एच.पी.सी.ए. मैदान

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

साचा:माहितीचौकट क्रिकेट मैदान

हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन मैदान, संक्षिप्त रुप एचपीसीए मैदान, हे हिमाचल प्रदेश, भारत येथील धरमशाला शहरात वसलेले एक क्रिकेटचे मैदान आहे. धरमशाला शहर हे तिबेटच्या दलाई लामा यांचे घर म्हणून जगात सुप्रसिद्ध आहे.

स्थान आणि इतिहास

सदर मैदान हे हिमाचल प्रदेश क्रिकेट संघाचे रणजी करंडक आणि इतर मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठीचे होम ग्राऊंड आहे. किंग्स XI पंजाबचे होम ग्राऊंड म्हणून ह्या मैदानावर आयपीएलचे अनेक सामने झाले आहेत.[१]

हे मैदान समुद्रसपाटीपासून साचा:Height इतक्या उंचीवर वसलेले असून त्याची पार्श्वभूमी बर्फाच्छादित हिमालयाने व्यापलेली आहे. धरमशालाला पोहोचण्यासाठी जवळचे विमानतळ ८ किलोमीटर वर गग्गल हे आहे. असह्य हिवाळा, ज्यामध्ये पडणारा पाऊस आणि हिमवर्षाव ह्या मुळे येथे नियमित सामने होऊ शकत नाहीत.

भारतीय राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे माजी संचालक डेव्ह व्हॉटमोर यांनी त्यांच्या कार्यकालात सदर मैदान आंतरराष्ट्रीय सामने खेळवण्यासाठी योग्य असल्याची शिफारस केली. मैदानावर खेळणारा पहिला आंतरराष्ट्रीय संघ पाकिस्तानचा होता. ते २००५ मध्ये भारत अ संघाविरुद्ध एक सामना खेळले.[१]

मैदानावर पहिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना भारत आणि इंग्लंड दरम्यान जानेवारी २०१३ मध्ये खेळवला गेला, ज्यामध्ये इंग्लंडने गडी राखून विजय मिळवला. १७ ऑक्टोबर २०१४ रजी भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या सामन्यात भारताने वेस्ट इंडीजला ५९ धावांनी पराभूत केले.

साचा:Wide image

नोव्हेंबर २०१५ मध्ये, सदर मैदान आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटच्या भारतातील सहा नवीन मैदानांपैकी एक म्हणून निवडले गेले. इतर स्थळांमध्ये महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, होळकर क्रिकेट मैदान, सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, जेएससीए आंतरराष्ट्रीय मैदान संकुल आणि डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी एसीए-व्हिडीसीए क्रिकेट मैदान ह्या मैदानांचा समावेश होता.[२]

एसीसी सेंटर ऑफ एक्सलन्स

डिसेंबर २०१५ मध्ये, आशियाई क्रिकेट परिषदेने धरमशाला येथे पहिले एक्सलन्स सेंटर उभारण्याचे ठरवले.[३] ह्या एक्सलन्स सेंटरमार्फत उपखंडातील आणि काही असोसिएट देशांच्या खेळाडू आणि प्रशिक्षकांच्या विकासासाठी मदत करण्याचा परिषदेचा हेतू आहे.

२०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२०

२१ जुलै २०१५ रोजी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने २०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२० साठी मैदानांची घोषणा केली. स्पर्धेसाठीच्या निवडक आठ मैदानांपैकी एक नाव होते, धरमशाला.[४] ११ डिसेंबर २०१५, रोजी वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली, त्यानुसार एचपीसीए मैदानाकडे अ गटाचे सर्व सामने आणि सुपर १० गटाच्या एका सामन्याचे यजमानपद देण्यात आले.[५]

भारत वि पाकिस्तानचा सामना सुरुवातीला ह्या मैदानावर होणार होता.[६] परंतु पाकिस्तानी संघाला गरजेची सुरक्षा पुरवण्याबाबत एचपीसीएने असमर्थता दर्शविली,[७] आणि सदर सामना इडन गार्डन्स, कोलकाता येथे हलविण्यात आला.[८]

आंतरराष्ट्रीय सामन्यांची यादी

एकदिवसीय

आजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[९]:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
२७ जानेवारी २०१३ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ७ गडी धावफलक
१७ ऑक्टोबर २०१४ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ५९ धावा धावफलक
१६ ऑक्टोबर २०१६ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ६ गडी धावफलक

टी २०

आजवर मैदानावर झालेल्या एकदिवसीय सामन्यांची यादी खालीलप्रमाणे[१०]:

दिनांक संघ १ संघ २ विजयी संघ फरक धावफलक
२ ऑक्टोबर २०१५ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ७ गडी धावफलक
९ मार्च २०१६ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ८ धावा धावफलक
९ मार्च २०१६ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr २ गडी धावफलक
११ मार्च २०१६ साचा:Cr साचा:Cr अनिर्णित धावफलक
११ मार्च २०१६ साचा:Cr साचा:Cr अनिर्णित धावफलक
१३ मार्च २०१६ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr १२ धावा धावफलक
१३ मार्च २०१६ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ५४ धावा धावफलक
१८ मार्च २०१६ साचा:Cr साचा:Cr साचा:Cr ८ धावा धावफलक

संदर्भ आणि नोंदी

साचा:संदर्भयादी साचा:भारतातील क्रिकेट मैदाने