मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ हा उत्तर महाराष्ट्रातील मुक्ताईनगर तालुक्याचे महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रतिनिधित्व करतो. हा मतदारसंघ मुक्ताईनगर तालुका आणि बोदवड तालुका मिळून बनलेला आहे. मुक्ताईनगर जळगाव जिल्ह्यात स्तीत आहे. मुक्ताईनगर पूर्णा नदीच्या काठी वसलेले आहे. मुक्ताईनगर हे मुक्ताईनगर तालुक्याचे मुख्य प्रशासकीय ठिकाण आहे.

मुक्ताईनगर विधानसभा २०१९

गेली जवळ जवळ तीस वर्षे मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व माजी भा.ज.पा महसूल मंत्री (२०१४-२०१६) एकनाथ खडसे करत होते परंतु २०१९ निवडणुकीत भा. ज. पा. द्वारे त्यांना तिकीट नाकारण्यात आले. त्यांच्यावर त्यांच्या मंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा आरोप होता. जसे की पुण्यातील भोसरी MIDC जमिनीची त्यांनी खरेदी केली असा आरोप होता त्यामुळे त्यानं त्यांच्या पदावरून राजीनामा द्यावा लागला. भा. ज. पा. त्यांना तिकीट देणार नाही व पक्ष त्यांच्यासाठी नवीन जबाबदारी देण्यास इच्छूक आहे असे पक्ष्याने खडसे यांना पूर्वीच एका मुलाखतीत सांगितले होते.

एकनाथ खडसे यांच्या जागेवर त्यांच्या मुलीला - रोहिणी खडसे - खेवलकरला तिकीट देण्यात आले. खडसे यांनी पक्ष्याचा या निर्णयावर आपण खुश आहोत असे सांगितले आणि नंतर एका आठवड्यानतर आपण व आपली मुलगी पक्ष्याच्या या निर्णयावर नाराज आहोत असे बोलून दाखवले.[१] [१]जळगाव जिल्हा शिवसेना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पदाचा राजीनामा देत बंड पुकारले व अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात ते उतरले होते. त्यांना मराठा समाजाचा पाठिंबा आहे असे त्यांचे मत होते.[२]

राष्ट्रवादीचे आधिकृत उमेदवार अड. रविंद्र पाटील यांनी त्यांची उमेदवारी माघारी घेतली. त्यांचे म्हणणे होते की पक्ष वरिष्ठांच्या आदेशावरून त्यांनी आपली उमेदवारी मागे घेतली आहे. या वेळेस एकनाथ खडसे यांची प्रतिष्ठा मुक्ताईनगरमध्ये पणाला होती. ते तुफान प्रचार करत होते. त्यांच्या वर महाराष्ट्रात घराणेशाहीचे आरोप पण लागत होते. त्यांच्या सून रक्षा निखिल खडसे या सुद्धा मुक्ताईनगर मधून खासदार आहेत. त्या पुन्हा दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत(२०१४-२०१९, २०१९-present)

* मुक्ताईनगर विधानसभानिवडणुक निकाल २०१९-
नाव पक्ष मत
चंद्रकांत निंबा पाटील IND (अपक्ष) ९०६९८
रोहिणी एकनाथ खडसे भारतीय जनता पार्टी ८८३६७
राहुल अशोक पाटील वंचित आघाळी ९७१५
भगवान दामू इंगळे बसपा १५८३
संजू कडु इंगळे बिमकेपी १४०१
ज्योती महेंद्र पाटील IND (अपक्ष) ८८८
संजय प्रहलाद कांडेलकर IND (अपक्ष) ५६०[३]

मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ २००९ निकाल

२०१४ मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ निवडणुक

२०१४ विधानसभा निवडणुक मध्ये भारतीय जनता पक्षाचे एकनाथ खडसे निवडून आले व शिवसेेना पक्षाचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत निंबा पाटील द्वितीय क्रमांकावर राहिले. एकनाथ खडसे निवडूून आल्यानंतर महाराष्ट्राचे कृषी, महसूल मंत्री बनले. २०१६ मध्ये त्यांनी या पदांवरून राजीनामा दिला.

स्त्रोत

संदर्भ

१.

https://www.esakal.com/uttar-maharashtra/maharashtra-vidhansabha-2019-muktainagar-rebel-politics-225548%3famp

२. https://www.bbc.com/marathi/amp/india-50090114