बुलढाणा

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:हा लेख साचा:जिल्हा शहर

ए आर डी सिनेमा गृह

बुलढाणा शहर हे महाराष्ट्र राज्यातील बुलडाणा जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. या शहराचे पूर्वीचे नाव 'भिलठाणा' असे होते. त्याचे इंग्रज काळात 'बुलढाणा' असे नामांतर करण्यात आले. हे एक थंड हवेचे ठिकाण होते. आजही विदर्भात सर्वात कमी तापमान बुलडाणा शहराचे असते. बुलडाणा शहरातून दोन राष्ट्रीय महामार्ग जातात. १. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३अ मलकापूर - बुलडाणा -जालना- संभाजीनगर आणि २. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ई अजिंठा-बुलडाणा-खामगाव जातो जो खामगावहुन पुढे अचलपूर मार्गे मध्य प्रदेशातील बैतुल शहरास जातो.

बुलढाणा शहरात तिरुपतीच्या धर्तीवर मलकापूर-बुलडाणा राष्ट्रीय महामार्गावर राजूर घाटात टेकडीवर श्री भगवान बालाजी यांचे नयनरम्य असे मंदिर बांधण्यात आले आहे. जे आज एक प्रेक्षणीय आणि धार्मिक स्थळ आहे.

भाषा आणि संस्कृती

बुलढाण्यात बोलली जाणारी सर्वात सामान्य भाषा म्हणजे मराठी भाषा. शहरी लोकांपैकी ९८ टक्क्यांहून अधिक लोक प्रथम भाषाच मराठी बोलतात. मराठी हा इंग्रजी आणि हिंदी माध्यमाच्या शाळेत शिकविला जाणारा अनिवार्य विषय आहे. १ टक्का लोकसंख्या हिंदी भाषा बोलते. व्यावसायिक स्थितीमुळे बुलडाणा मधील सर्व हिंदी भाषिक अस्खलित मराठी बोलू शकतात.[१]

हे सुद्धा पहा

बुलढाणा जिल्हा

साचा:महाराष्ट्रातील जिल्हे