२०२० इंडियन प्रीमियर लीग
साचा:Infobox cricket tournament इंडियन प्रीमियर लीगचा २०२०चा मोसम हा आयपीएल १३ किंवा आयपीएल २०२० म्हणूनही ओळखली जाणारी स्पर्धा सप्टेंबर-नोव्हेंबर २०२० मध्ये खेळवली गेली. बीसीसीआय मार्फत २००७ साली सुरू झालेल्या ट्वेंटी२० क्रिकेटचा हा तेरावा हंगाम होता. याधीच्या मोसमात खेळलेल्या आठ संघ स्पर्धेत सहभागी झाले.
यजमान आणि कार्यक्रम[संपादन | स्रोत संपादित करा]
सुरुवातीस ही स्पर्धा १५ मार्चपासून सुरू होणार होती परंतु कोव्हिड महामारीमुळे ही १५ एप्रिल पर्यंत स्थगित करण्यात आली. १४ एप्रिल रोजी भारतातील लॉकडाउन ३ मे पर्यंत लागू झाल्यावर ही स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली. २ ऑगस्ट रोजी या स्पर्धेचा कार्यक्रम १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर दरम्यान निश्चित केला गेला. त्याच वेळी या स्पर्धेचे स्थळ भारतातून संयुक्त अरब अमीरातींमध्ये हलविण्यात आले.[१][२][३] १० ऑगस्ट रोजी भारत सरकारने स्पर्धा संयुक्त अरब अमीरातींमध्ये हलविण्यास परवानगी दिली.[४] ६ सप्टेंबर रोजी स्पर्धेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला.[५]
याआधी ४ ऑगस्ट रोजी विवोने या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक पदावरून माघार घेतली.[६][७] ड्रीम११ या काल्पनिक खेळाचे आयोजन करणाऱ्या कंपनीने २ अब्ज २२ कोटी रुपये बीसीसीआयला देउन विवोची जागा घेतली.[८][९][१०] याचबरोबर अनअकॅडेमी या भारतीय शिक्षणतंत्रज्ञान कंपनीला २०२२ पर्यंत सहकारी करून घेतले गेले.[११]
कोव्हिड-१९चा प्रभाव[संपादन | स्रोत संपादित करा]
जगात पसरलेल्या कोव्हिड-१९च्या साथीमुळे स्पर्धेचा कार्यक्रम आणि स्थळ बदलले गेले. स्पर्धा संयुक्त अरब अमीरातींमध्ये हलविताना २० ऑगस्ट पासून स्पर्धा सुरू करण्याचा बेत केला गेला होता परंतु अमीरातींवरील प्रवासबंधनांमुळे हा पुढे ढकलण्यात आला.[१२] स्पर्धेच्या आधी करण्यात आलेल्या कोव्हिड चाचण्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या अकरा खेळाडूंना लागण झाल्याचे आढळून आले.[१३][१४] स्पर्धा सुरू असताना खेळाडू व संघातील इतर सदस्यांवर २०,००० चाचण्या घेतल्या जातील.[१५][१६] मुंबई इंडियन्स संघ स्पर्धेदरम्यान स्मार्ट रिंग नावाचे उपकरण वापरेल. याद्वारे खेळाडूंच्या तब्येतीबद्दलची माहिती गोळा केली जाईल.[१७][१८]
संघ[संपादन | स्रोत संपादित करा]
मैदाने[संपादन | स्रोत संपादित करा]
| साचा:Flagicon संयुक्त अरब अमीराती | ||
|---|---|---|
| दुबई | शारजा | अबु धाबी |
| दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान | शारजा क्रिकेट मैदान | शेख झायेद क्रिकेट मैदान |
| क्षमता: २५,००० | क्षमता: १६,००० | क्षमता: २०,००० |
|
| |

