भोगी

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:Infobox holiday भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात. हा सण मार्गशीर्ष महिन्यात येतो. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार, हे सहसा १३ जानेवारी रोजी साजरे केले जाते. हा सण तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो.[१][२][३][४] भोगी आणि मकरसंक्रांत हे कृषीशी संबंधित सण आहेत.[५]

स्वरूप

भोगी हा उपभोगाचा सण होय असे मानले जाते.[६] या दिवशी स्त्रिया अभ्यंगस्नान करतात. तमिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी तीन दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा करतात.[७]त्यातल्या पहिल्या दिवसाला ‘भोगी पोंगल’ असे म्हणतात. या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते.[८][९]

पोंगल

भोगी वर, लोक जुन्या आणि दुर्लक्षित गोष्टी टाकून देतात आणि नवीन गोष्टींवर लक्ष केंद्रित करतात ज्यामुळे बदल किंवा परिवर्तन होते. पहाटेच्या वेळी, लोक लाकूड, इतर घन-इंधन आणि घरातील लाकडी फर्निचरसह शेकोटी पेटवतात जे यापुढे उपयुक्त नाहीत. हे वर्षाच्या खात्यांची समाप्ती आणि दुसऱ्या दिवशी कापणीच्या पहिल्या दिवशी नवीन खात्यांची सुरुवात दर्शवते.[१०][११][१२]

आहार

भोगी

यावेळेस मटार, गाजर, वांगी, तीळ आदी पीक विपुल प्रमाणात तयार होते. त्यामुळे या कालखंडात मिळणाऱ्या सर्व भाज्या एकत्र करून, त्यात तिळाचे कूट घालून भाजी तयार करतात. तीळ लावून बाजरीची भाकरी करतात. ती लोण्यासह खातात. विशेषत्वाने, मुगाच्या डाळीची खिचडीही या दिवशी केली जाते.[१३]

आहारातील महत्त्व

बाजरी आणि तीळ हे दोन्ही उष्ण गुणधर्माचे पदार्थ आहेत. थंडीच्या काळात शरीराला उष्णता मिळवून देण्यासाठी भोगीच्या दिवशी या पदार्थांचा जेवणात विशेष समावेश केला जातो.[६]

हे देखील पहा

संदर्भ

साचा:संदर्भयादी