Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
शेगांव - मराठीपिडिया Jump to content

शेगांव

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्र

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
श्री गजानन महाराज समाधीस्थळ

साचा:अशुद्धलेखन शेगांव हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्याचा एक तालुका आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील शेगांव हे प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. श्री गजानन महाराज यांचे वास्तव्य लाभलेले हे ठिकाण विदर्भातील पंढरपूर असे संबोधले जाते. महाराजांच्या समाधीस्थळावर एक भव्य मंदिर बांधले गेले असून त्याची व्यवस्था तेथील 'गजानन महाराज संस्थान' पाहते. तेथील संस्थानाच्या 'भक्त निवास' मध्ये अल्प दरात मुक्कामाची सोय केलेली आहे. तेथे ७०० खोल्यांची व्यवस्था असून, गर्दीच्या वेळेस त्याव्यतिरिक्त ५००० बिछाने देखील पुरविण्यात येतात. येथे येणाऱ्या भक्तांच्या आवडीनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या निवासाची व्यवस्था येथे आहे. याच संस्थानाने आनंद-सागर हे प्रेक्षणीय स्थळ सुमारे ३५० एकर जागेपैकी सध्या १२० एकर जागेवर निर्माण केले असून पर्यटकांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय आहे. त्याच्या विस्ताराचे काम खूप चांगल्या प्रकारे सुरू आहे. ते शेगाव-बाळापूर रस्त्यावर, शेगांवपासून सुमारे २.५ कि.मी. अंतरावर आहे. तेथे जवळच 'आनंद सागर विसावा' येथेही भक्त निवास असून तेथेही राहण्याची व भोजनाची सोय आहे.

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
शेगांव येथील आनंद सागरचे प्रवेशद्वार
नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
आनंद सागर, शेगांव

या संस्थानातर्फे सेवार्थ बस सेवा, निःशुल्क महाप्रसाद, अल्पदरात भोजन व्यवस्था, विविध वैद्यकिय सेवा इत्यादी अनेक प्रकल्प राबविण्यात येतात.

शेगांव रेल्वे स्थानक मुंबई-भुसावळ-नागपूर मार्गावर आहे. शेगांवची लोकसंख्या ३२,८२४ आहे. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरातून शेगावकडे राज्य परिवहन मंडळाच्या व खाजगी बसेस उपलब्ध असून मुंबई-नागपूर मार्गावरील सर्व प्रमुख रेल्वे गाड्या येथे थांबतात.

कचोरी[संपादन | स्रोत संपादित करा]

येथील 'कचोरी' हा खाद्यपदार्थ सुप्रसिद्ध आहे. त्यास आय एस ओ मानांकन मिळालेले आहे. शेंगाव मधील कचोरी मोठ्या प्रमाणात लोकांना आवडलेला खाद्य पदार्थ आहे. म्हणून त्या खाद्य पदार्थाला शेगाव कचोरी असे संबोधले जाते.

हेही पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:बुलढाणा जिल्ह्यातील तालुके