Jump to content

चौदा रत्ने

मराठीपिडिया कडून

हिंदू धर्मातील आख्यायिकेनुसार देव-दानवांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन केले त्यावेळी एका नंतर एक अशी चौदा अमूल्य अशा रत्नसमान वस्तू मिळाल्या.

  1. लक्ष्मी- विष्णूपत्नी
  2. कौस्तुभ मणी- श्रीविष्णूने गळ्यात धारण केलेले मणी वदंतेनुसार हाच कोहिनूर होय.
  3. कल्पवृक्ष पारिजात वृक्ष (कल्पद्रुम) प्राजक्ताचे झाड.[]इंद्राला प्राप्त झालेले स्वर्गवृक्ष (स्वर्गाचा बागेत लावलेला वृक्ष).
  4. सुरा वारुणी- दैत्यांचे मादक पेय[] ,दारू, मद्य []
  5. धन्वंतरी (देवांचे वैद्यराज)
  6. चंद्रदेव(चंद्रमा)[] शिवाने मस्तकात धारण केले.
  7. कामधेनू-इच्छापूर्ती करणारी गाय.
  8. ऐरावत - इंद्राचे वाहन असलेला हत्ती.
  9. रंभा- मेनका, इत्यादी अप्सरागण.
  10. उच्चैःश्रवा- सात तोंडे असलेला घोडा.सुर्यदेवाचे वाहन.[]
  11. हलाहल विष- कालकूट विष[]वा शिवाने प्राशन केले .
  12. हरिधनु वा शारंग धनुष्य - भगवान विष्णूचा धनुष्य आहे.
  13. शंख - श्रीविष्णूचा पांचजन्य शंख आहे.
  14. अमृत-देवांचे पेय.

श्लोक[संपादन | स्रोत संपादित करा]

लक्ष्मीः कौस्तुभपारिजातकसुरा धन्वन्तरिश्चन्द्रमाः ।

गावः कामदुधाः सुरेश्वरगजो रम्भादिदेवाङ्गनाः ॥

अश्वः सप्तमुखो विषं हरिधनुः शङ्खोऽमृतं चाम्बुधे ।

रत्‍नानीह चतुर्दशं प्रतिदिनं कुर्यात्‌ सदा मङ्गलम् ॥[][]


रामायण आणि महाभारत पुराणानुसार इतर रत्न[संपादन | स्रोत संपादित करा]

पुराण पासून पुराण पर्यंत भिन्न आहे आणि रामायण आणि महाभारत या महाकाव्यांमधेही किंचित वेगळी आहे.[][१०]

  • कल्पवृक्ष ,
  • पांचजन्य शंख ,
  • ज्येष्ठा देवी(अलक्ष्मी) (१) लक्ष्मी, (२) कौस्तुभ मणी, (३) पारिजातक वृक्ष, (४) सुरा, (५) धन्वंतरी (एकदिव्यपुरूष. तो हातात अमृतकुंभ घेऊन वर आला), (६) चंद्र, (७) कामधेनू-गाय, (८) ऐरावत-हत्ती, (९) रंभा व इतर अप्सरा, (१०) उच्चे:श्रवा हा सात मुखे असलेला शुभ घोडा, (११) हलाहल-विष, (१२) शार्ङ्ग-धनुष्य, (१३) पांचजन्य शंख आणि (१४) अमृत ही ह्या श्र्लोकात निर्देशिलेली चौदा रत्ने. ह्या श्र्लोकाचा कर्ता अज्ञात आहे. समुद्रमंथनातून चौदा रत्ने वर आली असे सामान्यतः मानले जात असले, तरी रत्नांची संख्या व नावे निरनिराळ्या गंथांत निरनिराळी दिल्याचे आढळते. उदा., रामायणात सहाच रत्नांचा (धन्वंतरी, अप्सरा, सुरा, उच्चे:श्रवा, कौस्तुभ व अमृत) निर्देश आहे, तर महाभारतात सात रत्नांचा (चंद्र, श्री, सुरा, उच्चे:श्रवा, कौस्तुभ, धन्वंतरी, अमृत) उल्लेख आढळतो. [→ चौदा रत्ने].

हे पण पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

समुद्रमंथन

संदर्भ यादी[संपादन | स्रोत संपादित करा]