मराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांची यादी

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

दूरचित्रवाणी हा आज प्रत्येकाच्या जगण्याचा अविभाज्य भाग आहे. जगातील अनेक भाषांमध्ये आज घडीला अनेक नानाविध प्रकारच्या दूरचित्रवाणी वाहिन्या उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा आज अनेक प्रकारच्या दूरचित्रवाणी वाहिन्या उपलब्ध आहेत. परंतु मराठी भाषेमध्ये पहिल्यांदा दूरचित्रवाणी कधी सुरू झाली आणि मराठी दूरचित्रवाणी क्षेत्राची प्रगती कशी होत गेली याचा मागोवा या लेखामध्ये घेतला आहे.

इतिहास

भारतामध्ये इ.स. १९६५ पासून दूरचित्रवाणीच्या नियमित प्रसारणाची सुरुवात झाली. भारत सरकार अंगीकृत प्रसार भारती अर्थात दूरदर्शनच्या दिल्ली केंद्रातून हिंदी भाषेतील दूरचित्रवाणीची सुरुवात झाली. दूरदर्शनने मराठी भाषेतील कार्यक्रमाची प्रसारण सेवा दि. २ ऑक्टोबर १९७२ अर्थात महात्मा गांधी जयंती पासून मुंबई दूरदर्शन केंद्राद्वारे सुरू केली. प्रथमत: दूरदर्शनच्या राष्ट्रीय वाहिनीवरून मराठी भाषेतील कार्यक्रमांचे केवळ २ तासांचे तेही कृष्ण-धवल प्रसारण होत असे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने या प्रसारणाचा कालावधी वाढवून इ.स. १९९४ पर्यंत ६ तासांपर्यंत मराठी कार्यक्रमांचे प्रसारण केले जाई. ५ काड्यांच्या/१० काड्यांच्या अँटिनाद्वारे व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील स्थित दूरदर्शनच्या लघु तसेच उच्चशक्ती उपकेंद्रांद्वारे हे प्रसारण होत असे. त्या ६ तासांच्या कालावधीमध्ये देखील बातम्या, नाट्य, संगीत, शेतीविषयक, सामाजिक, राजकीय, क्रीडा अशा विविध अंगी कार्यक्रमांद्वारे मनोरंजनातून प्रबोधन या दूरदर्शनच्या बोधवाक्याला जप्त दूरदर्शनने कार्यक्रमांची मेजवानी प्रेक्षकांना दिली होती.

वर्ष १९९४

२४ तास प्रसारित होणारी पहिली मराठी वाहिनी दूरदर्शन मराठीची सुरुवात दि. १५ ऑगस्ट १९९४ला झाली. ही पहिली मराठी उपग्रह वाहिनी होय. ही वाहिनी प्रथम DD-10 या नावाने लोकप्रिय होती, त्यानंतर या वाहिनीचे दि. ०५ एप्रिल २०२०ला DD -१० चे दूरदर्शन सह्याद्री असे नामकरण करण्यात आले. दामिनी, घरकुल, हॅलो सह्याद्री, हॅलो इन्स्पेक्टर, गजरा, किलबिल, आमची माती आमची माणसं, तक धिना धिन यासारखे त्यावेळचे दूरदर्शनवरील कार्यक्रम जनमानसात लोकप्रिय होते.

वर्ष १९९९

वर्ष १९९९ हे मराठी दूरचित्रवाणी प्रेक्षकांसाठी विशेष ठरले कारण दि. १५ ऑगस्ट १९९९ अर्थात भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या शुभमुहूर्तावर मुंबईस्थित झी नेटवर्क उद्योग समूहाने मराठी भाषेतील पहिली खाजगी उपग्रह वाहिनी अल्फा मराठी प्रेक्षकांच्या सेवेत रुजू केली. कालांतराने दि. २७ मार्च २००५ रोजी नामकरण झी मराठी असे करण्यात आले. झी मराठीच्या रूपाने मराठी दूरचित्रवाणी क्षेत्रात एक नवी क्रांती झाली कारण, झी मराठी म्हणजे आजच्या विस्तृत मराठी दूरचित्रवाणी क्षेत्राची नांदीच. नानाविध दैनंदिन मालिका, चित्रपट, नृत्य, नाट्य, गायन, हास्य इ. विविधांगी कलाप्रकारांना चालना देण्याच्या उद्देशाने नानाविध प्रकारच्या स्पर्धा झी मराठीने सुरू केल्या.

वर्ष २०००

झी मराठी नंतर वर्ष २००० मध्ये आणखी एक मराठी मनोरंजन वाहिनी प्रेक्षकांच्या सेवेत दाखल झाली ती ई टीव्ही मराठी. हैद्राबाद येथील प्रसिद्ध उद्योगपती म्हणजेच रामोजीराव यांच्या ई टीव्ही नेटवर्कने दि. ०९ जुलै २०००[१] रोजी ई टीव्ही मराठीची स्थापना केली. या वाहिनीने देखील अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले. कालांतराने दि. २२ मार्च २०१५[२] रोजी या वाहिनीचे कलर्स मराठी असे नामकरण करण्यात आले. या वाहिनीच्या चार दिवस सासूचे, या गोजिरवाण्या घरात, बिग बॉस मराठी, सूर नवा ध्यास नवा, कॉमेडी एक्सप्रेस, कोण होणार करोडपती अशा अनेक दर्जेदार कार्यक्रमांना प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले. याच काळात इतर दोन मराठी दूरचित्रवाणी वाहिन्या तारा मराठी आणि प्रभात मराठी देखील सुरू झाल्या परंतु कालांतराने त्या बंद झाल्या.

वृत्त वाहिनी

एकेकाळी टीव्हीवरून मराठी भाषेत केवळ १ किंवा २ तास बातम्या दाखविल्या जायच्या, तेथे आता संपूर्ण २४ तास वृत्तप्रसारण करणाऱ्या वाहिन्या सुरू झाल्या आहेत. मराठी भाषेतील २४ तास बातम्या देणारी झी २४ तास ही पहिली मराठी वृत्तवाहिनी २००७ साली सुरू झाली.

त्यानंतर जून २००७ मध्ये दुसरी वृत्तवाहिनी स्टार इंडियाने स्टार माझा ह्या नावाने सुरू केली आणि ०१ जून २०१२ नंतर या वाहिनीचे नाव एबीपी माझा असे बदलण्यात आले. न्यूज १८ आणि लोकमत या दोन कंपन्यांनी मिळून आयबीएन लोकमत ही वृत्तवाहिनी २००८ साली सुरू केली आणि नंतर या वाहिनीचे नाव न्यूज १८ लोकमत करण्यात आले.

साम टीव्ही ही वाहिनी प्रसिद्ध मराठी वृत्तपत्र समूह सकाळने २००८ साली सुरू केली. यानंतर २००९ मध्ये एबीसीएल ग्रुपने टीव्ही ९ मराठी ही वाहिनी चालू केली. २०१३ मध्ये सहावी मराठी वृत्तवाहिनी जय महाराष्ट्र सुरू झाली.

चित्रपट वाहिनी

झी टॉकीज[३] ही पहिली मराठी चित्रपट वाहिनी नोव्हेंबर २००७ मध्ये सुरू झाली. अनेक दर्जेदार मराठी चित्रपटांची निर्मिती व प्रसारण ह्या वाहिनीद्वारे केले जाते.

संगीत वाहिनी

९x झकास [४] ह्या पहिल्या २४ तास चालणाऱ्या मराठी संगीत वाहिनीची सुरुवात दिनांक ३१ ऑक्टोबर २०११ रोजी झाली. दुसरी मराठी संगीत वाहिनी १८ सप्टेंबर २०१५ रोजी संगीत मराठी या नावाने सुरू झाली. तिसरी मराठी संगीत वाहिनी १७ ऑक्टोबर २०२० रोजी झी वाजवा या नावाने सुरू झाले.[५]

वाहिन्यांची यादी

मनोरंजन वाहिन्या

अ. क्र. वाहिनीचे नाव नेटवर्क नाव स्थापना वर्ष
०१ दूरदर्शन सह्याद्री प्रसार भारती दूरदर्शन १९७२
०२ झी मराठी झी नेटवर्क १९९९
०३ स्टार प्रवाह स्टार इंडिया २००८
०४ कलर्स मराठी व्हायाकॉम १८ २०००
०५ सोनी मराठी सोनी नेटवर्क २०१८
०६ सन मराठी सन नेटवर्क २०२१

वृत्त वाहिन्या

अ. क्र. वाहिनीचे नाव नेटवर्क नाव स्थापना वर्ष
०१ झी २४ तास झी नेटवर्क २००७
०२ एबीपी माझा एबीपी न्यूज नेटवर्क २००७
०३ न्यूज १८ लोकमत न्यूज १८ नेटवर्क २००८
०४ टीव्ही ९ मराठी एबीसीएल नेटवर्क २००९
०५ जय महाराष्ट्र साहना मीडिया २०१३
०६ साम टीव्ही साम नेटवर्क २००७
०७ लोकशाही न्यूज स्वराज मराठी २०२०

चित्रपट वाहिन्या

अ. क्र. वाहिनीचे नाव नेटवर्क नाव स्थापना वर्ष
०१ झी टॉकीज झी नेटवर्क २००७
०२ शेमारू मराठी बाणा शेमारू नेटवर्क २०२०
०३ झी युवा झी नेटवर्क २०१६
०४ झी चित्रमंदिर झी नेटवर्क २०२१
०५ फक्त मराठी एंटर १० २०११

संगीत वाहिन्या

अ. क्र. वाहिनीचे नाव नेटवर्क नाव स्थापना वर्ष
०१ ९x झकास आयएनएक्स नेटवर्क २०११
०२ संगीत मराठी त्रिवेणी मीडिया २०१५
०३ झी वाजवा झी नेटवर्क २०२०
०४ मायबोली नेटवर्क २०१४

एचडी वाहिन्या

अ. क्र. वाहिनीचे नाव नेटवर्क नाव स्थापना वर्ष
०१ स्टार प्रवाह HD स्टार इंडिया २०१६
०२ कलर्स मराठी HD व्हायाकॉम १८ २०१५
०३ झी टॉकीज HD झी नेटवर्क २०१६
०४ झी मराठी HD झी नेटवर्क २०१६

सर्वात जास्त टीआरपी कार्यक्रम

क्रमांक वाहिनी मालिका टीआरपी आठवडा, वर्ष
झी मराठी सैराट १३.७ आठवडा ४०, २०१६
झी मराठी माझ्या नवऱ्याची बायको ८.३ आठवडा ३४, २०१८
झी मराठी झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०१८ ८.० आठवडा ४४, २०१८
झी मराठी तुला पाहते रे ७.८ आठवडा २, २०१९
स्टार प्रवाह स्टार प्रवाह परिवार पुरस्कार ७.७ आठवडा १४, २०२१
स्टार प्रवाह फुलाला सुगंध मातीचा ७.६ आठवडा १४, २०२१
झी मराठी तुझ्यात जीव रंगला ७.३ आठवडा ४२, २०१९
स्टार प्रवाह सुख म्हणजे नक्की काय असतं! ७.० आठवडा २१, २०२१
स्टार प्रवाह मुलगी झाली हो ६.७ आठवडा १४, २०२१
१० स्टार प्रवाह रंग माझा वेगळा ६.५ आठवडा १९, २०२१
११ झी मराठी अग्गंबाई सासूबाई ५.८ आठवडा ४५, २०१९
१२ झी मराठी लागिरं झालं जी ५.७ आठवडा २६, २०१९
१३ झी मराठी स्वराज्यरक्षक संभाजी ५.६ आठवडा ४३, २०१८
१४ झी मराठी चला हवा येऊ द्या ५.५ आठवडा ३५, २०१८
१५ स्टार प्रवाह आई कुठे काय करते! ५.४ आठवडा ३२, २०२१
१६ झी मराठी देवमाणूस ५.३ आठवडा २२, २०२१
१७ स्टार प्रवाह सहकुटुंब सहपरिवार ४.९ आठवडा ५२, २०२०
१८ झी मराठी तुझं माझं ब्रेकअप ४.५ आठवडा ३३, २०१८
१९ झी मराठी मिसेस मुख्यमंत्री ४.५ आठवडा ३९, २०१९
२० झी मराठी लग्नाची वाईफ वेडिंगची बायकू ४.३ आठवडा ४४, २०१९

महाएपिसोड

क्रमांक वाहिनी मालिका टीआरपी आठवडा, वर्ष
झी मराठी तुझ्यात जीव रंगला २ तास ५.८ आठवडा १०, २०१७
झी मराठी देवमाणूस २ तास ५.४ आठवडा ३३, २०२१
स्टार प्रवाह सुख म्हणजे नक्की काय असतं! १ तास ५.३ आठवडा ५२, २०२०
स्टार प्रवाह रंग माझा वेगळा १ तास ५.१ आठवडा १, २०२१
झी मराठी तुझ्यात जीव रंगला १ तास ५.० आठवडा ४८, २०१७
स्टार प्रवाह फुलाला सुगंध मातीचा १ तास ४.३ आठवडा ६, २०२१
स्टार प्रवाह मुलगी झाली हो १ तास ४.२ आठवडा ५१, २०२०
झी मराठी होणार सून मी ह्या घरची २ तास ४.१ आठवडा ४२, २०१३
झी मराठी स्वराज्यरक्षक संभाजी १ तास ३.७ आठवडा १६, २०१८
१० झी मराठी खुलता कळी खुलेना १ तास ३.२ आठवडा ५२, २०१६
११ झी मराठी होम मिनिस्टर १ तास ३.१ आठवडा ४८, २०१७
१२ झी मराठी स्वराज्यरक्षक संभाजी २ तास २.९ आठवडा ५१, २०१७

सर्वात जास्त टीव्हीआर सोहळे

क्रमांक वाहिनी सोहळा टीव्हीआर आठवडा, वर्ष
झी मराठी झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०१८ ८.१ आठवडा ४४, २०१८
स्टार प्रवाह स्टार प्रवाह धुमधडाका २०२२ ७.५ आठवडा १, २०२२
स्टार प्रवाह स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२१ ७.३ आठवडा ३७, २०२१
झी मराठी झी मराठी उत्सव नात्यांचा पुरस्कार २०१७ ७.२ आठवडा ४२, २०१७
स्टार प्रवाह स्टार प्रवाह परिवार पुरस्कार २०२१ ७.१ आठवडा १४, २०२१

संदर्भ

साचा:संदर्भयादी