हिंदू विरोधी भावना

भारतपीडिया कडून
Jump to navigation Jump to search

हिंदू विरोधी भावना, ज्याला हिंदूफोबिया किंवा हिंदुत्व विरोध म्हणूनही ओळखले जाते, ही हिंदू धर्माच्या पाळण्याविषयी आणि हिंदू लोकांच्या विरोधात एक नकारात्मक समज, भावना किंवा कृती आहे हा एक प्रकारचा हिंदूंचा छळ आहे.

भारतामध्ये जगात सर्वाधिक हिंदू वास्तव्यास आहेत. भारतीय लोकांच्या अनुसार पाश्चात्य विद्वानांनी हिंदू धर्माला विकृत करून समाजामध्ये नकारात्मक दृष्टी कायम ठेवली आहे. याची सुरुवात भारतातील मॅकालेईझम पासून झाली. ऐतिहासिकदृष्ट्या, ब्रिटिशांनी विभाजन आणि राज्य करा या धोरणाचा एक भाग म्हणून, दक्षिण आशियातील अनेक प्रकारच्या रूढीवाद्यांना प्रवृत्त केले होते.

दक्षिण आशियातील जाती प्रणालीवर ही भेदभावपूर्ण असल्याची टीका केली जाते आणि बहुतेक वेळा हिला सांस्कृतिक विषयाऐवजी फक्त 'हिंदू' मुद्दा म्हणून पाहिले जाते. हा एक सामान्य गैरसमज आहे, कारण इस्लाम, शीख आणि ख्रिस्ती यासारख्या इतर धर्मातील काही अनुयायांनी भारतात जातीभेद ठेवण्याची प्रथा पाळली आहे.[१][२][३] ख्रिश्चन मिशनऱ्यांनी हिंदू प्रथेच्या निवडक वैशिष्ट्यांची टिका केली आहे; जसे की मूर्तिपूजा, सती आणि बालविवाह. यातिल मूर्तिपूजा ही इस्लाम मध्ये अमान्य असल्याने ह्यावर मुसलमानांकडूनही टीका केली गेली आहे.[४]

मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्म प्रचारक हिंदू देवांची निंदा करतात आणि हिंदू विधींना रानटी मानतात आणि अशा वृत्तीमुळे धार्मिक समुदायांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. हैदराबादमधील ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लीमीन पक्षाचे नेते अकबरुद्दीन ओवेसी यांच्यावर हिंदू देवतांची विटंबना करणारी आणि हिंदूंविरुद्ध हिंसाचार भडकावणारी द्वेषपूर्ण भाषणे केली आहेत. हिंदूंना ऐतिहासिकदृष्ट्या मुस्लिमांनी काफिर मानले आहे  आणि काही ख्रिश्चनांनी हेथन , सैतानिक किंवा राक्षसी मानले आहे .

भारतात हिंदूविरोधी विचारांचा इतिहास

मुस्लिम राज्यकर्ते

सोरठी सोमनाथचे इ.स. १८९६ मधील खंडर
मार्तंड सूर्य मंदिराचे अवशेष

मुहम्मद बिन तुघलकच्या कारकिर्दीत, मुस्लिम धर्मगुरू झियाउद्दीन बरानी यांनी फतवा-ए-जहंदारी या सारख्या अनेक कृती लिहिल्या ज्याने त्यांना "इस्लामचा धर्मांध नायक" म्हणून नावलौकिक मिळविले. त्याने लिहिले की "हिंदू धर्माविरूद्ध सर्वतोपरी संघर्ष" सुरू करावा. टिपू सुलतानच्या कारकिर्दीत हिंदूंवरही विविध अत्याचार झाले. १५व्या शतकाच्या सुरुवातीला काश्मीरवर राज्य करणाऱ्या शाह मीर राजघराण्याचा सहावा सुलतान सिकंदर बुत्शिकनने अनंतनाग जवळ असलेल्या मार्तंड सूर्य मंदिराचा नाश केला. तसेच महमूद गझनीने पण सोरठी सोमनाथ मंदिरावर पहिला हल्ला केला.

ब्रिटिश आणी पोर्तुगीज राज्य

भारतीय उपखंडाच्या ब्रिटीश आणी पोर्तुगीज राजवटीदरम्यान, अनेक ख्रिश्चन धर्मप्रसारकांनी हिंदूंना ख्रिस्ती धर्मात रूपांतरित करण्यासाठी हिंदूविरोधी प्रचार केला.

भारता बाहेर

पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, मलेशियासारख्या अनेक मुस्लिम बहुसंख्य देशांमध्ये हिंदू धर्माच्या लोकांना अत्याचाराचा सामना करावा लागतो. त्यांना काफिर म्हटले जाते. दक्षिण अफ्रिका, अमेरिका, इंग्लंड, त्रिनिदाद, फिजी आणि टोबॅगो यासारख्या देशांमध्येही हिंदूविरोधी भावना दिसतात.

पाकिस्तान

१९८० च्या दशकात पाकिस्तानमधील सार्वजनिक शालेय अभ्यासक्रमाचे इस्लामिकरण करण्यात आले. पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदूंविरुद्ध द्वेष निर्माण करणारी विधाने आहेत. सरकारने जारी केलेल्या पाठ्यपुस्तकांमधून विद्यार्थ्यांना शिकवले जाते की हिंदू हे मागासलेले आणि अंधश्रद्धाळू आहेत. यूएस सरकारच्या कमिशनच्या अभ्यासानुसार, पाकिस्तानी शाळांमधील पाठ्यपुस्तके हिंदू आणि इतर धार्मिक अल्पसंख्यांकांबद्दल पूर्वग्रह आणि असहिष्णुता वाढवतात आणि बहुतेक शिक्षक गैर-मुस्लिमांना इस्लामचे शत्रू मानतात.

पाकिस्तानी दहशतवादी गट लष्कर-ए-तोयबाचा नेता अमीर हमजा याने 1999 मध्ये "हिंदू की हकीकत" हिंदूची वास्तविकता" नावाचे हिंदू धर्माबद्दल अत्यंत अपमानास्पद पुस्तक लिहिले; त्याच्यावर पाकिस्तानी सरकारने कारवाई केली नाही. येथे मुत्ताहिदा मजलिस-ए-अमल ( MMA), हा पक्ष जाहिरनाम्यात हिंदुविरोधी भूमिका घेतलेला कर्मठ इस्लामी पक्ष कार्यरत आहे. पाकिस्तानमध्ये , लोकसंख्येच्या अनेक वर्गांमध्ये हिंदूविरोधी भावना आणि श्रद्धा मोठ्या प्रमाणावर आहेत. पाकिस्तानात हिंदूंच्या विरोधात असणे हा एक सामान्य प्रकार आहे.

अफगाणिस्तान

अफगाणिस्तानात तालिबानच्या राजवटीत हिंदू आणि शीख यासारख्या अल्पसंख्यांकांना मे २००१ मध्ये सार्वजनिक ठिकाणी बिल्ले घालायला सांगण्यात आले ज्याने हे लोक ओळखणे सुलभ झाले. असे नाझी जर्मनीने ज्यू लोकांना पिवळे बिल्ले घालण्यासाठी सक्ती केली होती.

मलेशियामध्ये विविध हिंदू मंदिरे नुकतीच तोडण्यात आली आहेत. २००९ मध्ये हिंदूंच्या मंदिरात गायींचे चिरलेली मुंडके फेकण्यात आली.

अमेरिका

इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये हिंदू धर्माच्या चित्रणावरून अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यात 2005 मध्ये वाद सुरू झाला. वेदिक फाउंडेशन (VF) आणि अमेरिकन हिंदू एज्युकेशन फाउंडेशन (HEF) यांच्या नेतृत्वाखाली कॅलिफोर्नियाच्या अभ्यासक्रम आयोगाकडे तक्रार करून निषेध करण्यात आला. सहाव्या इयत्तेतील इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमध्ये भारतीय इतिहास आणि हिंदू धर्म हिंदू धर्माविरुद्ध पक्षपाती होता; आणि वादाच्या मुद्द्यांमध्ये पाठ्यपुस्तकातील जातिव्यवस्थेचे चित्रण , इंडो-आर्यन स्थलांतर सिद्धांत आणि हिंदू धर्माची मुख्य वैशिष्ट्ये म्हणून भारतीय समाजातील स्त्रियांची स्थिती यांचा समावेश आहे.

कॅलिफोर्निया डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन (CDE) ने सुरुवातीला शिवा बाजपेयी, कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी नॉर्थ्रिज येथील प्रोफेसर एमेरिटस यांना गटांनी प्रस्तावित केलेल्या सुधारणांचे पुनरावलोकन करण्यासाठी एक सदस्यीय समिती म्हणून नियुक्त करून वाद सोडवण्याचा प्रयत्न केला.  मायकेल विट्झेल आणि इतरांनी राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने प्रस्तावित बदलांची पुनरावृत्ती केली आणि मंजूर केलेले काही बदल परतवण्याची सूचना केली.  2006च्या सुरुवातीस, हिंदू अमेरिकन फाउंडेशनने प्रक्रियेच्या प्रकरणांवर राज्य मंडळावर दावा दाखल केला.

अमेरिकेत हिंदुत्व विरोधाचे फील्ड मॅन्युअल तयार केले आहे. याद्वारे हिंदू धर्माचा विरोध केला जातो आहे.

संदर्भ

साचा:संदर्भयादी