साचा:माहितीचौकट साहित्यिक

उत्तम कांबळे हे संपादक, पत्रकार आणि साहित्यिक आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील टाकळीवाडी गावी शेतमजूर कुटुंबात त्यांचा जन्म झाला. उत्तम कांबळे यांचे मूळ गाव बेळगावमधील शिरगुप्पी आहे.[]

शिक्षण संपादन

उत्तम कांबळे यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण टाकळीवाडी व बेळगावमधील रायबागमध्ये झाले. राज्यशास्त्रात पदवी घेतली. प्रतिकूल आर्थिक परिस्थिती असल्याने, कंपाउंडर, बाइंडर, वर्तमानपत्रविक्रेता, हमाली, आणि बांधकाम आणि अन्य मजुरीची कामे करीत त्यांनी शिक्षण पूर्ण केले.

कारकीर्द संपादन

कांबळ्यांनी शिक्षणानंतर त्यांनी काही काळ कॉलेजांमध्ये नोकरी केली. त्यांनी शिवाजी विद्यापीठातील वृत्त विद्या विभागात दोन वर्षे, आणि नाशिकच्या एच.पी.टी कॉलेजमध्ये दोन वर्षे अध्यापन केले.

उत्तम कांबळे यांनी १९७९ मध्ये कोल्हापूरच्या दैनिक ’समाज’मधून त्यांनी पत्रकारितेला प्रारंभ केला. १९८२ मध्ये ते सकाळमध्ये बातमीदार म्हणून रुजू झाले. मे २००९ पासून ते सकाळ समूहाचे मुख्य संपादक म्हणून काम पाहत असत. ‘सकाळ’च्या सप्तरंग पुरवणीत ते ‘फिरस्ती’ नावाचे सदर लिहीत असत. त्यांतल्या निवडक २५ लेखांचे पुस्तक ‘उजेड अंधाराचं आभाळ’ या नावाने प्रसिद्ध झाले आहे. विविध समस्यांवर मात करत लढणाऱ्या माणसांच्या व्यक्तिरेखा या लेखांतून त्यांनी रेखाटल्या आहेत.

कांबळे यांचे 'आई समजून घेताना' हे आत्मकथनपर पुस्तक गुलबर्गा विद्यापीठात एम.ए.च्या अभ्यासक्रमाचा भाग बनले आहे. या पुस्तकाचे ब्रेललिपीत रूपांतर झाले आहे, तसेच कानडी भाषेत आणि इंग्रजीतही अनुवाद झाले आहेत.

उत्तम कांबळे यांचे प्रकाशित साहित्य संपादन

  • कादंबऱ्या - अस्वस्थ नायक, कोयत्याचं कोक, बुद्धाचा रहाट, श्राद्ध, पन्नास टक्क्यांची ठसठस, मिरवणूक
  • कथासंग्रह - कथा माणसांच्या, कावळे आणि माणसं, न दिसणारी लढाई, परत्या, रंग माणसांचे
  • ललित - अखंड घालमेल, उजेड अंधाराचं आभाळ, कुंभमेळ्यात भैरू, थोडंसं वेगळं, निवडणुकीत भैरू
  • कवितासंग्रह - जागतिकीकरणात माझी कविता, नाशिक तू एक सुंदर कविता
  • आत्मकथन - आई समजून घेताना, एका स्वागताध्यक्षाची डायरी, माझी प्रयोगशील पत्रकारिता (शब्दांकन - दीप्ती राऊत), वाट तुडवताना
  • संशोधनपर ग्रंथ - अनिष्ट प्रथा, कुंभमेळा साधूंचा की संधिसाधूंचा?, देवदासी आणि नग्नपूजा, भटक्यांचे लग्न, वामनदादांच्या गीतांतील भीमदर्शन

साहित्य संमेलनातील सहभाग संपादन

उत्तम कांबळे यांनी अनेक साहित्य संमेलनांचे अध्यक्षपद भूषविले. सांगली येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते स्वागताध्यक्ष होते तर, ८४ व्या ठाणे येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. नंतर चंद्रपूर येथे फेब्रुवारी २०१२ मध्ये झालेल्या ८५व्या अधिवेशनात उत्तम कांबळे यांनी नूतन अध्यक्ष वसंत आबाजी डहाके यांच्या हाती अध्यक्षपदाची सूत्रे दिली.

पत्रकारिता संपादन

पुरस्कार संपादन

पत्रकारितेतील त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेत १९९३ मध्ये त्यांना दर्पण पुरस्काराने गौरविण्यात आले. त्यांना पत्रकारितेसाठी २०१२ सालापर्यंत एकूण ५३ पुरस्कार मिळाले आहेत.

इतर पुरस्कार संपादन

  • अंधश्रद्धा निर्मूलन व धर्म चिकित्सेसाठी `आगरकर' पुरस्कार. (सप्टेंबर १९९५)
  • भारतरत्‍न डॉ.बाबासाहेब आंबेडकर लोकपत्रकारिता पुरस्कार, नागपूर (डिसेंबर २००९)
  • भवतु सब्ब मंगलम संस्था, मुंबईतर्फे `डॉ. बाबासाहेब आंबेडकर' पुरस्कार.
  • आशादीप पुरस्कार, पनवेल (मार्च २०१०)
  • इंदिरा गांधी पुरस्कार (मे २००९)
  • जयसिंगपूर येथे मिळालेला चंद्रभागातिरी पुरस्कार (जानेवारी २००८)
  • महाड येथील `जनार्दन मवाडे स्मृती' पुरस्कार. (मार्च - २००४)
  • दया पवार प्रतिष्ठानतर्फे `दया पवार' साहित्य पुरस्कार.
  • पत्रकारितेसाठी `दर्पण' पुरस्कार. (जानेवारी १९९३)
  • भालेराव प्रतिष्ठान, जळगावतर्फे `दलित अस्मिता पुरस्कार' (फेब्रुवारी २००५)
  • `दीन बंधू' पत्रकारिता पुरस्कार. (फेब्रुवारी २००४)
  • दीनमित्रकार मुकुंदराव पाटील पत्रकारिता पुरस्कार - अहमदनगर (डिसें.२००९)
  • पत्रकारितेसाठी सह्याद्री वाहिनीचा `नवरत्‍न पुरस्कार' (एप्रिल २००८)
  • उत्तम लेखनासाठी मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार.
  • सिन्नर तालुका पत्रकार संघातर्फे `प्रकाशशेठ शहा' पुरस्कार.
  • सांगलीतील प्रतिष्ठा प्रतिष्ठानचा पुरस्कार
  • पत्रकारिता व साहित्यासाठी प्रबोधनमित्र पुरस्कार, नाशिक (मे २००९)
  • महाराष्ट्र गौरव पुरस्कार - आयआयटीतर्फे, मुंबई (ऑगस्ट २००९)
  • पुण्यातील लोकजागर पुरस्कार (जाने.२००८)
  • पुणे रोटरी क्लबचा ‘व्होकेशनल’ पुरस्कार (मार्च २०१०)
  • रत्‍नागिरी येथील महाराष्ट्र पत्रकार संघातर्फे `संपादक भूषण' पुरस्कार.
  • महात्मा फुले समता परिषदेतर्फे `समता पुरस्कार'. (नोव्हेंबर २००५)
  • महाराष्ट्र फौंडेशन (अमेरिका) यांच्यातर्फे डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार-२०१५

साहित्यनिर्मितीसाठीचे पुरस्कार संपादन

  • `अनिष्ट प्रथा' ग्रंथासाठी राज्य शासनाचा पुरस्कार. (मार्च १९९३)
  • `अस्वस्थ नायक` कादंबरीसाठी युगांतर प्रतिष्ठानचा `बंधुमाधव' पुरस्कार. (जाने. २००१)
  • अक्षरगंध साहित्य पुरस्कार, प्रणव प्रतिष्ठान, श्रीपूर, सोलापूर (डिसे. २००७)
  • ‘आई समजून घेताना या पुस्तकासाठी यशवंतराव चव्हाण साहित्यिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय उत्तम वाङ्‌मय पुरस्कार (२८-९-२०१५)
  • `आई समजून घेताना' साठी वाङ्‌मयसेवा प्रकाशन पुरस्कार, नाशिक (मार्च २००९)
  • `आई समजून घेताना' साठी स्वामीकार पुरस्कार, पुणे (एप्रिल २००८)
  • `आई समजून घेताना` साठी माने गुरुजी साहित्य पुरस्कार (डिसें. २००६)
  • आचार्य अत्रे पुरस्कार - बेळगाव (ऑगस्ट २००८)
  • इस्लामपूर येथील जागर साहित्य पुरस्कार (फेब्रु. २००८)
  • `कुंभमेळा साधूंचा की संधीसाधूं'चा साठी मराठी साहित्य परिषदेचा केशवराव विचारे पुरस्कार (मे १९९३)
  • कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, बोरीभडक, दौंड (मे २०१०)
  • क्रांतिअग्रणी पुरस्कार, कुंडल (डिसें. २००७)
  • ‘गजाआडच्या कविता’ या कैद्यांच्या संपादित काव्यसंग्रहासाठी माचीगड (बेळगाव) येथील सुब्रह्मण्यम साहित्य अकादमीचा `श्री गणेश स्मृती' पुरस्कार. (जानेवारी २००३)
  • `जागतिकीकरणात माझी कविता' या काव्यसंग्रहासाठी यशवंत मनोहर पुरस्कार (जून २००७)
  • `जागतिकीकरणात माझी कवितासाठी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचा विशाखा पुरस्कार (फेब्रु. २००८)
  • . `देवदासी आणि नग्नपूजा` पुस्तकासाठी लोकायत विचार मंचचा `लोकायत' पुरस्कार.(मे २००१)
  • अंबाजोगाई येथील (कै.) नरहर कुरुंदकर स्मृती संस्थेतर्फे दिला जाणारा नरहर कुरुंदकर साहित्य पुरस्कार[]
  • 'नाशिक तू एक सुंदर कविता' या खंडकाव्यासाठी शालिनी बनहट्टी पुरस्कार (मे २००९)
  • परिवर्तनवादी साहित्य प्रबोधिनीतर्फे `परिवर्तनवादी कवी' पुरस्कार.
  • `प्रथा अशी न्यारी' ग्रंथासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुरस्कार.
  • लेखनाद्वारे प्रबोधन केल्याबद्दल `बंधुता' पुरस्कार.(जून १९९७)
  • ‘बुद्धाचा ऱ्हाट’ या पुस्तकासाठी महाराष्ट्र फाउंडेशनचा डॉ. नरेंद्र दाभोळकर स्मृति पुरस्कार
  • `रंग माणसांचे' कथासंग्रहासाठी मुक्त विद्यापीठाचा `;;बाबूराव बागूल]]' पुरस्कार.(ऑक्टो.१९९७)
  • `रंग माणसांचे' कथासंग्रहासाठी `ग.दि. माडगूळकर' पुरस्कार.(ऑगस्ट १९९७)
  • `रंग माणसांचे' कथासंग्रहासाठी `वा.ना.पंडित' पुरस्कार.
  • `रंग माणसांचे' कथासंग्रहासाठी '`कुसुमाग्रज' पुरस्कार.
  • रंग माणसांचे कथासंग्रहासाठी `संत ज्ञानेश्वर' पुरस्कार. (ऑगस्ट २००१)
  • `लढणाऱ्याच्या मुलाखती’साठी राज्य शासनाचा डॉ.व्ही.बी. कोलते पुरस्कार (डिसें. २००८)
  • `वाट तुडवताना' या आत्मचरित्राला `अस्मितादर्श' वाड्मय पुरस्कार. (फेब्रुवारी २००४)
  • `वाट तुडवताना' या आत्मचरित्रासाठी राज्य शासनाचा वाङ्‌मयनिर्मिती पुरस्कार (डिसें. २००५)
  • `वाट तुडवताना'साठी शिवगिरिजा प्रतिष्ठानचा कदम गुरुजी पुरस्कार, कुर्डूवाडी (डिसें. २००४)
  • `श्राद्ध' कादंबरीसाठी राज्य शासनाचा पुरस्कार.
  • सांगाती साहित्य अकादमीचा साहित्य पुरस्कार, बेळगाव (मे १९९९)

बाह्य दुवे संपादन

संदर्भ संपादन

साचा:मराठी साहित्यिक