हिवरा धरण

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट धरण

हिवरा मध्यम प्रकल्प हे जळगाव जिल्ह्यातील हिवरा नदीवरील खडकदेवळा या गावाजवळ बांधण्यात आलेले आहे. पाचोरा तालुक्यातील जवळजवळ ४२०४ हेक्टर क्षेत्र या धरणामुळे ओलिताखाली आलेले आहे.

सिंचन

हिवरा धरणाला डावा आणि उजवा असे दोन कॅनॉल आहेत. दोघं कॅनॉल मधून रब्बी हंगामासाठी पाण्याची आवर्तने सोडून ४२०४ हेक्टर जमीन ओलिताखाली आलेली आहे. हिवरा धरणातून रब्बी व उन्हाळी पिकांच्या सिंचनासाठी कॅनॉलद्वारे दरवर्षी पाण्याचा मोठा विसर्ग पाचोरा तालुक्यात होत असतो.

पाणी पुरवठा

तारखेडा, जारगाव या शेजारील गावांना हिवरा धरणातून पिण्यासाठी पाणी पुरवठा होतो. संबंधित गावांनी हिवरा धरणामागे सरकारच्या परवानगीने विहीर खोदून पाणी गावांपर्यंत नेले आहे.


पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार नद्या

पहा : महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे साचा:महाराष्ट्रातील धरणे