एकनाथ खडसे

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट विधानसभा सदस्य एकनाथ खडसे हे महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकारणी आहेत[१][२]. ते मुक्ताईनगरतूून आमदार व महाराष्ट्राचे महासुल-मंत्री होते[३][४] २००९ पासून ते २०१४ पर्यंत ते महाराष्ट्र विधानसभेत भारतीय जनता पक्षातर्फे विरोधीपक्ष नेता होते[५]. १९९५-१९९९ या काळात खडसे पाटबंधारे खात्याचे मंत्री होते. २०१४ मध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष विजयी झाल्यानंतर खडसे महसूलमंत्रीकृषीमंत्री बनले. आणि पशुसंवर्धन ,दुग्धविकास, मत्स्यपालन, राज्य उत्पादनशुल्क मंत्री,अल्पसंख्याक मंत्री बनलेे[६][७] २१ ऑक्टोंबर २०२० रोजी एकनाथ खडसे यांनी भारतीय जनता पार्टी सोडली[८][९][१०] २३ ऑक्टोंबर २०२० रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला[११]

जीवनचरित्र

एकनाथ खडसे हे महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री होते.[१२]. ते मुक्ताईनगरला राहातात.[१३] त्यांच्या वडिलांचे नाव गणपत खडसे व आईचे नाव गोदावरीबाई गणपत खडसे आहे. त्यांना दोन मुली आहेत शारदा आणि रोहिणी खडसे. त्यांची सून रक्षा निखिल खडसे रावेर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेत खासदार आहेत.खडसे मुक्ताईनगरच्या आदीशक्ति मुक्ताईचे उपासक आहेत. खडसेंच एक घर चर्चगेट,मुंबई येथे आहे.[१४][१५]एकनाथ खडसे यांचा मुलगा निखिल खडसे याने १ मे २०१३ रोजी आत्महत्या केली.[१६]

राजकीय कारकीर्द

एकनाथ खडसे यांच्या राजनैतिक जीवनाची सुरुवात कोथळी गावमध्ये सरपंच बनण्यापासून झाली. जेव्हा पहिल्यांदा ते कोथळी ग्रामपंचायतीमध्ये सभासद पदासाठी उभे राहिले तेव्हा त्यांचा पराभव झाला होता. नंतर दुसऱ्या वेळी १९८७ला ते निवडून आले.[१७] १९८९ मध्ये ते मुक्ताईनगर तालुक्यातून विधानसभेसाठी निवडणुकीसाठी उभे राहिले व ते निवडून आले[१८] १९८९-१९९० विधानसभा निवडणुकीत एदलाबाद  विधानसभा मतदारसंघातून एकनाथ खडसे २,६७२ मतांनी निवडून आले होते[१८] तेव्हापासून ते मुक्ताईनगर तालुक्यातून विधानसभेसाठी अपराजित राहिले आहेत.१९९५ ते १९९९ च्या काळात भाजपा-शिवसेना सरकार मध्ये खडसे पाटबंधारे व अर्थमंत्री राहिले.[१९]

२००९ मध्ये एकनाथ खडसेंची महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली. २०१४ मध्ये नरेंद्र मोदींच्या लाटेवर भा.ज.प. निवडून आली तेव्हा खडसे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार होते परंतु देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदी निवड झाली. खडसे हे महाराष्ट्राचे महसूल मंत्री, कृषी मंत्री, राज्य उत्पादनशुल्क मंत्री बनले.२०१४ ते २०१६ या काळात एकनाथ खडसे १२ खात्यांचे मंत्री होते.[२०]

२०१६ मद्धे खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला.[२१]२०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली. २०१९ मध्ये आमदारकीसाठी त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर हिला भाजपने तिकीट दिले. शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजप, रोहिणी खडसे विरुद्ध अपक्ष फॉर्म भरला. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ने पाठिंबा दिला व 'चंद्रकांत पाटील' यांनी रोहिणी एकनाथ खडसे (बिजेपी) यांचा १९८९ मतांनी पराभव केला आणि ते प्रथम वेळेस आमदार बनून निवळून आले. [२२]

एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जामनेरचे आमदार व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या वर आरोप केले. गिरीश महाजन व देवेंद्र फडणवीस यांच्या मुळेच आपले तिकीट कापले गेल्याचा खळबळ जनक आरोप त्यांनी एका वृत्त-वाहिनिशी बोलतांना केला[२३]. आपली राजकीय कारकीर्द संपवण्याचा कट रचला गेला असाही आरोप त्यांनी केला. जनाधार असलेल्या नेत्यांना तिकीट नाकारले व दुसऱ्या पक्षातून आलेल्यांना तिकीट दिले गेले त्यामुळेच २०१९ विधानसभेत अपयश आले असे ते म्हणाले. खडसे यांनी आरोप केला की कोर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना आपल्या बद्दल नाराजी व्यक्त केली. त्यामुळे आपल्याला (खडसेंना) उम्मिद्वारी दिली गेली नाही.[२४]

८ मे २०२० एकनाथ खडसे विधानपरिषदेच्या उम्मेदवारीसाठी उत्सुक होते, त्यांना उमेदवारी देण्यात यावी म्हणून त्यांनी भाजपा कडे उम्मेडवरीची मागणी केली होती परंतु त्यांना उमेदवारी दिली गेली नाही. महणून त्यांनी वृत्तपत्र वाहिन्यांवर नाराजी व्यक्त केली.[२५][२६]

२१ ऑक्टोंबर २०२० रोजी एकनाथ खडसेंनी भाजप सोडला.[२७] भारतीय जनता पक्ष सोडल्या नंतर माध्यमांशी बोलताना खडसे म्हणाले ' देवेंद्र फडणवीसांमुळे आपण पक्ष सोडत आहोत '.[२८][२९]

२३ ऑक्टोंबर २०२० रोजी त्यांनी शरद पवारांच्या उपस्थितीत मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला.[३०]

  • इसवी सन २००० पूर्वीचा काळ -

भारतीय जनता पक्ष - शिवसेना (१९९७-१९९९) सरकारमध्ये खडसे पाटबंधारे खात्याचे मंत्री राहिले होते. खडसे मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांच्या मंत्री मंडळात मंत्री होतें.मनोहर जोशींनी १९९९ला मुख्यमंत्री पदाचा त्याग केला परीनामी एकनाथ खडसेंची टर्म सुद्धा संपुष्टात आली.[३१]

राजकीय जीवनातील महत्त्वाचे टप्पे

  • १९८८ - कोथळी गावचे सरपंच झाले.
  • १९८९ - मुक्ताईनगरचे आमदार बनले[३२].
  • १९९७ - भारतीय जनता पक्ष-शिवसेना सरकारमध्ये पाटबंधारे मंत्री बनले.
  • २००९ - विरोधी पक्षनेतेपदी निवड झाली.
  • २०१४ - भा.ज.प. सरकारमध्ये महासूल मंत्री, कृषी मंत्री, अल्पसंख्याक मंत्री, उत्पादन शुल्क मंत्री बनले.
  • २०१६ - महसूल मंत्रिपदावरून राजीनामा दिला.[३३]
  • २०२० - भारतीय जनता पार्टी सोडली[३४]
  • २०२० - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश घेतला[३५]

बाह्य दुव्वे

१. पक्षाने माझ तिकीट का कापलं? याची कारणं अजूनही शोधतोयः एकनाथ खडसे

२. झी २४ तास - (बुधवार,२९ मार्च २०१७) एकनाथ खडसे विरोधकांच्या भूमिकेत, प्रश्नांच्या सरबत्तीने सरकार घायाळ द ग्रेट खली

संदर्भ

१. https://zeenews.india.com/marathi/news/maharashtra-assembly-elections-2014/distribution-of-minisrty-announced-in-devedra-fadnaviss २. झी २४ तास - (बुधवार २९ मार्च २०१७) एकनाथ खडसे विरोधकांच्या भूमिकेत प्रश्नांच्या सरबत्ती ने सरकार घायाळ.

स्रोत

१. https://m.lokmat.com/ahmadnagar/i-will-reveal-names-those-who-harass-me-eknath-khadse-shirdi-sightseeing/

२. एकनाथ खडसे

  1. https://www.loksatta.com/mumbai-news/eknath-khadse-joins-ncp-in-presence-of-party-chief-sharad-pawar-in-mumbai-scj-81-2309376/
  2. साचा:स्रोत बातमी
  3. साचा:स्रोत बातमी
  4. साचा:स्रोत बातमी
  5. साचा:स्रोत बातमी
  6. htto://www.sarkarnama.in/maharashtra-bjp-eknath-khadse-bday-15126%3famp
  7. साचा:स्रोत बातमी
  8. साचा:संकेतस्थळ स्रोत
  9. साचा:स्रोत बातमी
  10. साचा:स्रोत बातमी
  11. साचा:संकेतस्थळ स्रोत
  12. साचा:स्रोत बातमी
  13. https://www.thodkyaat.com/eknath-khadse-gave-clarification-on-poster-fadnavis-hatao-poster-marathi-news/
  14. साचा:स्रोत बातमी
  15. साचा:संकेतस्थळ स्रोत
  16. http://www.loksatta.com/maharashtra-news/bjp-leader-eknath-khadses-son-attempts-suicide-in-jalgaon-107033/
  17. https://www.sarkarnama.in/maharashtra-bjp-eknath-khadse-bday-15126
  18. १८.० १८.१ https://books.google.co.in/books?id=XVuNAAAAMAAJ&q=%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5+%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%87&dq=%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A5+%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A4%B8%E0%A5%87&hl=mr&sa=X&ved=0ahUKEwj2yoOjjLTpAhWH8HMBHVJlD3kQ6AEIXzAJ
  19. https://www.loksatta.com/maharashtra-vidhansabha-election2019-news/bjp-internal-politics-end-eknath-khadse-career-zws-70-1989363/lite/
  20. साचा:स्रोत बातमी
  21. साचा:स्रोत बातमी
  22. साचा:संकेतस्थळ स्रोत
  23. साचा:संकेतस्थळ स्रोत
  24. साचा:संकेतस्थळ स्रोत
  25. साचा:स्रोत बातमी
  26. साचा:स्रोत बातमी
  27. साचा:संकेतस्थळ स्रोत
  28. साचा:स्रोत बातमी
  29. साचा:संकेतस्थळ स्रोत
  30. साचा:संकेतस्थळ स्रोत
  31. https://frontline.thehindu.com/other/article30256539.ece
  32. साचा:स्रोत पुस्तक
  33. साचा:संकेतस्थळ स्रोत
  34. साचा:संकेतस्थळ स्रोत
  35. साचा:संकेतस्थळ स्रोत