साचा:माहितीचौकट भारतीय जिल्हा

साचा:जिल्हा सूचना

उस्मानाबाद जिल्हा (इंग्रजी मध्ये: Osmanabad district) हा महाराष्ट्रातील मराठवाड्यातला एक जिल्हा आहे. हैदराबादचा ७ वा निजाम मीर उस्मान अली खानच्या काळात शहराचे व जिल्ह्याचे धाराशिव नाव बदलून उस्मानाबाद नाव देण्यात आले. जिल्हा मुख्यालय उस्मानाबाद शहर येथे आहे. जिल्ह्याचा बहुतेक भाग खडकाळ आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७५१२ चौरस किलोमीटर आहे. त्यातील २४१ चौ.कि.मी भाग हा शहरी आहे.

जिल्ह्याचे भौगोलिक स्थान संपादन

अक्षांश : १७.३५ ते १८.४० उत्तर रेखांश : ७५.१६ ते ७६.४० पूर्व.

उस्मानाबाद जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या दक्षिण भागात व मराठवाड्यात त्याच्या नैर्ऋत्येला आहे. जिल्हा समुद्रसपाटीपासून ६०० मी. उंचीवर असून पूर्णपणे दख्खनच्या पठारात येतो. ह्या जिल्ह्यात मांजरा आणि तेरणा नद्यांची पात्रे येतात. उस्मानाबादच्या नैर्ऋत्येला सोलापूर जिल्हा, वायव्येला अहमदनगर जिल्हा, उत्तरेला बीड जिल्हा, पूर्वेला लातूर जिल्हा, व दक्षिणेला कर्नाटकातील बिदरगुलबर्गा हे जिल्हे आहेत.जिल्ह्याचा बहुतांश भाग खडकाळ तर उर्वरित भाग सपाट आहे.जिल्ह्याचा बहुतांश भाग बालाघाट नावाच्या लहान डोंगराने व्यापलेला आहे. भूम, वाशी, कळंब, उस्मानाबाद आणि तुळजापूर हे तालुके बालाघाटच्या रांगेत आहेत. गोदावरी आणि भीमा सारख्या मोठ्या नद्यांचा काही भाग जिल्ह्याच्या अंतर्गत येतो. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७,५६९ चौरस किमी आहे पैकी शहरी भागाचे क्षेत्रफळ २४१.४ चौ.किमी आहे(एकूण क्षेत्रफळाच्या ३.२१ %) आणि ग्रामीण भागाचे क्षेत्रफळ ७२७१.० चौ.किमी आहे (एकूण क्षेत्रफळाच्या ९६.७९ %).[]

जिल्ह्याचे हवामान संपादन

जिल्हा बालाघाट डोंगररांगांनी वेढला असून हवामान मुख्यत: कोरडे आहे. पावसाळ्याचा कालावधी साधारणपणे जूनच्या मध्यापासून सप्टेंबर अखेरपर्यंत असतो. सरासरी पर्जन्यमान ६०० ते ७०० मिलिमीटर. आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर हवामान दमटसर असते. डिसेंबर-जानेवारी शीत हवामानाचा काळखंड असतो. फेब्रुवारीपासून जूनपर्यंत हवामान अधिकाधिक कोरडे आणि तापमान उष्ण होत जाते. उन्हाळ्यामध्ये उस्मानाबाद जिल्ह्याचे तापमान हे मराठवाड्यामधील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी असते. ज्वारी, सूर्यफूल, हायब्रीड ज्वारी, तुरी, ऊस, कापूस, गहू आणि हरभरा ही मुख्य पिके आहेत.

लोकसंख्या संपादन

२०११ च्या भारताच्या जनगणनेनुसार उस्मानाबाद जिल्ह्याची लोकसंख्या ही १६,५७,५७६ एवढी आहे. उस्मानाबादमध्ये १००० पुरुषांमागे ९२० स्त्रिया असे लिंग गुणोत्तर होते आणि साक्षरता दर ७६.३३% होता. मराठी ही सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे.[]

जिल्ह्यातील तालुके संपादन

जिल्ह्यातील पर्यटनस्थळे संपादन

  • तुळजा भवानी मंदिर हे प्रसिद्ध भवानी देवीचे हिंदू मंदिर तुळजापूरात बाला घाटाच्या टेकडीवर आहे. हे ५१ शक्तीपीठांपैकी एक मानले जाते. तुळजाभवानी ही छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत होते. आशीर्वाद घेण्यासाठी शिवाजी महाराज नेहमी मंदिरात येत असत. हे भवानीमातेचे मंदिर उस्मानाबादपासून २५ कि.मीवर., सोलापूरपासून ४१ तर ते हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग येथून ४० कि.मी.वर आहे.
  • कळंब हे जिल्ह्यातील व्यावसायिकदृष्टया महत्त्वाचे ठिकाण आहे. ते मांजरा नदीच्या काठावर वसलेले आहे. कळंबपासून २० कि.मी.वर येरमाळा येथे येडेश्वरी देवीचे मंदिर आहे.
  • परांडा हे ऐतिहासिक ठिकाण किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे. परांडा शहरापासून जवळ डोमगाव येथे समर्थ रामदासस्वामी यांचे शिष्य कल्याणस्वामी यांची समाधी आहे.[]
  • श्री दत्त मंदिर संस्थान रुईभर हेे उस्मानाबाद पासून १५ कि. मी.श्रीक्षेत्र रुईभर येथे दत्तमहाराजांचे एक अतिभव्य मंदिर आहे. त्यातील बांधकाम काळ्या पाषाणातील असून त्यावर अत्यंत सुबक व उठावदार नक्षीकाम केले आहे.
  • रामलिंग मंदिर हे भगवान शिवशंकराचे प्रसिद्ध मंदिर आहे. ते उस्मानाबाद पासून २० कि.मी.च्या अंतरावर सोलापूर-औरंगाबाद रोडवरील येडशी या गावात आहे. येथे दुर्गा देवीचे पुरातन मंदिर आहे. श्रावण महिन्यात येथे मोठ्या प्रमाणावर भक्तगण येतात.तसेच भरपूर पाऊ पडल्यावर येथील धबधबा हा आकर्षण ठरू शकतो. हा डोंगराळ प्रदेश आहे तसेच येथे मोठ्या प्रमाणावर वनराई आहे. त्यामुळे प्रदेशास रामलिंग अभयारण्य म्हणून घोषित केले आहे.
  • इतर पर्यटनस्थळे- संत गोरोबा मंदिर, धाराशिव लेणी, नळदुर्ग किल्ला, कुंथलगिरी येथील जैन मंदिर, कन्हेरी दत्तमंदिर, तसेच नळदुर्ग येथील नर-मादी धबधबा प्रसिद्ध आहे.
  • उस्मानाबाद हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहमतुल्ला आले दर्गा शहरातच्या मध्यभागी आहे. दर वर्षी येथे मोठी यात्रा भरते लाखो भाविक परराज्यांतूचन व विदेशातून उरसासाठी येतात.

तसेच तेर (ता.उस्मानाबाद) येथील पुरातणवस्तुसंग्रहालय प्रसिद्ध आहे येथे उत्खननात सापडलेल्या अनेक प्राचीन वस्तू आहेत उदा. तरंगणारी वीट

उस्मानाबाद येथील हातलाई देवीचे मंदिर प्रसिद्ध आहे.उस्मानाबाद जिल्हा शेळ्यांसाठी प्रसिद्ध आहे.

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था संपादन

नगरपरिषद संपादन

उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण ८ नगरपरिषद आहेत.

  • उस्मानाबाद
  • कळंब
  • भूम
  • परांडा
  • तुळजापूर
  • नळदुर्ग
  • उमरगा
  • मुरुम

नगरपंचायत संपादन

उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण २ नगरपंचायत आहेत.

  • वाशी
  • लोहारा बुद्रुक

जिल्हा परिषद संपादन

उस्मानाबाद जिल्ह्यात एकूण ५४ जिल्हा परिषदेचे मतदारसंघ गट आहेत.

साचा:*पारगाव साचा:*पारा साचा:*वाशी साचा:*तेरखेडा

साचा:*कानेगाव साचा:*माकणी साचा:*सास्तूर साचा:*लोहारा साचा:*जेवळी

साचा:*ईटकूर साचा:*डिकसळ साचा:*नायगाव साचा:*शिराढोण साचा:*खामसवाडी साचा:*मोहा साचा:*येरमाळा

साचा:*कवठा साचा:*बलसूर साचा:*दाळींब साचा:*येणेगूर साचा:*गुंजोटी साचा:*आलूर साचा:*कदेर

साचा:*ढोकी साचा:*पळसप साचा:*कोंड साचा:*तेर साचा:*येडशी साचा:*अंबेजवळगा साचा:*उपळा साचा:*सांजा साचा:*पाडोळी साचा:*केशेगाव साचा:*बेंबळी साचा:*वडगाव साचा:*इर्लासाचा:*दाऊतपूरसाचा:*भंडारवाडीसाचा:*डकवाडी साचा:*सारोळासाचा:*दारफळसाचा:*पवारवाडीसाचा:*कोळेवाडीसाचा:*शिंदेवाडीसाचा:*सकनेवाडी साचा:*चिखलीसाचा:*समुद्र्वाणीसाचा:*केकस्थळवाडीसाचा:*धारूरसाचा:*बेंबळीसाचा:*पोहनेरसाचा:*वाघोली साचा:*काजळा साचा:*हिंगलाजवाडीसाचा:*वाणेवाडीसाचा:*रामवाडी साचा:*टाकळीसाचा:*पानवाडी साचा:*मोहतरवाडी साचा:*बुकणवाडी साचा:*कावळेवाडी साचा:*गोरेवाडी साचा:*गोवर्धनवाडीसाचा:*खेडसाचा:*बावीसाचा:*वरूडा साचा:*बलपीरवाडी साचा:*मेडसिंगासाचा:*म्हालांगीसाचा:*बरमगाव साचा:*आंबेगाव साचा:*गौडगावसाचा:*रुईभर साचा:*अनसुर्डसाचा:*उतमी कायापूर साचा:*बोरीसाचा:*कामठासाचा:*वरवांटीसाचा:*राघुचीवाडीसाचा:*अम्बेहोळसाचा:*खानापूरसाचा:*घातंग्रीसाचा:*शिंगोलीसाचा:*अळणी साचा:*किणीसाचा:*मुळेवाडीसाचा:*तुगावसाचा:*भिकार सारोळासाचा:*जागजी साचा:*तावरजखेडासाचा:*सुम्भासाचा:*नितळीसाचा:*लासोना साचा:*मेंढा साचा:*एकंबीवाडीसाचा:*बोरखेडासाचा:*पळसवाडीसाचा:*बेगडा.

साचा:*ईट साचा:*पाथरूड साचा:*वालवड साचा:*माणकेश्‍वर

साचा:*लोणी साचा:*डोंजा साचा:*शेळगांव साचा:*अनाळा साचा:*जवळा

साचा:*सिंदफळ साचा:*काक्रंबा साचा:*मंगरूळ साचा:*काटी साचा:*काटगाव साचा:*अणदूर साचा:*जळकोट साचा:*नंदगाव साचा:*शहापूर

वाहतूक संपादन

राष्ट्रीय महामार्ग क्र. ९- हैदराबाद ते मुंबई आणि राष्ट्रीय महामार्ग क्र. २११- गदग-कर्नाटक) ते बडोदा (गुजरात) हे दोन राष्ट्रीय महामार्ग उस्मानाबाद जिल्ह्यातून जातात पैकी राष्ट्रीय महामार्ग क्र. २११ हा उस्मानाबाद शहरातून जातो

उस्मानाबाद शहर मध्य रेल्वेवर, लातूरर रोेड - मिरज या रेल्वेमार्गावरील महत्त्वाचे रेल्वे स्थानक आहे. उस्मानाबाद येथून पुणे, मुंबई, कोल्हापूर,पंढरपूर, मिरज, लातूर, नांदेड, परभणी, परळी वैजनाथ, अकोला, नागपूर, हैदराबाद, निजामाबाद, बिदर आदी ठिकाणी जाण्यासाठी रेल्वेगाड्या उपलब्ध आहेत .

उस्मानाबाद जिह्यात एस. टी.ची उत्तम वाहतूक आहे. उस्मानाबाद मुख्य बस स्थानकापासून महाराष्ट्रातील सर्व प्रमुख शहरांकडे जाण्यासाठी एस. टी. बसेस (निम आराम तसेच परिवर्तन बसेस) उपलब्ध आहेत. उस्मानाबाद बसस्थानकावरून धावणारी तुळजापूर-उस्मानाबाद-औरंगाबाद हायकोर्ट एक्सप्रेस हहीहाराष्ट्रातील सर्वात वेगवान एस.टी. बस म्हणून ओळखली जाते उस्मानाबाद येथून राज्यातील जिल्हा मुख्यालये, प्रमुख शहरे, पणजी, बंगलोर, हुबळी, विजापूर, हैदराबाद, सुरत आदी ठिकाणी जाण्यासाठी एस.टी.च्या निम आराम तसेच परिवर्तन बसेस उपलब्ध आहेत

जिल्ह्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग नवीन क्रमांकासह- []
१) राष्ट्रीय महामार्ग ५२- संगरूर(पंजाब)-हिस्सार(हरियाणा)-कोटा-इंदूर-धुळे-छत्रपती संंभाजी महाराज नगर-बीड-उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर-विजयपूर-हुबळी-अंकोला(कर्नाटक)
(जिल्ह्यातील या महामार्गावरील गावे- पारगाव-कुंथलगिरी फ़ाटा-तेरखेडा-येरमाळा-येडशी-उस्मानाबाद-तुळजापूर-तामलवाडी)

२) राष्ट्रीय महामार्ग ६३- बार्शी-येडशी-ढोकी-मुरूड-लातूर-उदगीर-निझामाबाद(तेलंगाणा)-सिरोंचा(महाराष्ट्र)-जगदलपूर(छत्तीसगढ)-कोतापड(ओडिशा)-बोरीगुम्मा

३) राष्ट्रीय महामार्ग ६५- पुणे-इंदापूर-सोलापूर-उमरगा-हैद्राबाद-विजयवाडा-मच्छलीपट्टणम(आंध्र प्रदेश)
(जिल्ह्यातील या महामार्गावरील गावे- अणदूर-नळदुर्ग-जळकोट-येणेगूर-दाळिंब-उमरगा-तुरोरी)

४) राष्ट्रीय महामार्ग ३६१- तुळजापूर-लातूर-अहमदपूर-नांदेड-यवतमाळ-वर्धा-बुटीबोरी(नागपूर जवळ)

५) राष्ट्रीय महामार्ग ५४८बी- मंठा-सेलू-पाथरी-सोनपेठ-परळी-अंबाजोगाई-लातूर-औसा-उमरगा-येणेगूर-मुरूम-आलूर-अक्कलकोट-नागणसूर-विजयपूर-अथणी-चिकोडी-संकेश्वर-गोतूर(कर्नाटक)

६) राष्ट्रीय महामार्ग ५४८-सी- सातारा-कोरेगाव-म्हसवड-माळशिरस-अकलूज-टेंभूर्णी-बार्शी-येरमाळा-कळंब-केज-माजलगाव-परतूर-मंठा-लोणार-मेहकर-खामगाव-शेगाव-अकोट-अंजणगाव-बैतूल(मध्य प्रदेश)

७) राष्ट्रीय महामार्ग ६५२- तुळजापूर-अणदूर-नळदुर्ग-हन्नूर-अक्कलकोट

संदर्भ संपादन

साचा:संदर्भयादी

साचा:महाराष्ट्रातील जिल्हे