चंद्रकांत निंबा पाटील

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:गल्लत साचा:माहितीचौकट विधानसभा सदस्य

चंद्रकांत निंबा पाटील हे एक भारतीय राजकारणी आहेेत व मुक्ताईनगरचे आमदार आहेत, ते महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. ते शिवसेना पक्षाचे जळगाव जिल्हा अध्यक्ष आहेत.[१] ते मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातूून २०१९ मध्ये निवडून आले. त्यांनीी तेेेव्हाचे भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेता एकनाथ खडसे यांची मुलगी रोहिणी खडसेे यांना पराभूत केले होते.[२]

वैयक्तिक जीवन

चंद्रकांत निंबा पाटील हे मुक्ताईनर शिवसेनेचे नेते आहेत. ते मराठा हिंदू आहेेेत. ते मुक्ताईनगर येथे राहतात.साचा:संदर्भ

राजकीय कारकीर्द

चंद्रकांत पाटील २०१४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्या विरुद्ध शिवसेने कडून लढले होते, मात्र त्यांचा पराभव झाला.[३] २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडून आले, त्यांनी भाजपच्या रोहिणी खडसे-खेवलकर ह्यांचा १,९८९ मतांनी पराभव केला होता.[४] यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार रविंद्र पाटील यांनी आपली उमेदवारी मागे घेेत चंद्रकांत पाटिल यांना समर्थन दिले होते.[५][६]

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निकाल २०१९

नाव पक्ष मत
चंद्रकांत निंबा पाटील अपक्ष ९०,६९८
रोहिणी एकनाथ खडसे भारतीय जनता पार्टी ८८,३६७
राहुल अशोक पाटील वंचित बहुजन आघाडी ९,७१५
भगवान दामू इंगळे बहुजन समाज पक्ष १,५८३
संजू कडु इंगळे बिमकेपी १,४०१
ज्योती महेंद्र पाटील अपक्ष ८८८
संजय प्रहलाद कांडेलकर अपक्ष ५६०

संदर्भ

साचा:संदर्भयादी

हे ही पाहा