शिवराज पाटील

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट पदाधिकारी शिवराज पाटील हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्रामधील वरिष्ठ नेते, भारताचे माजी गृहमंत्री व १०वे लोकसभा सभापती आहेत. २०१० ते २०१५ दरम्यान ते पंजाब राज्याचे राज्यपाल व चंदिगढ केंद्रशासित प्रदेशाचे प्रचालक होते.

१९७३ साली लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामधून विधानसभेवर प्रथम निवडून आलेल्या पाटील ह्यांनी महाराष्ट्र शासनामध्ये अनेक मंत्रीपदे भुषवली. १९८० साली ते प्रथम लातूर लोकसभा मतदारसंघामधून लोकसभेवर निवडून गेले. पुढील ६ निवडणुकांमध्ये त्यांनी येथून विजय मिळवला. २००४ साली राज्यसभेचे सदस्यत्व मिळालेले पाटील २००४ ते २००८ दरम्यान मनमोहन सिंग मंत्रीमंडळामध्ये गृहमंत्रीपदावर होते. २६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतामधील कायदा व सुव्यवस्था राखण्यास अपयश आल्याच्या टीकेवरून पाटीलांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला.