Jump to content

हंपी

मराठीपिडिया कडून

साचा:माहितीचौकट युनेस्को जागतिक वारसा साइट

हंपी किंवा हम्पे, ज्याला हंपी येथील स्मारकांचा समूह म्हणूनही संबोधले जाते, हे भारताच्या पूर्व-मध्य कर्नाटक येथे स्थित युनेस्कोचे भारतातील जागतिक वारसा स्थान आहे. []

इतिहास[संपादन | स्रोत संपादित करा]

१४व्या शतकात हंपी ही विजयनगर साम्राज्याची राजधानी होती.[] हे एक तटबंदी असलेले शहर आहे. पर्शियन आणि युरोपियन प्रवाशांनी, विशेषतः पोर्तुगीजांनी सोडलेल्या इतिवृत्तात असे म्हटले आहे की हंपी हे तुंगभद्रा नदीजवळचे एक समृद्ध, श्रीमंत आणि भव्य शहर होते, ज्यामध्ये असंख्य मंदिरे, शेती आणि व्यापारी बाजार होते. इस १५०० पर्यंत, हंपी-विजयनगर हे मध्ययुगीन काळातील बीजिंग नंतर जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर होते आणि कदाचित त्यावेळेस भारतातील सर्वात श्रीमंत शहर होते, जे पर्शिया आणि पोर्तुगालमधील व्यापाऱ्यांना आकर्षित करत होते.[][] मुस्लिम सल्तनतांच्या युतीने विजयनगर साम्राज्याचा पराभव झाला; १५६५ मध्ये सल्तनती सैन्याने तिची राजधानी जिंकली, लुटली आणि नष्ट केली, त्यानंतर हंपी अवशेष बनून राहिले.[][][]

कर्नाटकात आधुनिक काळातील होस्पेट शहराजवळ वसलेले, हंपीचे अवशेष साचा:Convert मध्ये पसरलेले आहेत आणि युनेस्कोने "austere, grandiose site (कठोर आणि भव्य स्थान)" असे वर्णन केलेल्या दक्षिण भारतातील शेवटच्या महान हिंदूं साम्राज्यातील १६००हून अधिक जिवंत अवशेषांमध्ये "किल्ले, नदीकाठची वैशिष्ट्ये, राजेशाही आणि पवित्र संकुले, मंदिरे, तीर्थक्षेत्रे, खांब असलेले हॉल, मंडप, स्मारक संरचना, जल संरचना, इत्यादीचा" समावेश आहे.[]

हंपी हे विजयनगर साम्राज्याच्या पूर्वीचे आहे, त्याचा उल्लेख रामायण आणि हिंदू धर्माच्या पुराणांमध्ये पंपा देवी तीर्थ क्षेत्र असा आहे.[][] विरुपाक्ष मंदिर, सक्रिय आद्य शंकराचार्य-संबंधित मठ आणि जुन्या शहराशी संबंधित विविध स्मारके असलेले हम्पी हे एक महत्त्वाचे धार्मिक केंद्र आहे.[][]

स्थान[संपादन | स्रोत संपादित करा]

हंपी खडकाळ प्रदेशात वसलेले आहे. वरील: पार्श्वभूमीत तुंगभद्रा नदीसह विजयनगर बाजारातील अनेक अवशेषांपैकी एक

हंपी हे आंध्र प्रदेश राज्याच्या सीमेजवळ मध्य कर्नाटकच्या पूर्व भागात तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले आहे. ते बेंगळुरूपासून साचा:Convert आणि हुबळीपासून साचा:Convert अंतरावर आहे. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन होस्पेट, साचा:Convert अंतरावर आहे आणि सर्वात जवळचे विमानतळ तोरणागल्लू येथील जिंदाल विजयनगर विमानतळ, साचा:Convert अंतरावर आहे, जे बेंगळुरू विमानतळाशी कनेक्टेड आहे आहे. गोवा आणि बेंगळुरूहुन बस आणि रेल्वेने एका रात्रीत हंपीला पोहोचता येते.साचा:Sfn बदामी आणि ऐहोल पुरातत्त्व स्थळांच्या आग्नेयेस, हंपी साचा:Convert अंतरावर आहे.साचा:Sfnसाचा:Sfn

हंपी हा समानार्थी शब्द - पारंपारिकपणे पंपा-क्षेत्र, किष्किंधा-क्षेत्र किंवा भास्कर-क्षेत्र म्हणून ओळखला जातो- जो हिंदू धर्मशास्त्रातील देवी पार्वतीचे दुसरे नाव, पंपा पासून व्युत्पन्न झाला आहे. पौराणिक कथेनुसार, कन्या पार्वती (जी शिवाची पूर्वीची पत्नी सती हिचा पुनर्जन्म आहे) हिने एकाकी तपस्वी शिवाशी लग्न करण्याचा संकल्प केला.साचा:Sfnसाचा:Sfn तिचे पालक तिच्या ह्या इच्छेबद्दल समजल्यानंतर त्यांनी तिला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु तीने तिच्या इच्छेचा पाठपुरावा केला. भगवान शिव योगसाधनेत हरवलेले आणि जगापासून गाफील आहेत; त्यांना जागृत करण्यासाठी आणि त्याचे लक्ष वेधण्यासाठी पार्वती देवतांना मदतीसाठी आवाहन करते. इंद्र शिवाला ध्यानातून जागृत करण्यासाठी कामदेवाला — इच्छा, कामुक प्रेम, आकर्षण आणि आपुलकीची हिंदू देवता—पाठवतो. कामदेव शिवापर्यंत पोहोचतो आणि इच्छेचा बाण सोडतो.साचा:Sfnसाचा:Sfn. क्रोधित भगवान शिव कपाळावरचा तिसरा डोळा उघडतात आणि कामदेवाची जाळून राख करतात. पार्वती निराश होत नाही किंवा शिवावर विजय मिळवण्याचा तिचा संकल्प गमावत नाही; ती त्यांना जागृत करून आणि त्याना आकृष्ट करण्यासाठी त्यांच्याच्यासारखे—तपस्वी, योगी आणि तपस्या—जीवन जगू लागते. शिव पार्वतीला वेषांतर करून भेटतो आणि तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो, तिला शिवाचा कमकुवतपणा आणि व्यक्तिमत्त्वाच्या समस्या सांगतो.साचा:Sfnसाचा:Sfn तरीही पार्वती ते ऐकण्यास नकार देते आणि तिच्या संकल्पावर ठाम राहते. भगवान शिव शेवटी तिचा स्वीकार केला आणि त्यांनी लग्न केले.साचा:Sfnसाचा:Sfn शिव आणि पार्वतीच्या विवाहानंतर कामदेवाला नंतर जिवंत करण्यात आले. स्थल पुराणानुसार, पार्वती (पम्पा) हिने तपस्वी शिवाला जिंकण्यासाठी आणि गृहस्थ जीवनात परत आणण्यासाठी हेमाकुटा टेकडीवर, आता हंपीचा एक भाग असलेल्या, तिच्या तपस्वी, योगिनी जीवनशैलीचा पाठपुरावा केला.साचा:Sfn शिवाला पंपापती (म्हणजे "पंपाचा पती") असेही म्हणतात.साचा:Sfn हेमाकुटा टेकडीजवळील नदी पंपा नदी म्हणून ओळखली जाऊ लागली.[१०] पम्पा हा संस्कृत शब्द, कन्नड शब्द हंपा मध्ये बदलला आणि पार्वती ज्या ठिकाणी शिवाचा पाठलाग करत होती ते ठिकाण हम्पे किंवा हम्पी म्हणून ओळखले जाऊ लागले.साचा:Sfn[१०][११]

हे ठिकाण पम्पाक्षेत्र म्हणून ओळखले जाणारे मध्ययुगीन काळातील तीर्थक्षेत्र होते. ते हिंदू महाकाव्य रामायणाच्या किष्किंधा अध्यायांतून प्रसिद्ध झाले, जिथे राम आणि लक्ष्मण अपहरण केलेल्या सीतेच्या शोधात असताना हनुमान, सुग्रीव आणि वानर सेना यांना भेटतात. महाकाव्यात वर्णन केलेल्या ठिकाणाशी हंपी क्षेत्राचे बरेच जवळचे साम्य आहे. प्रादेशिक परंपरेचा असा विश्वास आहे की रामायणात उल्लेख केलेले हे ठिकाण यात्रेकरूंना आकर्षित करते.[१२] १८०० च्या दशकात कर्नल कॉलिन मॅकेन्झी नावाच्या अभियंत्याने हे प्रकाशात आणले होते.

प्राचीन ते इस १४वे शतक[संपादन | स्रोत संपादित करा]

बेल्लारी जिल्ह्यातील नित्तूर आणि उदेगोलन येथील सम्राट अशोकाचे शिलालेख—दोन्ही इस पू २६९-२३२—असे सूचित करतात की हा प्रदेश इसपू ३ऱ्या शतकादरम्यान मौर्य साम्राज्याचा भाग होता. प्रदेशाच्या उत्खननात ब्राह्मी शिलालेख आणि इ.स.च्या दुसऱ्या शतकातील टेराकोटा ठसा सापडला आहे.[१३][१४] ६व्या आणि ८व्या शतकादरम्यानच्या, बदामी चालुक्याच्या शिलालेखात या शहराचा उल्लेख पंपापुरा असा आहे.[१२]

१०व्या शतकापर्यंत, कल्याण चालुक्य या हिंदू राजांच्या राजवटीत ते धार्मिक आणि शैक्षणिक क्रियाकलापांचे केंद्र बनले होते, ज्यांच्या शिलालेखात असे म्हटले आहे की राजांनी विरुपाक्ष मंदिराला जमीन अनुदान दिली.[१२][१५] ११ ते १३व्या शतकातील अनेक शिलालेख हंपीबद्दल आहेत, ज्यात देवी हंपा-देवीला भेटवस्तू दिल्याचा उल्लेख आहे.[१३] इस ११९९ च्या शिलालेखानुसार १२व्या आणि १४व्या शतकादरम्यान, दक्षिण भारतातील होयसळ साम्राज्यातील हिंदू राजांनी दुर्गा, हंपादेवी आणि शिवाची मंदिरे बांधली. हंपी हे दुसरे राजेशाही निवासस्थान बनले; होयसाळ राजांपैकी एक हंपेया-ओडेया किंवा "हंपीचा स्वामी" म्हणून ओळखला जात असे.[१२][१५] बर्टन स्टीनच्या मते, होयसाळ-काळातील शिलालेख तेथील जुन्या विरुपाक्ष (शिव) मंदिराच्या सन्मानार्थ हंपीला विरुपाक्षपट्टण, विजया विरूपाक्षपुरा यांसारख्या पर्यायी नावांनी संबोधतात.[१३]

१४ वे शतक आणि नंतर[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Main दिल्ली सल्तनतच्या सैन्याने, विशेषतः अलाउद्दीन खल्जी आणि मुहम्मद बिन तुघलक यांच्या सैन्याने दक्षिण भारतावर आक्रमण केले आणि लुटले. दक्षिण कर्नाटकातील होयसळ साम्राज्य आणि त्याची राजधानी द्वारसमुद्र १४व्या शतकाच्या सुरुवातीला अल्लाउद्दीन खिलजीच्या सैन्याने,[१६][१७] आणि पुन्हा १३२६ मध्ये मुहम्मद बिन तुघलकच्या सैन्याने लुटले आणि नष्ट केले.[१८][१९][२०]

उत्तर-मध्य कर्नाटकातील कंपिली राज्य होयसाळ साम्राज्याच्या पतनानंतर उदयास आले. हंपीपासून साचा:Convert अंतरावर राजधानी असलेले हे अल्पायुषी हिंदू राज्य होते.[१८][२१][२२] मुहम्मद बिन तुघलकच्या मुस्लिम सैन्याने केलेल्या आक्रमणानंतर कंपिलीराज्याचा अंत झाला. कंपिली सैनिकांना तुघलकाच्या सैन्याकडून पराभवाचा सामना करावा लागला तेव्हा कंपिलीच्या हिंदू स्त्रियांनी जौहर (सामूहिक आत्महत्या विधी) केला.[२३][२४] इस १३३६ मध्ये, विजयनगर साम्राज्य कंपिली राज्याच्या अवशेषांमधून उद्भवले. हे दक्षिण भारतातील प्रसिद्ध हिंदू साम्राज्यांपैकी एक म्हणून विकसित झाले ज्याने २०० वर्षांहून अधिक काळ राज्य केले.[२१][२५]

विजयनगर साम्राज्याने आपली राजधानी हंपीभोवती बांधली, त्याला विजयनगर असे म्हणतात. बऱ्याच इतिहासकारांनी असे सुचवले आहे की हरिहर पहिला आणि बुक्क पहिला, विजयनगर साम्राज्याचे संस्थापक, हे उत्तर भारतातील मुस्लिम आक्रमणे रोखण्यासाठी तुंगभद्र प्रदेशात तैनात असलेल्या होयसळ साम्राज्याच्या सैन्यात कमांडर होते. काहींचा असा दावा आहे की ते तेलुगू लोक होते, ज्यांनी होयसळ साम्राज्याच्या अधोगतीदरम्यान उत्तरेकडील भाग ताब्यात घेतला.[२६] विद्यारण्य कलाजन, विद्यारण्य वृत्तांत, राजकालनिर्णय, पितामहासंहिता, शिवतत्त्वरत्नाकर यासारख्या काही ग्रंथांनुसार, ते काकतीय राज्याचा राजा प्रताप रुद्र यांच्या खजिन्याचे अधिकारी होते. जेव्हा मुहम्मद बिन तुघलक, बहा-उद्दीन गुरशापला (जो प्रताप रुद्रच्या दरबारात आश्रय घेत होता) शोधत आला तेव्हा प्रताप रुद्रचा पाडाव झाला आणि काकतियाचा नाश झाला. या वेळी हरिहर पहिला आणि बुक्का पहिला हे दोन भाऊ छोट्या सैन्यासह विजयनगर, हंपीच्या सध्याच्या जागेवर आले. श्रृंगेरी शारदा पिठाचे १२वे जगद्गुरू, विद्यारण्य यांनी त्यांना आपल्या संरक्षणाखाली घेतले आणि त्यांना सिंहासनावर बसवले. इसवी सन १३३६ मध्ये या शहराला विद्यानगर म्हटले गेले.[२७] त्यांनी पायाभूत सुविधा आणि मंदिरांचा विस्तार केला.

निकोलस गियर आणि इतर विद्वानांच्या मते,[] इ.स १५०० पर्यंत हंपी-विजयनगर हे बीजिंग नंतर जगातील दुसरे सर्वात मोठे मध्ययुगीन-युगातील शहर होते आणि कदाचित भारतातील सर्वात श्रीमंत शहर होते. त्याच्या संपत्तीने दख्खन, पर्शिया आणि गोव्याच्या पोर्तुगीज वसाहतीतील, १६व्या शतकातील व्यापाऱ्यांना आकर्षित केले.[][२८] विजयनगरच्या शासकांनी बौद्धिक शोध आणि कलांच्या विकासाला चालना दिली, एक मजबूत सैन्य राखले आणि त्याच्या उत्तर आणि पूर्वेला सल्तनतांशी अनेक युद्धे लढली. त्यांनी रस्ते, जलकुंभ, शेती, धार्मिक इमारती आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केली. युनेस्कोने म्हणण्यानुसार ह्यामध्ये"किल्ले, नदीकाठची वैशिष्ट्ये, राजेशाही आणि पवित्र संकुल, मंदिरे, तीर्थस्थाने, स्तंभ असलेले हॉल, मंडप (लोकांना बसण्यासाठी हॉल), स्मारक संरचना, प्रवेशद्वार, चेक पोस्ट, तबेले, पाण्याची रचना आणि इतर अनेक" गोष्टींचा समावेश आहे.[] हे क्षेत्र बहु-धार्मिक आणि बहु-जातीय होते; त्यात हिंदू आणि जैन स्मारके एकमेकांच्या शेजारी होती. इमारतींमध्ये प्रामुख्याने दक्षिण भारतीय हिंदू कला आणि स्थापत्यकलेचे पालन केले गेले जे ऐहोल-पट्टडकल शैलीशी संबंधित होते, परंतु हंपीच्या बांधकाम व्यावसायिकांनी कमळ महाल, सार्वजनिक स्नानगृह आणि हत्तींच्या तबेल्यांमध्ये भारतीय वास्तुकलेचे घटक देखील वापरले.[]

पोर्तुगीज आणि पर्शियन व्यापाऱ्यांनी हम्पीला सोडलेल्या ऐतिहासिक आठवणींनुसार, हे शहर महानगरीय प्रमाणात होते; त्यांनी त्याला "सर्वात सुंदर शहरांपैकी एक" म्हटले. समृद्ध आणि पायाभूत सुविधा असताना, मुस्लिम सल्तनत आणि विजयनगर साम्राज्य यांच्यातील मुस्लिम-हिंदू युद्ध चालूच राहिले. १५६५मध्ये, तालिकोटच्या लढाईत, मुस्लिम सल्तनतांनी युती करून विजयनगर साम्राज्याशी युद्ध केले.[] त्यांनी राजा आलिया रामा रायाला पकडून त्याचा शिरच्छेद केला,[२९]साचा:Sfn त्यानंतर हम्पी आणि विजयनगर महानगरातील पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर नाश झाला.[]साचा:Sfn युद्धानंतर सहा महिने शहर लुटले गेले आणि जाळले गेले, नंतर अवशेष म्हणून सोडून दिले गेले, ज्याला आता हंपी येथील स्मारकांचा समूह म्हणतात.[]साचा:Sfn साचा:Refn

पुरातत्त्व स्थळ[संपादन | स्रोत संपादित करा]

हम्पी नकाशा, १९११ सर्वेक्षण

हंपी आणि त्याच्या जवळचा प्रदेश हा १८ व्या शतकापर्यंत स्थानिक प्रमुख, हैदराबाद मुस्लीम निजाम, मराठा हिंदू राजे आणि हैदर अली आणि त्याचा मुलगा- म्हैसूरचा टिपू सुलतान यांनी दावा केलेला आणि लढलेला प्रदेश राहिला.साचा:Sfn १७९९ मध्ये, टिपू सुलतानचा पराभव झाला आणि ब्रिटिश सैन्याने आणि वाडियार घराण्याने सलोखा केला तेव्हा त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर हा प्रदेश ब्रिटिशांच्या प्रभावाखाली आला.साचा:Sfn भारताचे पहिले सर्वेक्षक जनरल, स्कॉटिश कर्नल कॉलिन मॅकेन्झी यांनी १८०० मध्ये हंपीच्या अवशेषांचे सर्वेक्षण केले होते. मॅकेन्झीने लिहिले की हंपीची जागा सोडून देण्यात आली होती आणि तेथे फक्त वन्यजीव राहतात. मॅकेन्झीचे अनुसरण करणाऱ्या इतिहासकारांनी १९व्या शतकातील अनुमानित किंवा अफवा पसरविणाऱ्या लेखांमध्ये १८व्या शतकातील हैदर अली आणि मराठ्यांच्या सैन्याला हंपी स्मारकांच्या नुकसानीसाठी जबाबदार धरले होते.साचा:Sfn

साचा:Multiple image

अलेक्झांडर ग्रीनलॉ यांनी १८५६ मध्ये या स्थळाला भेट दिली आणि छायाचित्रे काढली तेव्हा पर्यंत म्हणजेच १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत हंपी प्रदेशाकडे दुर्लक्ष करण्यात आले.साचा:Sfn त्यांनी १८५६ मध्ये उभ्या असलेल्या मंदिरे आणि शाही वास्तूंच्या ६० कॅलोटाइप छायाचित्रांचे संग्रहण तयार केले. ही छायाचित्रे युनायटेड किंगडममधील एका खाजगी संग्रहात ठेवण्यात आली होती आणि १९८० पर्यंत प्रकाशित झाली नव्हती.साचा:Sfn विद्वानांसाठी ते १९व्या शतकाच्या मध्यावरील हंपी स्मारक राज्याचे सर्वात मौल्यवान स्त्रोत आहेत.साचा:Sfn

देवराया दुसरा (१४२४-१४४६)च्या दरबारातील पर्शियन दूत अब्दुल रज्जाक यांनी लिहिलेल्या संस्मरणांचा अनुवाद, १८८० च्या दशकाच्या सुरुवातीस प्रकाशित झाला, ज्यामध्ये ओसाड जागेच्या काही स्मारकांचे वर्णन केले आहे. हा अनुवाद, प्रथमच हंपीच्या काही स्मारकांचे वर्णन करण्यासाठी "झेनाना" सारख्या अरबी शब्दांचा वापर करतो.साचा:Sfn यापैकी काही पदांची नावे नंतर झाली. ब्रिटिश भारतातील मद्रास प्रेसिडेन्सीच्या पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे अधिकारी अलेक्झांडर रिया यांनी १८८५ मध्ये या जागेचे सर्वेक्षण प्रकाशित केले.साचा:Sfnरॉबर्ट सेवेल यांनी १९०० मध्ये त्यांचा अभ्यासपूर्ण ग्रंथ अ फॉरगॉटन एम्पायर[३०] प्रकाशित केला, ज्याने हंपीकडे विद्वानांचे लक्ष वेधून घेतले.साचा:Sfn वाढत्या स्वारस्यामुळे रिया आणि त्याचा उत्तराधिकारी लॉन्गहर्स्ट यांनी हंपी समूहाच्या स्मारकांची साफसफाई आणि दुरुस्ती करण्यास प्रवृत्त केले.साचा:Sfn

विजयनगर काळासाठी आणि त्यापूर्वीच्या काळातील ऐतिहासिक आणि पुरातत्त्वीयदृष्ट्या हे ठिकाण महत्त्वपूर्ण आहे.साचा:Sfn भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग या भागात उत्खनन करत आहे.[३१]

वर्णन[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Multiple image

हंपी हे ग्रॅनाइटच्या दगडांपासून बनलेल्या डोंगराळ प्रदेशात वसलेले आहे.साचा:Sfn युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचा समावेश असलेली हंपी स्मारके ही विजयनगरच्या विस्तृत अवशेषांचा उपसंच आहेत. जवळजवळ सर्व स्मारके विजयनगरच्या राजवटीत इस १३३६ ते १५७० दरम्यान बांधली गेली होती.[३२] क्षेत्रात सुमारे १,६०० स्मारके आहेत आणि त्यांनी साचा:Convert जागा व्यापली आहे.[]

हंपीच्या जागेचा तीन विस्तृत क्षेत्रांमध्ये अभ्यास केला गेला आहे; बर्टन स्टीन आणि इतरांसारख्या विद्वानांनी पहिल्यास "sacred centre" (पवित्र केंद्र) असे नाव दिले आहे;[१३] दुसऱ्याला "urban core" (शहरी केंद्र) किंवा "royal centre" (रॉयल सेंटर) असे संबोधले जाते; आणि तिसरा हा उर्वरित विजयनगर महानगराचा भाग आहे. नदीच्या कडेला असलेल्या पवित्र केंद्रामध्ये तीर्थक्षेत्राचा इतिहास असलेली सर्वात जुनी मंदिरे आणि विजयनगर साम्राज्यापूर्वीची स्मारके आहेत.[३३] अर्बन कोअर आणि रॉयल सेंटरमध्ये पवित्र केंद्राशिवाय साठहून अधिक उद्ध्वस्त मंदिरे आहेत, परंतु अर्बन कोअरमधील मंदिरे ही सर्व विजयनगर साम्राज्याची आहेत. शहरी भागामध्ये रस्ते, जलवाहिनी, पाण्याच्या टाक्या, मंडप, प्रवेशद्वार आणि बाजार, मठसाचा:Refn ह्या सर्वांची ओळख होण्यासाठी सुमारे बहात्तर शिलालेखांनी मदत केली आहे.[३३][३४][३५]

बहुतेक स्मारके हिंदू आहेत; मंदिरे आणि सार्वजनिक पायाभूत सुविधा जसे की टाक्या आणि बाजारपेठांमध्ये हिंदू देवतांचे चित्रण आणि हिंदू ग्रंथांमधील विषय आणि कलाकृतींचा समावेश आहे.साचा:Sfn याशिवाय सहा जैन मंदिरे आणि स्मारके आणि एक मुस्लिम मशीद आणि थडगे देखील आहेत.साचा:Sfn सर्व वास्तू ह्या मुबलक उपलब्धता असलेल्या स्थानिक दगडापासून मुख्यतः द्रविडी शैलीत बांधलेल्या आहेत ज्याचे मूळ दख्खन प्रदेशातील पहिल्या सहस्राब्दीच्या उत्तरार्धातील प्रगत हिंदू कला आणि स्थापत्यकलेत आहे.साचा:Sfn त्यात ११व्या ते १४व्या शतकादरम्यान दक्षिणेतील होयसळ साम्राज्याच्या काळात विकसित झालेल्या कलांचे घटक देखील समाविष्ट होते जसे की रामचंद्र मंदिराचे खांब आणि काही प्रमाणात विरूपाक्ष मंदिराच्या संकुलाचे छत.साचा:Sfnसाचा:Refn वास्तुविशारदांनी काही स्मारकांमध्ये भारतीय-इस्लामिक शैलीचाही अवलंब केला, जसे की राणीचे स्नानगृह आणि हत्तीचे तबेले, जे युनेस्कोच्या म्हणण्यानुसार "उच्च विकसित बहु-धार्मिक आणि बहु-जातीय समाज" प्रतिबिंबित करते.[]साचा:Sfn

हिंदू स्मारके[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Multiple image

विरुपाक्ष मंदिर आणि बाजार संकुल[संपादन | स्रोत संपादित करा]

विरुपाक्ष मंदिर हे सर्वात जुने देवस्थान आहे, यात्रेकरू आणि पर्यटकांचे प्रमुख गंतव्यस्थान आहे आणि सक्रिय हिंदू उपासना स्थळ आहे.साचा:Sfn शिव, पंपा आणि दुर्गा मंदिरांचे काही भाग 11व्या शतकात अस्तित्वात होते; विजयनगर काळात त्याचा विस्तार करण्यात आला.[३६] हे मंदिर लहान मंदिरांचा संग्रह आहे, नियमितपणे रंगवलेले, साचा:Convert उंच गोपुरम, अद्वैत वेदांत परंपरेच्या विद्यारण्याला समर्पित हिंदू मठ, पाण्याची टाकी (मनमथा), एक सामुदायिक स्वयंपाकघर, इतर स्मारके आणि साचा:Convert लांब उध्वस्त दगडी बाजार, पूर्वेकडील टोकाला अखंड नंदी मंदिर आहे.साचा:Sfnसाचा:Sfnसाचा:Sfn

मंदिर पूर्वाभिमुख असून, शिव आणि पंपा देवी मंदिरांची गर्भगृहे सूर्योदयाशी संरेखित केली आहेत; त्याच्या प्रवेशद्वाराशी एक मोठे गोपुरम आहे. संपूर्ण डोलारा हा एक पिरॅमिडच्या आकाराचा बुरुज आहे ज्यामध्ये चौकोनी मजले आहेत ज्यात प्रत्येकावर कामुक शिल्पांची कलाकृती आहे.साचा:Sfn गोपुरममधून आत गेल्यानंतर एक आयताकृती प्रांगण लागते, त्याच्या शेवटी एक दुसरे लहान गोपुरम आहे, जे इस १५१० मध्ये बांधले गेले आहे. त्याच्या दक्षिणेला १००-स्तंभांचा हॉल आहे, प्रत्येक खांबाच्या चारही बाजूंना हिंदू-संबंधित रिलीफ्स आहेत.साचा:Sfn या सार्वजनिक हॉलशी जोडलेले एक सामुदायिक स्वयंपाकघर आहे, जे इतर प्रमुख हंपी मंदिरांमध्ये आढळते. स्वयंपाकघर आणि भोजनालयामध्ये पाणी पोहोचवण्यासाठी खडकात एक वाहिनी कोरून काढली आहे. लहान गोपुरमनंतरच्या अंगणात दीपस्तंभ आणि नंदी आहे.साचा:Sfn[३७][३८]

लहान गोपुरम नंतरच्या प्रांगणामधून पुढे गेल्यानंतर शिवमंदिराचा मुख्य मंडप लागतो, ज्यामध्ये मूळ चौरसाकृती मंडप आणि कृष्णदेवरायाने बांधलेले दोन जोडलेले चौरस आणि सोळा स्तंभ यांचा समावेश असलेला आयताकृती विस्तार आहे. मंडपाच्या वरच्या खुल्या हॉलचे छत रंगवलेले आहे, ज्यामध्ये शिव-पार्वती विवाहाशी संबंधित शैव धर्माची आख्यायिका दर्शविली आहे; दुसरा विभाग वैष्णव परंपरेतील राम-सीतेची आख्यायिका दाखवतो.साचा:Sfn तिसऱ्या विभागात पार्वतीची आवड निर्माण व्हावी म्हणून प्रेम देवता कामाने शिवावर बाण सोडल्याची आख्यायिका दाखवली आहे आणि चौथ्या विभागात अद्वैत हिंदू विद्वान विद्यारण्याची मिरवणुक जात असल्याचे दाखवले आहे. जॉर्ज मिशेल आणि इतर विद्वानांच्या मते, तपशील आणि रंगछटांवरून असे सूचित होते की सर्व छतावरील चित्रे १९व्या शतकातील नूतनीकरणातील असून मूळ चित्रांची विषय अज्ञात आहे.साचा:Sfn[३९][४०] मंडपाच्या खांबांमध्ये मोठाले याली नावाचे, घोडा, सिंह आणि इतर प्राण्यांची वैशिष्ट्ये असलेले पौराणिक प्राणी ज्यावर सशस्त्र योद्धे स्वर आहेत—जे विजयनगरचे विशेष आकर्षण आहे.साचा:Sfn

मंदिराच्या गाभाऱ्यात मुखलिंग आहे; पितळेने नक्षीदार चेहरा असलेले शिवलिंग.साचा:Sfn विरुपाक्ष मंदिरात मुख्य गर्भगृहाच्या उत्तरेला पार्वतीच्या पंपा आणि भुवनेश्वरी या दोन रूपांची लहान मंदिरे आहेत.साचा:Sfn भुवनेश्वरी मंदिर हे चालुक्यकालीन वास्तुकलेचे असून त्यात दगडाच्या भांड्याऐवजी ग्रॅनाइटचा वापर केला आहे. कंपाऊंडमध्ये उत्तरेकडे गोपुर आहे, जो पूर्वेकडील गोपुरापेक्षा लहान आहे, जो मन्मथ कुंडाला जातो आणि नदीकडे जाण्याचा मार्ग रामायणाशी संबंधित दगडी द्रव्यांपासून बनला आहे.साचा:Sfn या कुंडाच्या पश्चिमेला अनुक्रमे दुर्गा आणि विष्णू यांसारखी शाक्त आणि वैष्णव परंपरांची देवळे आहेत.साचा:Sfnसाचा:Sfn यात्रेकरूंच्या या मार्गावरील काही देवस्थाने १९व्या शतकात ब्रिटीश भारताचे अधिकारी एफ.डब्ल्यू. रॉबिन्सन यांच्या आदेशानुसार पांढरी करण्यात आली होती, ज्यांनी विरुपाक्ष मंदिर परिसर पुनर्संचयित करण्याचा प्रयत्न केला होता; ऐतिहासिक वास्तूंच्या या क्लस्टरचे व्हाईटवॉशिंग, परंपरा म्हणून चालू आहे.साचा:Sfn

स्थानिक परंपरेनुसार, विरुपाक्ष हे एकमेव मंदिर आहे जे हिंदूंचे एकत्र येण्याचे ठिकाण राहिले आणि १५६५ मध्ये हंपीचा नाश झाल्यानंतर यात्रेकरू वारंवार येत राहिले. मंदिर मोठ्या प्रमाणात यात्रेकरूंना आकर्षित करते; विरुपाक्ष आणि पंपा यांच्या विवाहाचे प्रतीक म्हणून रथ मिरवणुकीसह वार्षिक उत्सव, वसंत ऋतूमध्ये आयोजित केला जातो, हा महाशिवरात्रीचा पवित्र उत्सव आहे.साचा:Sfn मंदिराच्या मागच्या बाजूला अरुंद गल्लीबोळात राहणारी हत्ती - लक्ष्मीला दिल्या जाणाऱ्या वागणुकीमुळे मंदिरावर पर्यटकांकडून टीका केली गेली आहे.[४१]

कृष्ण मंदिर, बाजार, नरसिंह आणि लिंग[संपादन | स्रोत संपादित करा]

कृष्ण मंदिराचे अवशेष

कृष्ण मंदिर, ज्याला बाळकृष्ण मंदिर देखील म्हणतात, हे हेमाकुटा टेकडीच्या दुसऱ्या बाजूला, विरुपाक्ष मंदिराच्या दक्षिणेस सुमारे साचा:Convert अंतरावर आहे. हे मंदिर इस १५१५ मध्ये बांधले गेले आहे; हंपी संकुलाच्या या भागाला शिलालेखांमध्ये कृष्णपुरा असे म्हटले गेले आहे.साचा:Sfn उध्वस्त झालेल्या मंदिरासमोर एक लांबलचक बाजारपेठ आहे, ज्याला स्थानिक भाषेत बाजार असेही संबोधले जाते. दगडी दुकानाच्या अवशेषांमधून एक विस्तृत रस्ता आहे ज्यावरून गाड्यांतून बाजारपेठेत मालाची ने-आण केली जात असे आणि औपचारिक कार्यक्रम आणि उत्सवाचे आयोजन सुद्धा केले जाते. या रस्त्याच्या उत्तरेला आणि बाजाराच्या मध्यभागी एक मोठी पुष्करणी म्हणजेच एक सार्वजनिक उपयोगासाठी पायरी असलेली पाण्याची टाकी आहे, ज्याच्या मध्यभागी एक कलात्मक मंडप आहे. टाकीच्या पुढे लोकांना बसण्यासाठी सार्वजनिक सभागृह (मंडप) आहे.साचा:Sfn

साचा:Multiple image

मंदिर पूर्वाभिमुख आहे; त्यात तळाशी मत्स्यापासून सुरू होऊन विष्णूच्या सर्व दहा अवतारांच्या उठावचित्रांचे प्रवेशद्वार आहे. आत कृष्णाचे उध्वस्त झालेले मंदिर आणि देवींचे छोटे उध्वस्त मंदिर आहे.साचा:Sfn मंदिर परिसर मंडपांचे स्तर आहेत, ज्यामध्ये बाहेरील आणि आतील बाजूचा समावेश आहे. आवराला दोन गोपुर आहेत. आतमध्ये, २५ (५x५)- खुला मंडप ९ (३x३)- बंदिस्त मंडपाकडे नेतो. साचा:Sfn बाळकृष्णाची मूळ प्रतिमा आता चेन्नईच्या संग्रहालयात आहे. पूर्व गोपुरासमोरून एक आधुनिक रस्ता जातो, जो कमलापुरमला हंपीशी जोडतो. पश्चिमेकडील गोपुरामध्ये युद्धाची रचना आणि सैनिक असलेल्या चित्रमालिका आहेत.साचा:Sfn

कृष्ण मंदिराच्या बाह्यभागाच्या दक्षिणेला शेजारील दोन मंदिरे आहेत, एकामध्ये सर्वात मोठे अखंड शिवलिंग आहे आणि दुसरे हंपीमधील विष्णूचा सर्वात मोठा अखंड योग-नरसिंह अवतार आहे.साचा:Sfn साचा:Convert आकाराचे शिवलिंग एका घन कक्षेत पाण्यात उभे आहे आणि त्याच्या शीर्षस्थानी तीन डोळे रेखाटलेले आहेत. याच्या दक्षिणेस साचा:Convert उंच नरसिंह-विष्णूचा मनुष्य-सिंह अवतार-योग स्थितीत बसलेले मंदिर आहे. नरसिंह स्मारकामध्ये मूळतः देवी लक्ष्मी त्याच्यासोबत होती, परंतु त्यावर मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची आणि जळक्या डागांची चिन्हे आहेत जो मंदिर जाळण्याच्या प्रयत्नांचा पुरावा आहे. पुतळा स्वच्छ करण्यात आला आहे आणि मंदिराचे काही भाग पुनर्संचयित करण्यात आले आहेत.साचा:Sfn

साचा:Multiple image साचा:Anchor

अच्युतराय मंदिर आणि बाजार संकुल[संपादन | स्रोत संपादित करा]

अच्युतराय मंदिर, ज्याला तिरुवेंगलनाथ मंदिर देखील म्हणतात, विरुपाक्ष मंदिराच्या पूर्वेस सुमारे साचा:Convert अंतरावर आहे आणि त्याच्या पवित्र केंद्राचा एक भाग तुंगभद्रा नदीजवळ आहे. शिलालेखांमध्ये त्याचा उल्लेख अच्युतपुर स्थित असा आहे आणि तो इस १५३४ मधील आहे. हे हंपीमधील चार सर्वात मोठ्या संकुलांपैकी एक आहे.साचा:Sfn] विष्णूला समर्पित असणारे हे मंदिर उत्तरेकडे तोंड असल्यामुळे असामान्य आहे.साचा:Sfn विजयनगरच्या काळात, पारंपारिकपणे मंदिरात नदीच्या बाजूने, प्रथम एक पवित्र पाण्याची टाकी ओलांडल्यानंतर, बाजारातून एका विस्तृत रस्त्याने जात असत . मंदिराच्या बाह्य गोपुरातून आत गेल्यानंतर अंगणात १०० स्तंभांचा एक सभामंडप आहे आणि आतील गोपुरातून विष्णू मंदिराकडे जाता येते.साचा:Sfn[४२] १०० स्तंभांच्या सभामंडपातील प्रत्येक खांबाच्या प्रत्येक बाजूला विष्णूचे अवतार तसेच इतर देवता जसे शिव, सूर्य, दुर्गा; दैनंदिन जीवनातील दृश्ये - ऋषी, प्रेमळ जोडपे, जोकर; योगासने करणारी माणसे; नमस्कार करणारी माणसे; आणि विजयनगरची प्रतीके अशी अनेक उठावचित्रे आहेत.[४३][४४]

मंदिराचे प्रवेशद्वार; वराह अवतारातील एक वराह, एक तलवार, सूर्य आणि चंद्र अशी विजयनगर राजवंशाची अनेक चिन्हे दाखवते. मंदिर आणि बाजाराचा रस्ता उद्ध्वस्त झाला आहे परंतु त्यांच्या मांडणीवरून असे सूचित होते की ते रथ वाहतुकीसाठी रस्त्यांसह एक प्रमुख बाजारपेठ होती.[४५]साचा:Sfn

विठ्ठल मंदिर आणि बाजार संकुल[संपादन | स्रोत संपादित करा]

विठ्ठल मंदिर गोपुर आणि बाजार.

विठ्ठल मंदिर आणि बाजारपेठ संकुल, तुंगभद्रा नदीच्या काठी विरुपाक्ष मंदिराच्या ईशान्येकडे साचा:Convert पेक्षा जास्त अंतरावर आहे. हे हंपीमधील सर्वात कलात्मकदृष्ट्या अत्याधुनिक असे हिंदू मंदिर आहे आणि ते विजयनगरच्या पवित्र केंद्राचा भाग आहे. मंदिर परिसर केव्हा बांधला गेला, कोणी बांधला हे स्पष्ट नाही; बहुतेक विद्वानांच्या मते ते १६व्या शतकाच्या सुरुवातीपासून ते मध्यापर्यंतच्या बांधकामाच्या कालखंडात बांधले गेले असावे.साचा:Sfn देवराया दुसराच्या काळात त्याचे बांधकाम सुरू झाले आणि कृष्णदेवराय, अच्युतराय, आणि बहुधा सदाशिवराय यांच्या कारकिर्दीत ते चालू राहिले आणि १५६५ मध्ये शहराच्या विनाश झाल्यामुळे ते थांबले असा उल्लेख काही पुस्तकांमध्ये आहे.[२७] शिलालेखांमध्ये नर आणि मादी नावांचा समावेश आहे, जे असे सूचित करते की संकुल अनेक प्रायोजकांनी बांधले होते. मंदिर विठ्ठलाला समर्पित होते, कृष्णाचे एक रूप ज्याला विठोबा देखील म्हणतात.साचा:Sfn मंदिर पूर्वाभिमुख आहे, आराखडा चौरसाकृती आहे आणि दोन बाजूंच्या गोपुरांसह प्रवेशाचे गोपुर देखील आहे. मुख्य मंदिर एका पक्क्या अंगणाच्या मध्यभागी उभे आहे आणि पूर्वेला संरेखित अनेक लहान मंदिरे आहेत.साचा:Sfn मंदिर हे ५०० बाय ३०० फूट आकाराच्या प्रांगणातील एकसंध अशी रचना आहे जे खांबांच्या तिहेरी रांगेने वेढलेले आहे. ही एक मजली लहान रचना असून ज्याची सरासरी उंची २५ आहे. मंदिराचे तीन वेगळे भाग आहेत: एक गर्भगृह, एक अर्धमंडप आणि एक महामंडप (किंवा सभामंडप).[२७]

विठ्ठल मंदिरात दगडी रथाच्या रूपात गरुड मंदिर.

विठ्ठल मंदिराच्या प्रांगणात दगडी रथाच्या रूपात गरुड मंदिर आहे; हे हंपीचे अनेकदा छायाचित्रित केले गेलेले प्रतीक आहे. इतिहासकार डॉ. एस. शेट्टार यांच्या मते रथावर एक बुरुज आहे, जो १९४० च्या दशकात काढण्यात आला होता.[४६] दगडी रथाच्या समोर एक मोठा, चौरसाकृती, खुल्या खांबाचा, अक्षीय सभा मंडप किंवा समुदाय मंडप आहे.साचा:Sfn मंडपामध्ये चार विभाग आहेत, त्यापैकी दोन मंदिराच्या गर्भगृहाशी जोडलेले आहेत. मंडपामध्ये वेगवेगळ्या व्यासाचे, आकाराचे, लांबीचे आणि पृष्ठभाग असलेले ५६ कोरीव दगडी तुळके आहेत जे वाजविल्यानंतर संगीतमय आवाज निर्माण करतात; स्थानिक पारंपारिक समजुतीनुसार, हा मंडप संगीत आणि नृत्याच्या सार्वजनिक उत्सवासाठी वापरला जात असे.[४७][४८] ह्या मंदिराचे काराकोइल म्हणून वर्गीकरण केले जाते. मंदिर जे रथ मंदिराप्रमाणे बनवलेले आणि सणांच्या वेळी मंदिराभोवती मिरवणूक काढण्यासाठी वापरले जात असे.[४९]

गर्भगृहाभोवती फिरण्यासाठी मंडप एका बंदिस्त प्रदक्षिणा पथाशी जोडलेला आहे. या अक्षीय मंडपाभोवती (पूर्वेकडून घड्याळाच्या दिशेने); गरुड मंदिर, कल्याण मंडप (लग्न समारंभासाठी), १०० स्तंभांचा मंडप, अम्मा मंदिर आणि उत्सव मंडप आहेत. भिंतींचे कुंपण असलेल्या परिसराने सुमारे साचा:Convert इतकी जागा व्यापलेली आहे आणि कंपाऊंड भिंतींना आधार देणाऱ्या व्हरांड्यांनी आच्छादित केले आहे. आग्नेय कोपऱ्यात छताची खिडकी असलेले स्वयंपाकघर आहे.साचा:Sfn[३४][५०]

मंदिराच्या आवाराबाहेर, त्याच्या पूर्व-आग्नेयेस, जवळजवळ साचा:Convert लांब बाजारपेठेचा रस्ता आहे; जो आता उध्वस्त झाला आहे. उत्तरेला आणखी एक बाजार आणि दक्षिणाभिमुख देवस्थान आहे ज्यामध्ये रामायण, महाभारताची दृश्ये आणि वैष्णव संतांचे दर्शन आहे. हिंदू तत्त्वज्ञानी रामानुजांचा सन्मान करणाऱ्या मंदिरात उत्तरेचा रस्ता संपतो.साचा:Sfn[३७] विठ्ठल मंदिराच्या आजूबाजूच्या प्रदेशाला विठ्ठलपुर म्हणत. यात अल्वर परंपरेच्या आसपास केंद्रित तीर्थक्षेत्र म्हणून डिझाइन केलेले वैष्णव मठ आहे. सापडलेल्या शिलालेखांनुसार हे हस्तकला निर्मितीचे केंद्र देखील होते.[३४][३७][५०]

हेमकुट टेकडी स्मारके[संपादन | स्रोत संपादित करा]

हेमाकुट टेकडी, उत्तरेला विरुपाक्ष मंदिर परिसर आणि दक्षिणेला कृष्ण मंदिर यांच्या मध्ये आहे. हा बेताच्या आकाराच्या स्मारकांचा संग्रह विजयनगरापूर्वीची आणि विजयनगराच्या सुरुवातीची मंदिरे आणि बांधकामांची सर्वोत्तम-जतन केलेली उदाहरणे आहेत. या ठिकाणी अनेक महत्त्वाचे शिलालेख आहेत, सहज पोहोचता येण्याजोगे आहेत आणि हंपीच्या काही भागांची आणि सुपीक, कृषी खोऱ्याची दृश्ये प्रदान करतात जी पवित्र केंद्राला शहरी केंद्रापासून वेगळे करते.साचा:Sfnसाचा:Sfn

हेमकुट टेकडी मंदिर

टेकडीवर पाण्याची टाकी, प्रवेशद्वार आणि धर्मनिरपेक्ष मंडपांसह तीसहून अधिक लहान-ते-मध्यम आकाराची मंदिरे आहेत.साचा:Sfn नवीनतम १४व्या शतकाच्या सुरुवातीची आहेत.साचा:Sfnसाचा:Sfn काही रचना दगडांच्या तुकड्यांमधून एकत्र केलेले वेगवेगळ्या आकाराचे मंदिरे किंवा मंडपांचे नमुने आहेत. फमसाना शैली सारखी इतर काही विविध रचनांची पूर्ण झालेली स्मारके आहेत,साचा:Sfn या शैलीतील मंदिरांचे दोन गट एकसारखे दिसतात; प्रत्येकामध्ये तिहेरी विमान आहे ज्यामध्ये चौरस गर्भगृहे आहेत आणि प्रत्येक संच त्याच्या स्वतःच्या सामायिक चौरसाकृती मंडपाशी जोडलेला आहे.साचा:Sfn यावरील बुरुज (शिकारा) पिरॅमिडल ग्रॅनाईट रचना आहेत ज्यात अकरा रचलेले, आकुंचन पावलेले चौरस आणि शीर्षावर डेक्कन शैलीतील चौरस कलश आहे.साचा:Sfn दोन्ही गटात तिहेरी लिंग असलेली शिवमंदिरे आहेत; सुरुवातीच्या स्त्रोतांनी त्यांना जैन मंदिरे म्हणून चुकीची ओळख दिली कारण त्यांच्या साध्या बाह्य आणि अंतर्गत भिंती. या गटांपैकी एका मध्ये ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा शिलालेख आहे ज्यामध्ये असे नोंदवले गेले आहे की कंपिलाने हे स्मारक १४व्या शतकाच्या सुरुवातीला बांधले. हा शिलालेख हंपीला कांपिली राज्याशी जोडतो आणि त्याच्या नंतरच्या विजयनगर साम्राज्याशी काम्पिलीच्या इतिहासाचा संबंध सूचित करतो.साचा:Sfn हेमाकुट टेकडीवरील मंदिरांच्या शैलीवरून असे सूचित होते की ते विविध प्रकारच्या हिंदू मंदिरांवर प्रयोग करण्यासाठी एक अभ्यास केंद्र असावे. सध्याच्या शैलींमध्ये चालुक्य काळ, राष्ट्रकूट काळ आणि नंतरचा काळ यांचा समावेश होतो. हे मूळ विरुपाक्ष मंदिराचा ढाचा देखील असावे, ज्याचा नंतर गोपुर, मंडल आणि इतर जोडण्यांनी मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात आला. विष्णूचा मनुष्य-सिंह अवतार नरसिंहाला समर्पित असेच स्मारक हंपीच्या पूर्वेला आहे; त्याच्या जवळील एका शिलालेखात असे म्हटले आहे की ते इस १३७९ मध्ये कार्यरत होते.साचा:Sfnसाचा:Sfn

हेमकुट टेकडीवर दोन अखंड गणेशाची स्मारके सुद्धा आहेत; कडालेकालू गणेश आणि शशिवेकालू गणेश.साचा:Sfn कडलेकालू गणेश, गणेशाच्या ग्राम-आकाराच्या पोटावरून नाव देण्यात आले आहे, हे मातंगाजवळील टेकडीच्या पूर्वेला हंपीच्या पवित्र केंद्राच्या मध्यभागी आहे.साचा:Sfn स्तंभांची रांग असलेला, मोकळा मंडप गर्भगृहाकडे जातो, ज्यामध्ये साचा:Convert पेक्षा जास्त उंचीची गणेशाची एकपात्री प्रतिमा आहे, जी अस्तित्वात असलेल्या खडकात कोरलेली आहे. गणेशाचा सुळा आणि इतर भाग खराब झाले आहेत, परंतु डाव्या हाताला-ज्यामध्ये मोदक आहे आणि आणि गणपतीची सोंड त्याकडे वळलेली आहे - तो सुस्थितीत आहे.साचा:Sfn

गणपतीच्या मोहरीच्या दाण्याच्या आकाराच्या पोटावरून नाव असलेले शशिवेकालु गणेश, कडलेकालू गणेशाच्या नैऋत्येला कृष्ण मंदिराजवळ आहे. ही अखंड दगडात कोरलेली मूर्ती साचा:Convert इतकी उंच आहे. शशिवेकालू गणेश त्याच्या माता पार्वतीसोबत कोरलेला आहे, ज्याच्या मांडीवर तो बसलेला आहे. ती फक्त पुतळ्याच्या मागच्या बाजूने दिसते. हे स्मारक खुल्या-स्तंभांच्या मंडपाच्या आत ठेवलेले आहे; डावा हात आणि दात खराब झाले आहेत.साचा:Sfnसाचा:Sfn

हजारा राम मंदिर[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Multiple image हजारा राम मंदिराने, ज्याचा शिलालेखांमध्ये रामचंद्र मंदिर म्हणून उल्लेख आहे, हंपीच्या शाही मध्यभागातील शहरी बाजूमधील पश्चिम भाग व्यापलेला आहे. हे मंदिर रामायणातील रामाला समर्पित होते, जो विष्णूचा अवतार होता. हे राजघराण्याचे औपचारिक मंदिर होते. हे मंदिर १५व्या शतकाच्या पूर्वार्धातील असून त्याचे श्रेय देवराया पहिला ह्याला दिले जाते.साचा:Sfn मंदिराच्या बाहेरील भिंतींवर हिंदू महानवमी (दसरा) आणि वसंत ऋतु होळी उत्सव मिरवणूक आणि समारंभाच्या कलाकृतींचे समांतर पट्ट्यांमध्ये चित्रीकरण केले आहे.साचा:Sfn सर्वात खालच्या पट्ट्यावर कूच करणारे हत्ती दाखवले आहेत , त्याच्या वर घोडेस्वारांच्या नेतृत्वाखाली घोडे, नंतर लोकांद्वारे कौतूक केलेले सैनिक, नंतर नर्तक आणि संगीतकार, वरचा थर सामान्य लोकांच्या उत्साही मिरवणुकीचे चित्रण करतो. विजयनगराच्या राजधानीला भेट दिलेल्या पर्शियन आणि पोर्तुगीजांच्या हयात असलेल्या आठवणींमधील सण आणि मिरवणुकांचे वर्णन हे चित्रण प्रतिबिंबित करते.[५१][५२] साचा:Multiple image

मंदिराच्या आतील भिंतींवर हिंदू महाकाव्य रामायणाचे विस्तृत वर्णन असलेली चित्रे आहेत.[५३]साचा:Sfn मंदिरात एक प्रवेश मंडप आणि यज्ञ समारंभासाठी प्रशस्त खोली आहे. खोलीच्या छताची रचना धुके आणि धूर व्यवस्थित बाहेर जाईल अशा रीतीने करण्यात आली आहे. मुख्य मंडपाच्या आत होयसाळ शैलीतील चार गुंतागुंतीच्या रचनेचे कोरीव खांब आहेत; या कोरीव कामांमध्ये वैष्णव धर्मातील राम, लक्ष्मण आणि सीता, शक्ती धर्मातील महिषासुरमर्दिनी म्हणून दुर्गा आणि शैव धर्मातील शिव-पार्वतीचे चित्रण समाविष्ट आहे.साचा:Sfn चौरसाकृती गर्भगृहातून प्रतिमा गायब आहेत. मंदिरामध्ये विष्णू अवतारांच्या दंतकथा दर्शविणारे एक छोटेसे मंदिर आहे.[५३]

हे उध्वस्त झालेले मंदिर परिसर हजारो कोरीव काम आणि शिलालेख, हिंदू धर्मशास्त्राचे वर्णन करणारी विस्तृत भित्तिचित्रे आणि उद्यानांनी घातलेले त्याचे विस्तीर्ण अंगण यासाठी प्रसिद्ध आहे.[५४]

कोदंडराम मंदिर आणि नदीकाठावरील स्मारके[संपादन | स्रोत संपादित करा]

हंपी येथील तुंगभद्रा नदीकाठच्या गडांवरील शिवलिंग आणि नंदी

कोदंडराम मंदिर परिसर तुंगभद्रा नदीजवळ आणि अच्युतराय मंदिराच्या उत्तरेस आहे. मंदिराचे तोंड चक्रतीर्थाकडे आहे, जिथे तुंगभद्रा हिमालयाच्या दिशेने उत्तरेकडे वळते. पवित्र मानल्या जाणाऱ्या नदीकाठांवर विजयनगर काळातील घाट आणि आंघोळीसाठी मंडपाची सोय आहे. मंदिरासमोर पिपळाच्या झाडाखाली दिपस्तंभ आहे आणि आत राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांना समर्पित गर्भगृह आहे.साचा:Sfn जवळच, आणि त्याच्या उत्तरेला कोटितीर्थापर्यंत, विठ्ठल, अंजनेय, शिव आणि इतर देवतांना समर्पित असलेली अनेक छोटी तीर्थे आहेत. खडकावर अनंतशयन विष्णू (टेकून बसलेला विश्‍वचक्र निर्माण करणारा विष्णू, रंगनाथ), नरसिंह आणि प्रल्हादाच्या आख्यायिका कथन करणारे पट्टे आणि वैष्णव धर्माच्या पुराण परंपरेनुसार विष्णूचे चोवीस अवतार आहेत. नदीजवळ शैव धर्माच्या १,००८ लिंगांनी कोरलेला खडक आहे.साचा:Sfn

हंपी उपनगरातील पट्टाभिराम मंदिर

पट्टाभिराम मंदिर परिसर[संपादन | स्रोत संपादित करा]

पट्टाभिराम मंदिर परिसर, पवित्र केंद्राच्या बाहेर दक्षिणेकडील उपनगरीय केंद्र आणि मुख्य शहर, हंपी संग्रहालयापासून सुमारे साचा:Convert अंतरावर आहे.साचा:Sfn हे या उपनगराच्या आर्थिक आणि सांस्कृतिक क्रियाकलापांच्या केंद्रस्थानी होते, जे आता कमलापुराच्या ईशान्येस आहे. हा परिसर, ज्याला वरदेवी अम्माना पट्टणा म्हणूनही ओळखले जाते, ते १६व्या शतकाच्या सुरुवातीला बांधले गेले असावे आणि रामाला (विष्णू अवतार) समर्पित केले गेले असावे.साचा:Sfn या संकुलात मुख्य मंदिर आहे, एका आवारात दुहेरी खांबांची रंग असलेले प्रांगण आहे आणि गर्भगृहासमोर ६४ (८x८ चौरस) खांब असलेला आणि छप्पर असलेला मंडप आहे. संकुल आणि गर्भगृह पूर्वाभिमुख आहेत; सामान्य प्रवेश पूर्वेकडील गोपुरातून होतो.साचा:Sfnसाचा:Sfn अवशेषांवरून असे दिसते की गोपुराला सहा स्तर होते. पट्टाभिराम मंदिरामध्ये १००-स्तंभांचा हॉल समाविष्ट होता-संभवतः एक फीडिंग हॉल-जोडलेल्या कंपाऊंडच्या दक्षिणेकडील भिंतीला जोडलेला होता. स्तंभांवर हिंदू रचना दर्शविणारी उठावचित्रे आहेत ज्यात देव, देवी, हिंदू ग्रंथातील एक दृश्य, योग आणि नमस्ते यांचा समावेश आहे.[५५]

महानवमी व्यासपीठ, सार्वजनिक चौरस परिसर[संपादन | स्रोत संपादित करा]

महानवमी प्लॅटफॉर्म, ज्याला "ग्रेट प्लॅटफॉर्म", "प्रेक्षक हॉल", "दसरा" किंवा "महानवमी दिब्बा" स्मारक देखील म्हटले जाते, हे शाही केंद्राच्या (शहरी गाभा) आतील सर्वोच्च बिंदूंपैकी एका साचा:Convert इतक्या परिसरात आहे. त्याची औपचारिक रचना आहे.साचा:Sfn[५६] विजयनगरला भेट देणाऱ्या परदेशी लोकांच्या आठवणींमध्ये त्याचा उल्लेख आहे, काही जण याला "विजयाचे घर" म्हणतात.साचा:Refn या संकुलातील सर्वात मोठ्या स्मारकामध्ये तीन चढत्या चौकोनी पायऱ्या आहेत ज्यामुळे एका मोठ्या, चौकोनी चौथऱ्यावर जात येते, ज्याच्यावर लाकडी मंडप आहे. हंपीच्या नाशाच्या वेळी हे जाळले गेले.साचा:Sfn

महानवमी व्यासपीठ स्मारक

प्लॅटफॉर्मचे दोन खालचे स्तर ग्रॅनाइटचे बनलेले आहेत. यात उठावचित्रे आहेत-शक्यतो १४व्या शतकातील शाही क्रियाकलापांची सूची-आणि हत्ती, घोडे आणि उंटांसह कूच करणाऱ्या प्राण्यांच्या ओळी आहेत.साचा:Sfn[५७] दक्षिणेकडील उठावचित्रांमध्ये दांडिया नृत्य करणारे नर्तक आणि संगीतकार दिसतात. तिसऱ्या स्तरावरील उठावचित्रांमध्ये युद्ध मिरवणूक, जोडपे आणि सामान्य नागरिक एकमेकांवर पाणी फेकून होळी (वसंतोत्सव) साजरी करतानाचे दृश्य दाखवतात.साचा:Sfn[५६][५८] मोठ्या व्यासपीठाजवळ एक प्रेक्षक हॉल आहे, ज्यामध्ये कदाचित लाकडी मंडप देखील होता, ज्याचा पुरावा १०० दगडी तुकड्यांद्वारे मिळतो; हे देखील जळून खाक झाले.साचा:Sfn

चौथऱ्याच्या दक्षिणेला एक जलवाहिनी आहे जे १९८० च्या दशकात पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी उत्खनन केलेल्या ग्रॅनाइटच्या मोठ्या, सममितीय, पायऱ्यांच्या टाकीकडे पाणी घेऊन जाते. कॉम्प्लेक्समध्ये आणखी एक मोठा जलतलाव आहे—शक्यतो पाण्याच्या खेळांसाठी —एक बाग आणि विविध मंडप आहे. पायरीच्या टाकीजवळ एक उध्वस्त मंदिरासारखे स्मारक आहे.साचा:Sfn[३५]

पाणी सुविधा[संपादन | स्रोत संपादित करा]

हंपीच्या अवशेषांमधील एक पाण्याची टाकी

स्क्वेअर वॉटर पॅव्हेलियन, ज्याला क्वीन्स बाथ देखील म्हणतात, हे शाही केंद्राच्या आग्नेयेस आहे. त्यात मंडप, पाण्याचे कुंड आणि त्यात ताजे पाणी नेण्याची आणि धुण्याचे पाणी आणि अतिरिक्त काढून टाकण्याची सुविधा आहे. कुंड एका सुशोभित, खांबाच्या, व्हॉल्टेड बे साचा:मराठी शब्द सुचवा मध्ये बंद आहे.साचा:Sfn जवळच जलवाहिनीचे अवशेष आहेत.साचा:Sfn या इमारतीचे आधुनिक नाव, राणीचे स्नान, हे कदाचित चुकीचे नाव आहे कारण हे पुरुष आणि प्रवाशांसाठी सार्वजनिक स्नान करण्याचे ठिकाण होते.साचा:Sfn[५९] इमारतीच्या आतील कमानी इंडो-इस्लामिक शैलीचा प्रभाव दर्शवतात, ज्या काळात हिंदु आणि मुस्लिम कलांचा भारतातील एकमेकांवर प्रभाव पडला होता.[६०]

विजयनगर साम्राज्याने पाण्याच्या विस्तृत पायाभूत सुविधांची उभारणी केली होती,[५९][६१] ज्याची काही उदाहरणे- विरुपाक्ष मंदिराजवळील मन्मथ टाकीसह, जे सुमारे ९व्या शतकातील आहे-विजयनगरच्या आधीची आहेत. तेथे सापडलेल्या शिलालेखानुसार, मन्मथ कुंडाची सुधारणा करण्यात आली आणि इस ११९९ मध्ये दुर्गा मंदिर जोडण्यात आले.साचा:Sfn सिंहाशी लढा देणारा योद्धा यासारख्या टाकीवरील कलाकृतींचा समावेश १३ व्या शतकातील आहे, जेव्हा होयसाळ वारंवार हम्पीला जात असत.साचा:Sfn

पायऱ्या असलेली चौरसाकृती पाण्याची टाकी.

हम्पी स्मारकांमध्ये टाक्या आणि शहराच्या इतर भागांमध्ये पाणी वाहून नेण्यासाठी जलवाहिनी तसेच पाण्याचा अतिरिक्त पाणी काढून टाकण्यासाठी नाले आणि वाहिन्यांचा समावेश आहे.[५९] उदाहरणार्थ, १९८० मध्ये शहरी भागात महानवमी चौथऱ्याजवळ केलेल्या उत्खननात एक मोठी, चौकोनी पायरी असलेली टाकी आढळून आली ज्याला जलवाहिनीने पाणी देण्याची सुविधा आहे.[६२] टाक्या ही एक सार्वजनिक सुविधा होती; काहींचा वापर कदाचित शाही समारंभासाठी केला जात असे.साचा:Sfn

१९९० मधील पुरातत्त्व उत्खननात हम्पी-विजयनगर महानगरात तेवीस विहिरी आणि टाक्या आढळून आल्या. त्यापैकी १३ उपनगरातील शहराच्या भिंतीबाहेर तर १० आतमध्ये आढळून आल्या. त्यापैकी १२ रस्त्याच्या कडेला, ८ मंदिरांजवळ, १० निवासी भागात आणि २ शहरी भागात सिंचनासाठी वापरल्या जात होत्या. दारोजी खोऱ्यात शेतीसाठी अधिक पाण्याची रचना आढळून आली. पुरातत्त्वशास्त्रज्ञ कॅथलीन मॉरिसन आणि कार्ला सिनोपोली यांच्या मते, हंपीतील पाण्याची पायाभूत सुविधा प्रवाशांच्या वापरासाठी, विधी, घरगुती वापरासाठी आणि सिंचनासाठी होती.[६३]

कारंजे आणि सामुदायिक स्वयंपाकघर[संपादन | स्रोत संपादित करा]

हंपीमधील अनेक प्रमुख मंदिरांमध्ये स्वयंपाकघर आणि १००-किंवा-अधिक खांब असलेले जेवणाचे मंडप आहेत.[३७][३८] हंपीमध्ये एक समर्पित सार्वजनिक भोजनशाळा देखील होती जिथे जलवाहिनीच्या दोन्ही बाजूंच्या खडकात असंख्य थाळ्या कोरलेल्या होत्या. ह्याचे एक उदाहरण, शाही केंद्राच्या दक्षिणेला एका अष्टकोनी कारंज्याजवळ आढळते;साचा:Sfn ऐतिहासिक स्त्रोतांनुसार, ही हंपी भोजनशाला उताडा कलुवे किंवा "खाण्याशी जोडलेला कालवा" होता.साचा:Sfn

हत्तीचे तबेले आणि जागा[संपादन | स्रोत संपादित करा]

राजेशाही केंद्राच्या पूर्वेला गजशाळा, किंवा हत्तीचे तबेले आहे, ज्यात उत्तर-दक्षिण संरेखित अकरा चौरसाकृती कक्ष आहेत. तबल्याचे दरवाजे कमानदार आहेत; दहा कक्षांच्या वरती एकाआड चुण्या असलेले आणि साधे घुमट आहेत. तबेल्याच्या मध्यभागी छतावर जाण्यासाठी पायऱ्या आहेत.साचा:Sfnसाचा:Sfn

साचा:Multiple image तटबंदी हत्तींच्या तबेल्याजवळ आहे; अशा प्रकारे त्याचे नाव पर्शियन संस्मरणार्थ देण्यात आले, ज्यांचा १९व्या शतकातील स्थलांतरण हा अनेकांसाठी हंपीच्या अवशेषांचा प्रारंभिक परिचय होता.साचा:Sfn साचा:Sfn या तटबंदीमध्ये कमल महाल किंवा चित्रांगिणी महाल आहे, ज्याच्या शाही मध्यभागी दुमजली मंडप आहे.साचा:Sfn कमल महाल एक सममितीय, चौरस, हिंदू मंडल रचनेसह तुकड्यांच्या कमानी, तिजोरी आणि इंडो-इस्लामिक शैलीचे घुमट यांच्यापासून तयार होतो. त्याचे तळघर आणि पिरॅमिड आकाराचे टॉवर हिंदू मंदिराच्या वास्तुकलेवर आधारित आहेत.साचा:Sfn हंपीच्या राजेशाही केंद्रातील जवळजवळ सर्व वास्तूंप्रमाणे, या स्मारकावर कोणताही शिलालेख किंवा पुरालेख नाही आणि त्यामुळे त्याची तारीख आणि पुराव्यासह त्याचे कार्य स्थापित करणे कठीण झाले आहे. कमल महाल आणि हंपी शहरी भागातील इतर संरचना, तथापि, शहराच्या विविध मुस्लीम क्वार्टरमधील थडग्यांप्रमाणे मुस्लिम कृपाछत्रासह बांधल्या गेल्या नाहीत. या इमारती विजयनगरच्या हिंदू शासकांच्या आत्मसात करण्याच्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंब आहेत. लोटस महाल एक समक्रमित, गजबजलेल्या जागेसारखा दिसतो आणि त्याचा उद्देश अस्पष्ट आहे. हे परिषद सभागृह असल्याचा अनुमान आहे.साचा:Sfnसाचा:Sfn

इतर हिंदू मंदिरे आणि स्मारके[संपादन | स्रोत संपादित करा]

तुंगभद्रा नदीच्या दक्षिणेकडील किनाऱ्याजवळ आणि विठ्ठल मंदिर परिसराच्या जवळ असलेल्या पवित्र केंद्रामध्ये प्रवेशद्वार आणि एक स्मारक आहे ज्याला आता किंग्स बॅलन्स म्हणतात.साचा:Sfnसाचा:Sfn हे स्मारक दक्षिण भारतीय हिंदू मंदिरांच्या प्रवेशद्वारांवर तुळ-पुरुष-दान किंवा थुलाभरम समारंभासाठी आढळतात त्याप्रमाणेच आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती त्यांच्या शरीराच्या वजनाच्या किंवा त्यापेक्षा जास्त वजनाच्या वस्तू भेट म्हणून देते.साचा:Sfnसाचा:Sfn[६४]

विजयनगरच्या शासकांनी युद्धाच्या अवशेषातून राजवंशाबद्दल माहिती झाल्यानंतर आणि वारंवार होणाऱ्या हल्ल्यांपासून सुरक्षिततेसाठी किल्ले, तटबंदीचे प्रवेशद्वार आणि टेहळणी बुरूज बांधले. हिंदू शैलीतील कॉर्बेलसाचा:मराठी शब्द सुचवा कमानी हे हम्पीमधील सर्वात सामान्यतः आढळणारे प्रवेशद्वार आणि टेहळणी बुरूज आहेत.साचा:Refn असेच एक प्रवेशद्वार गणगिती जैन मंदिराच्या आग्नेयला आहे;साचा:Sfn त्यात एक मध्यवर्ती बार्बिकन म्हणजे बुरुजासारखी भिंत समाविष्ट आहे, ज्यामध्ये एखाद्या अनोळखी व्यक्तीला आश्चर्यचकित करण्याच्या उद्देशाने अडकवण्यासाठी आणि गोंधळात टाकण्यासाठी रचना केली आहे, तर वारंवार येणाऱ्या पाहुण्यांना प्रवेशद्वाराच्या आधी दिशांचे तीन बदल माहीत होते. ही कार्यशील हिंदू स्मारके त्यांच्यामध्ये समाविष्ट केलेल्या पौराणिक हिंदू पात्राद्वारे ओळखता येतात, जसे की महाभारतातील एक पांडव - भीम. तलारीघाट हिंदू स्मारक आणि विठ्ठल मंदिराकडे जाण्यासाठी ईशान्य मार्गावर असाच आणखी एक दरवाजा आढळतो.साचा:Sfnसाचा:Sfn

हंपीच्या विस्तीर्ण भागात १,६०० पेक्षा जास्त अवशेष आहेत - त्यातील बहुतेक हिंदू स्मारकांचे आहेत.[] इतर महत्त्वपूर्ण स्मारकांमध्ये ज्ञान आणि संगीताची हिंदू देवी सरस्वतीसाठी अष्टकोनी स्नानगृहाजवळील मंदिर; अनंतसायन विष्णूचे उपनगरातील मंदिर; शिव आणि विष्णूचे उद्दाना वीरभद्र मंदिर; कालीचे मंदिर, दुर्गेचे भयंकर रूप, ज्यामध्ये तांदळाचा गोळा आणि लाडू ठेवलेले दिसतात;साचा:Sfn शाही मध्यभागी एक भूमिगत मंदिर; सुग्रीव गुहा मंदिर;साचा:Sfn मातंग टेकडी स्मारके; कर्नाटक संगीत परंपरेसाठी प्रसिद्ध असलेल्या विद्वान-संगीतकाराला समर्पित पुरंदरदास मंदिर; राणीच्या स्नान स्मारकाजवळील शिवाचे चंद्रशेखर मंदिर; आणि राम-सीता-लक्ष्मण आणि शिव यांना समर्पित मल्यवंता टेकडी. मल्यवंता टेकडीमध्ये रघुनाथ मंदिर आणि दगडात कोरलेल्या शिवलिंगांच्या रांगांसह अनेक देवस्थाने आहेत.साचा:Sfn

जैन स्मारके[संपादन | स्रोत संपादित करा]

हंपी येथील जैन मंदिरांच्या उठावचित्रांमंध्ये हेमकुट जैन मंदिरे, रत्नांत्रयकुट, पार्श्वनाथ चरण आणि गणगित्ती जैन मंदिरे यांचा समावेश होतो. १४व्या शतकात बांधलेल्या या मंदिरांमधून बहुतेक मूर्ती आता गायब आहेत.[६५]

गणगित्ती मंदिर परिसर[संपादन | स्रोत संपादित करा]

गणगित्ती जैन मंदिर

गणगित्ती जैन मंदिर हंपीच्या शहरी भागाच्या आग्नेयेला भीमाच्या दरवाजाजवळ आहे. त्याच्या समोर एक अखंड दिव्याचा खांब आहे.साचा:Sfn मंदिर उत्तराभिमुख आहे; मंदिरातील शिलालेखानुसार हे मंदिर हिंदू राजा हरिहर दुसराच्या शासनकाळ, इस १३८५ मधील आहे.साचा:Sfn मंदिर तीर्थंकर कुंथुनाथाला समर्पित आहे आणि त्यात साध्या भिंती, एक खांब असलेला मंडप आणि चौकोनी गर्भगृह आहे ज्यातून जीनाची मूर्ती गायब आहे. खांबांवर स्तंभशीर्षे आहेत आणि दरवाजांना सजावट आहे. गर्भगृहावर द्रविड शैलीचा, अरुंद चौकोनी, पिरॅमिड टॉवर आहे. मंदिराच्या आवारातील इतर स्मारके अवशेष अवस्थेत आहेत.साचा:Sfn

इतर जैन मंदिरे आणि स्मारके[संपादन | स्रोत संपादित करा]

जैन आणि हिंदू मंदिरांचा समूह हत्तींच्या तबेल्यापासून पूर्वेला सुमारे साचा:Convert अंतरावर आहे. एक उत्तराभिमुख मंदिर पार्श्वनाथ तीर्थंकराला समर्पित आहे. हे राजा देवराया दुसरा याने बांधले होते आणि मंदिरातील एका शिलालेखानुसार ते इस १४२६ मधील आहे. मंदिरासमोर एक शिव आणि दुसरा महावीरांना समर्पित अशी दोन उध्वस्त मंदिरे आहेत.साचा:Sfn हिंदू मंदिरांमधील उठावचित्रांमध्ये सुद्धा जैन तीर्थंकरांचा समावेश आहे.[६६][६७][६८]

मुस्लिम स्मारके[संपादन | स्रोत संपादित करा]

हंपी येथील अहमद खान कबर

हंपीमध्ये इस्लामिक थडगी, दोन मशिदी आणि एक दफनभूमी असलेले मुस्लिम क्वार्टर समाविष्ट आहे. हे पवित्र केंद्र किंवा हंपीच्या शाही केंद्रामध्ये नाहीत. काही मुस्लीम स्मारके शहरी भागाचा भाग आहेत तर काही उपनगरातील आहेत जिथे बहुतेक विजयनगरचे रहिवासी राहत होते. हे शहरी भागाच्या ईशान्य खोऱ्यात आहेत, जिथे हिंदू आणि जैन यांच्याही वसाहती आहेत. या प्रदेशाचा बराचसा भाग गाळाने भरलेला आहे आणि मातीत दडलेली मानवरहित मंदिरे, रस्ते, पाण्याच्या टाक्या, प्रवेशद्वार आणि निवासी घरे आहेत.[६९]साचा:Sfn

अहमद खान मशीद आणि कबर[संपादन | स्रोत संपादित करा]

सिंचित खोऱ्यातील तुरुत्तू कालव्याच्या आधी, कमलापुरा ते अनेगोंदी या रस्त्यावर शहराच्या आग्नेयेस एक मुस्लिम स्मारक आहे. हे स्मारक प्रथम इस १४३९ मध्ये हिंदू राजा देवराया दुसराच्या सैन्यातील मुस्लिम अधिकारी अहमद खान याने बांधले होते. स्मारकांमध्ये मशीद, एक अष्टकोनी विहीर आणि एक थडगे यांचा समावेश आहे. मशिदीमध्ये घुमट नसून तो स्तंभ असलेला मंडप आहे, तर थडग्यात घुमट आणि कमानी आहेत.साचा:Sfn अहमद खानच्या वारसाजवळ नंतर इतर मुस्लिम स्मारके आणि कब्रस्तान जोडण्यात आले.साचा:Sfn

रिसेप्शनसाचा:मराठी शब्द सुचवा प्रमुख प्रेक्षणीय स्थळे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Multiple image

१४२० च्या सुमारास हम्पीला भेट देणारा इटालियन व्यापारी आणि प्रवासी निकोलो डी' कॉन्टी यांच्या आठवणींमध्ये, शहराचा अंदाजे परिघ साचा:Convert होता आणि त्याच्या तटबंदीमध्ये शेती आणि वसाहती होत्या. १४४२ मध्ये, अब्दुल रझाक, ज्यांनी पर्शियाहून भेट दिली, त्यांनी सात थरांचे किल्ले असलेले शहर असे वर्णन केले, सर्वात बाहेरील ठार शेती, कलाकुसर आणि निवासासाठी, आतील तिसरे ते सातवे स्तर दुकाने आणि बाजार यांनी खूप गजबजलेले आहेत.[७०]

१५२० मध्ये, डोमिंगो पेस, पोर्तुगीज प्रवासी, ह्याने पोर्तुगीज गोव्याच्या व्यापार दलाचा एक भाग म्हणून विजयनगरला भेट दिली. त्यांनी Chronica dos reis de Bisnaga म्हणून त्यांचे संस्मरण लिहिले, ज्यात त्यांनी विजयनगर हे "रोमसारखे मोठे आणि दिसायला अतिशय सुंदर... जगातील सर्वोत्तम प्रदान केलेले शहर" असल्याचे सांगितले.[७१][७२] पेसच्या म्हणण्यानुसार, "त्याच्या आत अनेक चर आहेत, घरांच्या बागांमध्ये, पाण्याच्या अनेक नाल्या आहेत ज्या मधून वाहतात आणि काही ठिकाणी तलाव आहेत ...".[७२]

१५६५ मध्ये विजयनगर साम्राज्याचा पराभव आणि पतन झाल्यानंतर काही दशकांनंतर इटालियन व्यापारी आणि प्रवासी सेझरे फेडेरिकी याने भेट दिली. सिनोपोली, जोहानसेन आणि मॉरिसन यांच्या मते, फेडेरिकीने त्याचे वर्णन अतिशय वेगळे शहर म्हणून केले. त्यांनी लिहिले, "बेझेनेगर (हंपी-विजयनगर) शहर पूर्णपणे नष्ट झालेले नाही, घरे स्थिर आहेत, परंतु रिकामी आहेत, आणि त्यात वाघिणी आणि इतर जंगली श्वापदांशिवाय काहीही राहत नाही".[७३]

इतिहासकार विल ड्युरंट, त्यांच्या अवर ओरिएंटल हेरिटेज: द स्टोरी ऑफ सिव्हिलायझेशनमध्ये विजयनगरची कथा सांगताना त्याच्या विजय आणि विनाशाला एक निराशाजनक कथा म्हणतात. ते लिहितात,"its evident moral is that civilization is a precarious thing, whose delicate complex of order and liberty, culture and peace" कधीही युद्ध आणि क्रूर हिंसाचाराने उलथून टाकली जाऊ शकते.[७४]साचा:Refn

हे देखील पहा[संपादन | स्रोत संपादित करा]

ग्रंथसूची[संपादन | स्रोत संपादित करा]

चित्रदालन[संपादन | स्रोत संपादित करा]

नोंदी[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Reflist

संदर्भ[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Reflist

बाह्य दुवे[संपादन | स्रोत संपादित करा]

साचा:Commons category साचा:Wikivoyage

साचा:भारतातील जागतिक वारसा स्थाने

  1. साचा:Cite web
  2. २.० २.१ २.२ साचा:Harvnb
  3. ३.० ३.१ साचा:Cite book
  4. ४.० ४.१ साचा:Cite book, कोट "तिच्या वैभवाच्या शिखरावर, सुमारे ५,००,००० आणि साठ चौरस मैल लोकसंख्येसह, सीए. १५००, विजयनगर हे बीजिंगच्या मागे जगातील दुसरे सर्वात मोठे शहर होते."
  5. ५.० ५.१ साचा:Harvnb
  6. साचा:Cite journal
  7. ७.० ७.१ ७.२ ७.३ ७.४ ७.५ ७.६ ७.७ ७.८ हम्पी येथील स्मारकांचा समूह, युनेस्को
  8. साचा:Cite book
  9. साचा:Cite book
  10. १०.० १०.१ साचा:Harvnb
  11. साचा:Cite book
  12. १२.० १२.१ १२.२ १२.३ साचा:Cite book
  13. १३.० १३.१ १३.२ १३.३ साचा:Cite book
  14. साचा:Cite book
  15. १५.० १५.१ साचा:Cite book
  16. साचा:Cite book
  17. साचा:Cite book
  18. १८.० १८.१ साचा:Cite book
  19. साचा:Cite book
  20. साचा:Cite book
  21. २१.० २१.१ साचा:Cite book
  22. साचा:Cite book
  23. साचा:Cite book
  24. साचा:Cite book
  25. साचा:Cite book
  26. साचा:Harvnb; साचा:Harvnb; एन. वेंकटरामनय्या, द अर्ली मुस्लिम एक्सपान्शन इन साऊथ इंडिया, १९४२; बी सूर्य नारायण राव, हिस्ट्री ऑफ विजयनगर, १९९३; साचा:Harvnb
  27. २७.० २७.१ २७.२ साचा:Cite book
  28. साचा:Cite book
  29. साचा:Cite book, उल्लेख: "जानेवारी १५६५ मध्ये जेव्हा युद्ध सुरु झाले तेव्हा ते विजयनगरच्या बाजूने वळत असल्याचे दिसत होते - तथापि, अचानक, विजयनगरचे दोन मुस्लिम सेनापतींनी पक्ष बदलला. रामरायाला कैद करण्यात आले आणि ताबडतोब शिरच्छेद करण्यात आला."
  30. रॉबर्ट सेवेल, अ फॉरगॉटन एम्पायर, जॉर्ज ॲलन अँड अनवीन, १९२४ पुनर्मुद्रण (प्रथम वर्ष: १९००)
  31. साचा:Cite web
  32. हंपी, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण
  33. ३३.० ३३.१ साचा:Cite book
  34. ३४.० ३४.१ ३४.२ साचा:Cite journal
  35. ३५.० ३५.१ साचा:Cite journal
  36. साचा:Cite book
  37. ३७.० ३७.१ ३७.२ ३७.३ साचा:Cite journal
  38. ३८.० ३८.१ साचा:Cite journal
  39. साचा:Cite journal
  40. साचा:Cite journal
  41. साचा:Cite web
  42. साचा:Cite book
  43. जेम्स मॅलिन्सन आणि डॅनिएला बेविलाक्वा (२०१६), द हट योग प्रोजेक्ट, SOAS, युनिव्हर्सिटी ऑफ लंडन
  44. साचा:Cite book
  45. साचा:Cite book
  46. साचा:Cite news
  47. साचा:Cite book
  48. साचा:Cite journal
  49. साचा:Cite book
  50. ५०.० ५०.१ साचा:Cite journal
  51. साचा:Cite book
  52. साचा:Cite book
  53. ५३.० ५३.१ साचा:Cite book
  54. साचा:Cite book
  55. साचा:Cite book
  56. ५६.० ५६.१ साचा:Cite book
  57. साचा:Cite book
  58. साचा:Cite book
  59. ५९.० ५९.१ ५९.२ साचा:Cite journal
  60. साचा:Cite journal
  61. साचा:Cite book
  62. रॉजर डन (२००५), फोटोग्राफ्स ऑफ हंपी, इंडिया, ब्रिजवॉटर रिव्हीयू, 24(1), pp. १५–१८
  63. कॅथलीन मॉरिसन आणि कार्ला सिनोपोली (१९९१), विजयनगर महानगर प्रदेशातील पुरातत्व सर्वेक्षण: १९९०, इन विजयनगर: प्रोग्रेस ऑफ रिसर्च, संपादक: डी व्ही देवराज, सी एस पाटील, पाने ६७–६९
  64. साचा:Cite journal
  65. जैन: हंपी
  66. साचा:Cite journal
  67. साचा:Cite journal
  68. साचा:Cite book
  69. साचा:Cite book
  70. साचा:Cite book
  71. साचा:Cite book
  72. ७२.० ७२.१ साचा:Cite book
  73. साचा:Cite book
  74. साचा:Cite book