सोमनाथ वाघमारे
Appearance

सोमनाथ वाघमारे हे एक भारतीय लघुपट माहितीपट निर्माते आहेत.[१] ते महाराष्ट्र राज्यातील आहेत. त्यांचा सर्वात महत्त्वाचा आणि अगदी अलीकडील चित्रपट, द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव: एन अनएंडिंग जर्नी[२] होता, ज्याची समीक्षा भारत व परदेशात झाली.[३][४][५] आत्तापर्यंत त्यांचे सर्व चित्रपट डॉक्युमेंटरी चित्रपट होते आणि त्यांनी महाराष्ट्रातील महिलांचा छळ आणि दलित उत्पिडन यासारख्या विविध सामाजिक समस्यांना चित्रपटांत मांडले आहे.[६] आय एम नॉट अ विच (२०१७) या लघुपट माहितीपटातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले.[७] त्यांचा आगामी चित्रपट म्हणजे चैत्यभूमी (जे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समाधीस्थळ आणि दलित अस्मितेचे प्रतीक आहे) आणि गेल एंड भरत हे होय.
फिल्मोग्राफी[संपादन | स्रोत संपादित करा]

दिग्दर्शक म्हणून[संपादन | स्रोत संपादित करा]
| वर्ष | चित्रपट |
|---|---|
| २०१६ | आय एम नॉट अ विच |
| २०१७ | द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव: एन अनएंडिंग जर्नी |
| २०२० | राजगृह स्टड्स टॉल |
| २०२१ | गेल एंड भरत |