चाळीसगाव

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र


चाळीसगाव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे.

चाळीसगाव शहराचे दोन मुख्य भाग आहेत - जुने शहर व नवे शहर. या दोन्हीच्या मधून तितूर नदी वाहते.

दळण वळण

चाळीसगाव हे लोहमार्ग व राज्य महामार्गांनी इतर शहरांशी जोडलेले आहे. हे भुसावळनजीक असलेले मध्य रेल्वेच्या मुंबई-दिल्ली मार्गावरील एक जंक्शन आहे. चाळीसगाववरून धुळे येथे जाण्यासाठी रेल्वेचा फाटा फुटतो. चाळीसगाव हे एक महत्त्वाचे स्थानक असल्याने येथे बहुतेक सर्व रेल्वेगाड्या थांबतात. मुंबईपुणे येथून अंदाजे सात तासांच्या अंतरावर आहेत. जळगाव, नासिक, औरंगाबादधुळे ही शहरे येथून साधारणतः समान अंतरावर आहेत.

भूगोल

चाळीसगाव महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात नैर्ऋत्य दिशेस आहे. चाळीसगावच्या उत्तरेस धुळे जिल्हा व पारोळा तालुका, पश्चिमेस नासिक जिल्हा, दक्षिणेस औरंगाबाद जिल्हा तर पूर्वेस पाचोराभडगाव तालुके आहेत. चाळीसगाव डोंगरीतित्तूर या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे. या नद्या पुढे गिरणाला मिळतात. गिरणा पुढे अरबी समुद्रास मिळणाऱ्या तापी नदीस मिळते.

पर्यटन

चाळीसगावच्या दक्षिणेस सातमाळा नावाची डोंगराची रांग आहे. अजिंठावेरूळ ही चाळीसगावच्या जवळची प्रसिद्ध पर्यटनस्थळे आहेत. अन्य पर्यटनस्थळांत पाटणादेवीपितळखोरे लेणी ही वाखाणण्याजोगी आहेत. पाटणादेवी मंदिर हेमाडपंती स्थापत्यशैली शैलीत मोडते. तसेच चाळीसगाव शहराच्या मध्यवर्ती असलेले सौंदर्यशैलीत भर घालणारा, हिंदू मुसलमान एकीचे प्रेम जपणारा व बंधुभावाची शिकवण देणारा पिरमुसा कादरीबाबाचा दर्गा येथे आहे.

तरवाडे बुद्रुक येथे एक साईबाबा मंदिर आहे. ते चाळीसगावपासून ७ किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर अतिशय सुंदर व रेखीव आहे.साचा:व्यक्तिगत मत या ठिकाणी दर वर्षास मंदिराचा वर्धापन सोहळा होतो. त्यावेळी या ठिकाणी हजारो भाविक भेट देतात. वाघळी येथे श्री दत्त मंदिर (श्री कृष्ण मंदिर) प्रसिद्ध आहे. हे मंदिर १७५० सालांच्या अगोदर बांधलेले मंदिर आहे. येथे मुधई देवी मंदिर दर्शनासाठी अनुकूल आहे. उंबरखेड येथील कालभैरव मंदिर विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनचे आहे.

उद्योग

इथे कृषी उत्पन्नावर आधारित बेलगंगा साखर कारखाना, चाळीसगाव कापड गिरणी, तेल व विड्यांचे कारखाने इ. इतर उद्योगांना चालना देण्याकरता इथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे चाळीसगाव उद्योग क्षेत्र आहे. तसेच मक्यावर प्रक्रिया करून स्टार्च, लिक्विड ग्लुकोज बनविण्याचा कारखाना सुद्धा उभारण्यात आला आहे.

कृषी

चाळीसगाव व जवळपासच्या भागात शेती हा मुख्य धंदा आहे. ऊस, कपाशी व केळी ही मुख्य रोख पिके आहेत. येथे भुईमुगाचीही लागवड होते. ज्वारी, बाजरीगहू ही धान्येही घेतली जातात. बहुतांश शेती जिरायती आहे. चाळीसगाव तालुक्यात लिंबू उत्पादन मोठ्या प्रमाणात होते।

प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वे

चाळीसगाव तालुक्यातील गावे

पिंपळवाड म्हाळसा,दस्केबर्डी, शिदवाडी, मेहुणबारे,खडकीसिम, कढरे, पळासरे, दरेगाव, जामदा लोंढे, खेडगाव,धामणगाव, पिलखोड, खडकी (चाळीसगाव तालुका), हिरापूर, तळेगाव, रोहिणी, पिंपळगाव (राजदेहरे), राजदेर तांडा, गंगाश्रम, हिंगणे, शिंदी, घोडेगाव, ओढरे, जुनपाणी, पाटणादेवी, वालझिरी, पिंपरखेड, लांबे वडगाव, कजगाव, गोंडगाव, करगाव, भोरस, चीर्फळ, टाकळी (प्र. दे.), [[हातगाव]मालशेवगे], बेलदारवाडी, शामवाडी, पातोंडा,उंबरखेड, तांबोळे, तरवाडे, बहाळ, दहिवद, वाघळी,वडाला,वडाली सायगाव, मांदुर्णे पिंपळखेड, रांजणगाव ,बोरखेडा बु, देवळी, डोणदिगर (बेघर)

पिंप्री खुर्द (परशुराम नगर), डोणदिगर, देशमुखवाडी, न्हावें, ढोमने, बोरखेडा (पिराचे)डामरूण पिंपरी बु।। प्र दे पोहोरे 

बाह्य दुवे

  1. साचा:Webarchiv
  2. MIDC Chalisgaon

साचा:जळगाव जिल्ह्यातील तालुके