शिरसाळा मारोती मंदिर

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र शिरसाळा मारोती शिरसाळा गावचे एक मारुती मंदिर आहे आणि जळगाव जिल्ह्यातील बोदवड तालुक्यात आहे[१]
इथे दर शनिवारी, मंगळवारी भाविकांची गर्दी असते. भाविक मोठ्या संख्येने दर्शनास येतात तसेच मारुतीच्या जन्मदिनी इथे भाविक खूप मोठ्या संख्येने येतात.

इतिहास

शिरसाळ्याचा मारोती या नावाने हे मंदिर देवस्थान आजूबाजूच्या गावांमध्ये आणि मुक्ताईनगर तालुक्यात ओळखले जाते. ह्या मंदिराची अशी अख्याईका आहे की या मंदिरावर जेव्हा जेव्हा कळस बांधण्याचा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा कळस टिकला नाही असा अनुभव भक्तांकळून आणि शिरसाळ्यातील गावकऱ्यांकडून सांगितला जातो[२] [३]

मंदिर

शिरसाळ्याचा मारोती हा स्वयंभु आहे.नवसाला पावनारा मारोती या नावाने भाविकांमध्ये हा बजरंगबली प्रसिद्ध आहे.मंदिर परीसर मोठा आहे.गणपतीचे मंदिर,शनिदेव मंदिर,राम मंदिर आणि महादेव मंदिर येथे आहे.शिरसाळा मारोती जागृत देवस्थान आहे अशी महती आहे[४]शिरसाळ्याचे मारुती मंदिर शिरसाळा गावखजवळ अर्ध्या किलोमीटर अंतरावर आहे आणि मुक्ताईनगर पासून १७ किलोमीटर अंतरावर आहे. जळगाव पासून ७५ किलोमीटर अंतरावर आहे[३]

संदर्भ