Jump to content

वसंत आबाजी डहाके

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट साहित्यिक

वसंत आबाजी डहाके (३० मार्च १९४२ -हयात ) हे मराठीचे भाषातज्‍ज्ञ, कोशकार तसेच लेखक आणि कवी आहेत.१९६६ साली 'योगभ्रष्ट' या दीर्घ कवितेमुळे ते प्रकाशात आले. "चित्रलिपी" या संग्रहाकरिता २००९ सालच्या साहित्य अकादमी पुरस्काराने त्यांना गौरवण्यात आले होते.साचा:Sfn फेब्रुवारी २०१२ च्या चंद्रपूर येथे झालेल्या ८५ व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

व्यक्तिगत जीवन[संपादन | स्रोत संपादित करा]

वसंत आबाजी डहाके यांचा जन्म यवतमाळ जिल्ह्यातील 'बेलोरा' या गावी ३० मार्च १९४२ला झाला. त्यांचे प्राथमिक शिक्षण बेलोरा येथे तर पाचवी ते बी.ए. पर्यंतचे शिक्षण चंद्रपूर येथे झाले. त्‍या वेळेपासून ते कविता करीत असत.

प्रकाशित साहित्य[संपादन | स्रोत संपादित करा]

काव्यसंग्रह[संपादन | स्रोत संपादित करा]

  • शुभवर्तमान (१९८७)
  • योगभ्रष्ट (१९७२)
  • शुन:शेप (१९९६)साचा:Sfn
  • चित्रलिपी

ललित[संपादन | स्रोत संपादित करा]

  • अधोलोक (कादंबरी)
  • यात्रा-अंतर्यात्रा (ललितलेख )
  • प्रतिबद्ध आणि मर्त्य (कादंबरी)
  • मालटेकडीवरून (ललित लेखसंग्रह)
  • सर्वत्र पसरलेली मुळे (दीर्घ काव्य)

वैचारिक/ संशोधनपर[संपादन | स्रोत संपादित करा]

  • कवितेविषयी
  • दृश्यकला आणि साहित्य
  • मराठीतील कथनरूपे
  • मराठी नाटक आणि रंगभूमी - विसावे शतक
  • मराठी समीक्षेची सद्यःस्थिती आणि इतर निबंध
  • मराठी साहित्य : इतिहास आणि संस्कृती (संशोधित लेखन)

प्रसिद्ध कविता[संपादन | स्रोत संपादित करा]

  • योगभ्रष्ट

संपादित साहित्य[संपादन | स्रोत संपादित करा]

  • निवडक सदानंद रेगे (१९९६)
  • शालेय मराठी शब्दकोश (१९९७)
  • संक्षिप्त मराठी वाङ्मय कोश (१९९८)
  • वाङ्मयीन संज्ञा आणि संकल्पना कोश

अन्य भाषांत भाषांतरित साहित्य[संपादन | स्रोत संपादित करा]

  • टेररिस्ट ऑफ द स्पिरिट - रणजित होस्कोटे, मंगेश कुलकर्णी (अनु.), १९९२ (योगभ्रष्ट ह्या काव्यसंग्रहाचा इंग्लिश अनुवाद)साचा:Sfn


गौरव, पुरस्कार[संपादन | स्रोत संपादित करा]

  • कादंबरी व कवितेसाठी १९८१ व १९८७ साली महाराष्ट्र राज्य पुरस्कार.
  • २००३मध्ये गंगाधर गाडगीळ पुरस्कार.
  • २००५मध्ये महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार.
  • २००९मध्ये विदर्भ साहित्य संघाचा "जीवनव्रती" पुरस्कार.
  • साहित्य अकादमी पुरस्कार २००९: 'चित्रलिपी' या काव्यसंग्रहासाठी.
  • २०१०मध्ये मास्टर दीनानाथ प्रतिष्ठानतर्फे 'शांता शेळके' पुरस्कार.
  • कविवर्य दामोदर अच्युत कारे पुरस्कार.
  • पुणे मराठी ग्रंथालय पुरस्कार.
  • ८५व्या मराठी साहित्य संमेलनाचे निर्वाचित अध्यक्ष- (चंद्रपूर, २०१२)

[] आणि []

इतर[संपादन | स्रोत संपादित करा]

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकरांवरील छायाचित्रात्मक ग्रंथासाठी विशेष योगदान

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:संदर्भयादी

संदर्भसूची[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]


साचा:मराठी साहित्यिक साचा:अमरावती