श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालय
साचा:माहितीचौकट महाविद्यालय/temp
श्रीमती गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालय हे मुक्ताईनगर (जिल्हा जळगाव) येथील एक महाविद्यालय आहे. यास जी.जी. खडसे महाविद्यालय या संक्षिप्त नावनेही ओळखले जाते. हे महाविद्यालय उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्न आहे.[१][२]
इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]
या महाविद्यालयाची स्थापना १३ जुलै १९९० रोजी झाली. येथे सुरुवातीला फक्त विज्ञान शाखेचा अभ्यासक्रम होता नंतर कला शाखेच्या अभ्यासक्रम समाविष्ट करण्यात आला. हे महाविद्यालयास न्याक कडून 'ब' श्रेणी मिळाली आहे.[३] माजी महसूल मंत्री आणि मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार एकनाथ खडसे यांच्या आईचे नावावरून या महाविद्यालयाच नाव गोदावरीबाई गणपतराव खडसे महाविद्यालय ठेवण्यात आले आहे.
अभ्यासक्रम[संपादन | स्रोत संपादित करा]
या विद्यालयात कला व विज्ञान शाखांचा पदवी व पदवीत्तर अभ्यासक्रम शिकवला जातो. येथे दुसऱ्या शिक्षणासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ केंद्र सुद्धा आहे.
सुविधा[संपादन | स्रोत संपादित करा]
खडसे महाविद्यालयात भौतिकशास्त्र, जैवतंत्रज्ञान, वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र विषयांसाठी प्रयोगशाळा आहेत.[४] एक हेलिपॅड, एक जलतरण तलाव, इण्डोर सोर्ट्स हॉल, व पुस्तकालय आहेत. अध्यापणासाठी १३ वर्ग खोल्या आहेत. महिलांसाठी एक वसतिगृह आहे.[५]
संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ www.Khadse college.in
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:Cite web
- ↑ साचा:Cite web