मनमाड रेल्वे स्थानक
साचा:माहितीचौकट रेल्वे स्थानक साचा:कल्याण-भुसावळ रेल्वेमार्ग मनमाड रेल्वे स्थानक उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक मध्य रेल्वेच्या मनमाड-सिकंदराबाद मार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक असून अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्या येथे थांबतात.
हे स्थानक दक्षिण मध्य रेल्वेच्या मुंबई-नागपूर-हावडा मार्गावरील एक महत्त्वाचे स्थानक असून लांब पल्ल्याच्या जवळजवळ सगळ्या रेल्वेगाड्या येथे थांबतात. येथून दौंडकडे आणि पूर्णाकडे जाणारे लोहमार्गही आहेत. वसई-दिवा लोहमार्ग तयार होईपर्यंत पश्चिम व उत्तर भारतातून दक्षिणेकडे जाणाऱ्या अनेक रेल्वेगाड्या भुसावळ-मनमाड-दौंडमार्गे जात असत. मनमाड-इंदूर हा नवा रेल्वेमार्ग बांधून पूर्ण झाल्यानंतर अनेक लांब पल्ल्याच्या गाड्यांचे अंतर कमी होईल.
इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]
भारतातील पहिला रेल्वेमार्ग १९५३मध्ये कार्यान्वित झाल्यानंतर हा मार्ग कोलकात्याकडे झपाट्याने वाढविण्यात आला. १८५४ च्या मे महिन्यात कल्याण, १८६० मध्ये भुसावळ तर १८६७मध्ये हा मार्ग नागपूर रेल्वे स्थानकला जाउन पोचला.[१][२] मनमाड रेल्वे स्थानक १८६६मध्ये बांधून कार्यान्वित झाले. सुमारे शंभर वर्षांनंतर १९६८साली या स्थानकातील मार्गाचे विद्युतीकरण झाले.[३]
येथे सुरुवात/शेवट होणाऱ्या गाड्या[संपादन | स्रोत संपादित करा]
| गाडी क्र. | गाडी नाव | गंतव्यस्थान |
|---|---|---|
| १२१०९ / १२११० | पंचवटी एक्सप्रेस | मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस |
| १२११७ / १२११८ | गोदावरी जलद एक्सप्रेस | लोकमान्य टिळक टर्मिनस |
| १७०६३ / १७०६४ | अजिंठा एक्सप्रेस | सिकंदराबाद |
| १७६८७ / १७६८८ | मराठवाडा एक्सप्रेस | धर्माबाद |
| २२१०१ / २२१०२ | मनमाड लोकमान्य टिळक टर्मिनस राज्यराणी एक्सप्रेस | लोकमान्य टिळक टर्मिनस |