

शिक्षण

गावात शिक्षणासाठी बालवाडी, जिल्हापरिषदेची प्राथमिक शाळा व माध्यमिक शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी चाळीसगाव येथे जावे लागते.

आरोग्य

आरोग्याच्या उत्तम सोयी आहेत.. येथे आठवडे-बाजारही भरतो. गावाजवळून गिरणा नदी वाहते.

व्यवसाय

येथील जनजीवन हे शेती व्यवसायावर अवलंबून आहे.

धार्मिक वातावरण

गावाचे वातावरण हे श्रद्धाळू आहे. गावात हनुमान मंदिर आहे. या गावात शाहे दिलावर बाबांचे मोठे मंदिर आहे. येथे अनेक राज्यातले लोक दर्शनासाठी येतात. येथे जानेवारीत मोठी जत्रा भरते. तसेच गावात राम मंदिर, आई भवानीचे मंदिर, महादेवाचे मंदिर आदी आहेत