साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

मुक्ताईनगर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील जळगाव जिल्ह्याचा एक तालुका आहे. मुक्ताईनगर हे तालुक्याचे मुख्यालय व एक शहरही आहे. त्याचे पूर्वीचे नाव 'एदलाबाद' होते.[]. एदलाबाद शहराच्या उत्तरेस असलेल्या पूर्णा नदीकिनारी संत ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताबाई हिचे पुरातन देऊळ आहे. या देवळावरून इसवी सन २००० मध्ये शहराचे व तालुक्याचे नाव मुक्ताईनगर झाले.

मुक्ताईनगरला सर्वात जवळचा विमानतळ जळगाव येथे आहे. औरंगाबादचा विमानतळही जवळच आहे. मुक्ताईनगरला रेल्वे स्टेशन नाही.

भारतीय राष्ट्रीय महामार्ग ५३(पूर्वीचा क्रमांक ६) मुक्ताईनगर शहरावरून जातो.हा मार्ग मुक्ताईनगरला जळगाव, धुळे, मलकापूर, नागपूर या शहरांशी जोडतो

इतिहास संपादन

वारकरी संप्रदायासाठी मुक्ताईनगर गावाचे विशेष महत्त्व आहे. याच गावी ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताबाई गुप्त झाली होती अशी आख्यायिका आहे. दर महिन्यातील एकादश्यांना या गावात दर्शनासाठी आलेले गावकरी दिसतात.

मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताईनगरसकट अनेक गावे पूर्णा नदी काठी वसलेली होती. प्रशासनाने नदी काठच्या गावांचे पुनर्वसन करण्याचे ठरवले. पुराची भीती असल्यामुळे मुक्ताईनगरमधील घोडसगाव (जुने), कुंड इत्यादी नदीकाठच्या गावांचे पुनर्वसन करण्यात आले.

मुक्ताईनगरचा भूगोल संपादन

उत्तरेस सातपुडा पर्वत व 'मध्य प्रदेश' राज्य, पूर्वेस बुलढाणा जिल्हा, दक्षिणेस जामनेर तालुका व पश्चिमेस भुसावळ तालुका. पूर्णा नदी मुक्ताईनगर तालुक्यातून वाहते.

मुक्ताईनगर तालुक्याचा ईशान्य भाग घनदाट वनाने व्यापलेला आहे. गहू, ज्वारी, कापूस, ऊस, सोयाबीन ही पिके मुक्ताईनगर तालुक्यात घेतली जातात.

हवामान संपादन

मुक्ताईनगरमध्ये उन्हाळ्यातील तापमान कमाल ४६ ° सेल्सीयस पर्यंत जाते[]. हिवाळ्यात तापमान २७ °से.पर्यंत असते.

राजकारण संपादन

मुक्ताईनगर तालुका मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात आणि रावेर लोकसभा मतदार संघात आहे.

भारताच्या पूर्व राष्ट्रपती प्रतिभा पाटील या १९६२मध्ये जळगावहून आमदार म्हणून निवडून आल्या. त्यानंतर त्या मुक्ताईनगर (तेव्हाचे एदलाबाद) तालुक्याच्या १९६७ पासून ते १९८५ पर्यंत सतत चारवेळा आमदार राहिल्या. महाराष्ट्राचे भूतपूर्व कृषी मंत्री व महसूल मंत्री भारतीय जनता पार्टीचे एकनाथ खडसे हे मुक्ताईनगरचे १९८९ पासून ते २०१९ पर्यंत आमदार होते. ते २०१४-२०१६ या काळात राज्याच्या मंत्रिमंडळात होते. त्यांची सून रक्षा खडसे या २०१४पासून मुक्ताईनगर(रावेरच्या) खासदार आहेत. प्रतिभा पाटलांच्या वेळेस मुक्ताईनगर तालुक्यातून काँग्रेसचे आमदार निवडून येत असत; १९८९पासून हा तालुका भारतीय जनता पार्टीचा बनला. भारतीय जनता पार्टीचे एकनाथ खडसे १९८९ पासून ते २०१९ पर्यंत मुक्ताईनगरमधून एकही निवडणूक हरले नव्हते.

२०१९ महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातून एकनाथ खडसे यांना भारतीय जनता पक्षाची उमेदवारी मिळाली नाही. त्यांच्या जागेवर त्यांची सून रोहिणी खेवलकरला उमेदवारी मिळाली. परंतु त्यावेळी शिवसेनेचे उमेदवार पाटील १९८० मतांनी निवडून आले. तेच २०१९पासून मुक्ताईनगरचे आमदार आहेत.

लोकसंख्या संपादन

साचा:विस्तार साचा:जळगाव जिल्ह्यातील तालुके

स्रोत संपादन

बाह्य दुवे संपादन

संदर्भ संपादन