Deprecated: Caller from MediaWiki\Cache\LinkCache::fetchPageRow ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::selectOne ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385

Deprecated: Caller from MediaWiki\Page\PageProps::getProperties ignored an error originally raised from MediaWiki\Extension\SmartCommons\Store\MetadataStore::updateMetadata: [1054] Unknown column 'scf_url' in 'SET' in /www/wwwroot/enwiki/w/includes/debug/MWDebug.php on line 385
बुलढाणा जिल्हा - मराठीपिडिया Jump to content

बुलढाणा जिल्हा

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट भारतीय जिल्हा साचा:हा लेख साचा:जिल्हा सूचना

नखुले निर्माणात त्रुटी: संचिका अस्तित्वात नाही
लोणार सरोवर

बुलढाणा जिल्हा हा महाराष्ट्र राज्याच्या अमरावती विभागात आहे. विदर्भातील या जिल्ह्याचे क्षेत्रफळ ९६८० चौ.किमी इतके असून लोकसंख्या २२,३२,४८० इतकी आहे. जिल्ह्याच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण दिशेस अनुक्रमे अकोला-वाशीम,अमरावती जिल्हा, जळगाव-जालनापरभणी हे जिल्हे आहेत. तर उत्तरेस (मध्य प्रदेशचा)नेमाड जिल्हा आहे.[]

चित्र:Anandsagar.jpg
शेगांव येथील आनंदसागर बागेचे प्रवेशद्वार
चित्र:Vidarbha Map.jpg
विदर्भाच्या नकाशात जिल्ह्याचे स्थान

जिल्ह्याचे प्रशासकीय कार्यालय बुलढाणा शहरात असून ते १३ तालुक्यांशी राज्य महामार्गानी जोडले गेले आहे. मुंबई ते हावडा हा महत्त्वाचा रेल्वेमार्ग तसेच पूर्व-पश्चिम भारतास जोडणारा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ या जिल्ह्यातून गेला आहे. जिल्ह्याच्या उत्तरेकडील सर्व नद्या पश्चिम दिशेस वाहणाऱ्या आहेत व त्या तापी नदीला जाऊन मिळतात तर दक्षिणेकडील नद्या पैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत.

कापूस, ज्वारी, सोयाबीन, सूर्यफूल ही या जिल्ह्यातील महत्त्वाची पिके आहेत. जिल्ह्यात खामगाव, मलकापूर ही औद्योगिक शहरे आहेत.

मंदिरे, धार्मिक स्थळे आणि पर्यटनस्थळे[संपादन | स्रोत संपादित करा]

    • बुलढाणा जिल्हा संक्षिप्त माहिती:-
  • शेगाव येथे श्री संत गजानन महाराजांचे मंदिर आहे व आनंदसागर हा प्रसिद्ध बगीचा आहे.
  • लोणार येथील उल्कापाताने निर्मिलेले खाऱ्या पाण्याचे सरोवर प्रसिद्ध आहे.
  • देऊळगाव राजा हे गाव तेथील भगवान बालाजीच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. देऊळगाव राजास प्रति तिरुपती सुद्धा म्हटले जाते. जर कोणी एखादा नवस तिरुपती बालाजीला बोलला असेल मात्र तेथे जाऊन पूर्ण करू शकत नसेल तर तो देऊळगाव राजाच्या श्री बालाजी मंदिरात जाऊन पूर्ण करू शकतो.
  • लोणारपासून दक्षिणेला १५ किमी अंतरावर (लोणार-आघाव-वझर रोडवर) पार्डा दराडे नावाचे गाव आहे. तेथे पांडवकालीन श्री महादेवाचे मंदिर आहे.
  • लोणारपासून ७ किमीवर पांगरा (डोले) गाव आहे, तेथे भगवान बाबांचे मंदिर आहे.
  • बुलडाणा जिल्ह्यातच पैनगंगा या नदीचा उगम झालेला आहे ते ठिकाण बुधनेश्वर हे असून बुलढाणा-अजिंठा या रोडवर बुलडाण्यापासून २० किमी अंतरावर आहे.
  • बुलढाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्यामध्ये चिखलीपासून फक्त १२ किलोमीटरच्या अंतरावर साकेगाव या गावामध्ये जुने (हेमाडपंथी शिवमंदिर) आहे. साकेगाव हे निसर्गरम्य ठिकाण आहे.
  • मोताळा तालुक्यातील तारापूर येथील अंबादेवीचे मंदिर हे जागृत देवस्थान आहे. हे राजा हरिश्चंद्र याने स्थापलेले असून नवरात्रोत्सव काळात येथे मोठी गर्दी असते.
  • देऊळगाव राजा हे शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीतसुद्धा अग्रेसर आहे.
  • सुलतानपूर येथील पुरातन वास्तू सिद्धेश्वर मंदिर शिल्पकलेचा उत्तम अविष्कार दर्शनीय आहे.
  • उंद्री या गावापासून ... कि मी अंतरावर वडाळी नावाच्या गावामध्ये प्रसिद्ध शिवमंदिर आहे.
  • अमडापूर येथे प्रसिद्ध बल्लाळदेवी मंदिर आहे.
  • मेहकर येथे आशिया खंडातील एकमेव पाषाणातील भाविकानचे श्रद्धास्थान शारंगधर बालाजी देवस्थान आहे.
  • मेहकर पासून ५ किमी अंतरावर असणाऱ्या उकळी येथे जगदंबा माता देवस्थान , श्री सिद्धेश्वर संस्थान आहे
  • लोणार पासून 18 कि मी अंतरावर श्री खटकेश्वर महाराज मंदिर ब्राम्हण चिकना या ठिकाणी आहे ...
  • बुलडाणा जिल्ह्यातील १८ किमी जवळच असलेल्या गिरडा या गावामध्ये प्रसिद्ध असलेल्या गजानन महाराज संस्थान द्वारा संचालित श्री स्वयंम प्रकाश महाराजांचे मंदिर आहे,तसेच गिरडा हे गाव निसर्ग पर्यटनाचे एक आकर्षण बिंदू आहे. येथील काळी भिंत ही पर्यटकांसाठी आकर्षक बाब आहे. निसर्गरम्य असलेल हे पर्यटन तसेच धार्मिक स्थळ बुलडाणा-अजिंठा राष्ट्रीय महामार्गावर आहे.

श्री क्षेत्र थळ ता.मोताळा श्री गजाननमहाराज जन्म स्थान प्रतिष्ठान

बुलढाणा शहरापासून जवळच 18 किमी दुर असलेले दुधा येथील प्रसिद्ध मर्डदी माता मंदिर आहे हे मंदिर जुन्या हेमाडपंथी पद्धतीचे आहे

बुलढाणा जिल्ह्यातील नद्या[संपादन | स्रोत संपादित करा]

जिल्ह्यातील तालुके[संपादन | स्रोत संपादित करा]

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]