बौद्ध धर्म
| संस्थापक | गौतम बुद्ध |
|---|---|
| स्थापना | इ.स.पू. ६वे शतक |
| स्थान | भारत |
| अनुयायी | १८० कोटी |
| प्रमुख तीर्थस्थळे | लुंबिनी, गया, कुशीनगर, सारनाथ |
| धर्मग्रंथ | तिपिटक |
| संप्रदाय | थेरवाद, महायान, वज्रयान, नवयान |
बौद्ध धर्म संपादन
साचा:बौद्ध धर्म बौद्ध धर्म (इंग्रजी: Buddhism / बुद्धिझम) हा भारताच्या श्रमण परंपरेतून निर्माण झालेला एक धम्म (जीवन जगण्याची विचारधारा) आणि तत्त्वज्ञान आहे. बौद्ध धर्म हा एक सत्य अनादि शुद्ध सद्धम्म आहे.याचे वर्णन धम्मपदा मध्ये आणि याच सद्धम्मामार्गापासुन अनेक पंथाची उत्पति झाली आहे. तसेच हा एक प्राचीन भारतीय धर्म आहे त्यासबौद्ध धम्म, बुद्ध धर्म, बुद्ध धम्म असेही म्हणतात. तथागत बुद्ध यांनी इ.स.पू. ६ व्या शतकात बौद्ध धर्माचे धम्मचक्कपरिवर्तन करून महान उपदेश दिले आहे बौद्ध धर्माची स्थापना स्वतः बुद्धत्वापासुन झाली आहे कारण बुद्धांची परंपरा ही अनादि आहे भगवान गौतम बुद्धाच्या पहिल्या पण बुद्ध होउन गेले आहेत त्यामुळे तीच अनादि परंपरा गौतम बुद्धानी पुढे नेली आहे याचा उल्लेख त्रिपीटक ग्रंथ (बुद्ध वंश) यामध्ये आढळून येतो. तथागत बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर पुढील दोन शतकांत, सम्राट अशोकांच्या काळात बौद्ध धर्माचा भारतभर प्रसार झाला आणि त्यापुढील दोन हजार वर्षांमध्ये हा धर्म मध्य, पूर्व आणि आग्नेय जम्बुमहाद्वीपामध्ये (ईस्ट इंडीज) सोबतच जगभरात पसरला. बौद्ध धर्म हा आपल्या जन्मस्थानापासून निघून जगभर पसरलेला जगातील पहिला धर्म होय. बौद्ध धर्म हा निरीश्वरवादी, अनात्मातावादी, समतावादी, विज्ञानवादी, मानवतावादी धर्म होय. गौतम बुद्ध यांनी मानवजातीला प्रज्ञा, शील, करुणा या तत्त्वांची शिकवण दिली. बौद्ध धर्म हा स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, करुणा, मैत्री (प्रेम), प्रज्ञा, मानवी मूल्ये, विज्ञानवाद या तत्त्वांचा पुरस्कर्ता आहे. आधुनिक विज्ञान आणि मानवी मूल्यांचे समर्थन करणारा धर्म म्हणून बौद्ध धर्माला एक वेगळी ओळख मिळालेली आहे.[१]
एका अहवालानुसार, जगातील सुमारे १.८ अब्ज ते २.१ अब्ज (२५% ते २९%) लोकसंख्या बौद्ध धर्माची अनुयायी आहे.[२][३] लोकसंख्येच्या दृष्टीने बौद्ध धर्म हा ख्रिश्चन धर्मानंतर जगातील दुसरा सर्वात मोठा धर्म आहे.[४][५] सर्वाधिक बौद्ध अनुयायी चीन राहतात. काही अहवालांनुसार, ८०% ते ९१% चिनी लोकसंख्या (११० कोटी ते १२२ कोटी) बौद्ध धर्मीय आहे.[६] बौद्ध धर्म हा जगातील २०० पेक्षा अधिक देशांत असून २० देशांत बहुसंख्यक आहे. आज सर्वच खंडांत तथागत बुद्धांचे अनुयायी आहेत. आशिया खंडात तर बौद्ध धर्म हा मुख्य धर्म आहे. आशिया खंडाची जवळपास अर्धी (४९%) लोकसंख्या ही बौद्धधर्मीय आहे. अनुयायांच्या तुलनेत ख्रिश्चन धर्मानंतर (२ अब्ज) जगतात सर्वाधिक अनुयायी बौद्ध धर्माला (१.८ अब्ज) लाभलेले आहेत. परंतु भारतातील कोट्यवधी हिंदू, दलित धर्मीयांनी तसेच जगभरातील अनेक मानवतावादी विज्ञानवादी लोकांनी बौद्ध धर्माचे अनुयायित्व पत्करले आहे त्यामुळे या सर्व बौद्ध अनुयायांची एकत्रित लोकसंख्या ही २.३ अब्जांवर आहे. यानुसार बौद्ध धर्म हा जगातील सर्वाधिक अनुयायी असलेला धर्मसुद्धा ठरतो.
उदय संपादन
ऐतिहासिक दृष्टिकोनातून बौद्ध धर्म हा भारतातील एक अतिप्राचीन, तत्त्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून मानवी मूल्यांचा पुरस्कर्ता, विज्ञाननिष्ठ व परिवर्तनशील धर्म आहे. बौद्ध धर्म हा भारतीय धर्म असून भारताच्या इतिहासात या धर्माच्या उदयाला मोठे स्थान आहे. बौद्ध धर्माचा विकास इ.स.पू. ६ ते इ.स. ६ ह्या कालावधीत झाला. बौद्ध संस्कृतीचे सर्वात मोठे योगदान मौर्य कला, गांधार कला व मथुरा कला यांत आढळते. तर बौद्ध धर्माचा व तत्त्वांचा प्रसार भारताबरोबरच शेजारील अनेक देशांमध्येही झालेला आहे. त्रिपिटकाच्या स्वरूपातील साहित्य व विविध पंथीय साहित्य हे बौद्ध संस्कृतीच्या रूपाने जगातील अनेक देशांमध्ये पसरले. बौद्ध संस्कृतीचा ठसा हा विहार, स्तूप, मठ, चैत्य व लेण्या ह्या मौर्य कलेच्या प्रतीकांच्या रूपाने स्पष्ट दिसतो. त्याच्या विकासाला जवळजवळ १,१०० वर्षे लागली. जगाच्या आणि भारताच्या जीवनविषयक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि विशेषतः धार्मिक बाजूंवर बौद्ध धर्माची खोलवर व न पुसणारी अशी छाप पडलेली आहे.
बौद्ध धर्माच्या इतिहासाप्रमाणे बौद्ध धर्माच्या स्वरूपात अनेक स्थित्यंतरे होत गेली व या काळात मुसलमानांची आक्रमणे भारतात झाली. भारतातून बौद्ध धर्म गायब होण्यामागे येथील हिंदू धर्म (वैदिक धर्म / ब्राह्मणी धर्म) आणि हिंदू राजांनी केलेले अत्याचारही कारणीभूत आहेत, असे म्हणतात.[७]
तथागत गौतम बुद्धांचे जीवन संपादन
तथागत गौतम बुद्ध (इ.स.पू. ५६३ – इ.स.पू. ४८३) हे बौद्ध धर्माचे संस्थापक होते. ते तत्त्वज्ञ, आद्य वैज्ञानिक, थोर समाज सुधारकही होते. बुद्धांचे मूळ नाव ‘सिद्धार्थ’ होय. शाक्य गणराज्याचा राजा शुद्धोधन व त्यांची पत्नी महाराणी महामाया (मायादेवी) यांचे पोटी इ.स.पू. ५६३ मध्ये राजकुमाराचा जन्म लुंबिनी येथे झाला. राजकुमाराचे नाव ‘सिद्धार्थ’ असे ठेवण्यात आले. सिद्धार्थाच्या जन्मानंतर अवघ्या सातव्या दिवशीच त्यांची आई महामायाचे निधन झाले. आईचे छत्र हरवलेल्या सिद्धार्थाचा सांभाळ त्यांची मावशी व सावत्र आई महाप्रजापती गौतमीने केला. त्यामुळे राजकुमार सिद्धार्थाला ‘गौतम’ या नावानेही ओळखले जाते. राजकुमार सिद्धार्थ गौतमास आवश्यक असे सर्व शिक्षण देण्यात आले. यशोधरा या सुंदर राजकुमारीशी सिद्धार्थ गौतमाचा इ.स.पू. ५४७ मध्ये विवाह झाला. त्यांना राहुल नावाचा पुत्र झाला.
बौद्ध अनुयायी लोक गौतम बुद्धांना वर्तमानातील सर्वश्रेष्ठ बुद्ध (संमासंबुद्ध) मानतात. जगाच्या इतिहासातील महामानवांमध्ये तथागत बुद्ध हे सर्वश्रेष्ठ मानले जातात. इंग्लंडच्या जगप्रसिद्ध ऑक्सफोर्ड विद्यापीठाने, ज्यांनी आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग करून मानव जातीच्या उत्थानासाठी महान कार्ये केली, अशा मागील १० हजार वर्षामधील जगातील सर्वश्रेष्ठ समजल्या गेलेल्या १०० विश्वमानवांची यादी तयार केली होती. त्या यादीत विद्यापीठाने प्रथम स्थानी तथागत बुद्धांना ठेवले होते. जागतिक इतिहासातील सर्वाधिक प्रभावशाली मानव म्हणून बुद्धांचे नाव अग्रस्थानी आहे. आचार्य रजनीश (ओशो) बुद्धांबद्दल म्हणतात की, ‘‘बुद्धानंतर त्यांच्या जवळपास जाऊ शकेल असा महामानव भारताने किंवा जगाने आजपर्यंत केला नाही.’’
‘शाक्यमुनी’ (शाक्यांचा मुनी) हे गौतमाचेच दुसरे नाव. बुद्ध हे बौद्ध धर्माचे मुख्य स्तंभ आहेत. त्यांची जीवनकहाणी, त्यांची प्रवचने आणि त्यांनी घालून दिलेले विहाराचे नियम पवित्र मानून ते त्यांच्या अनुयायांनी गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर संकलित केले. गौतम बुद्धांच्या मानल्या जाणाऱ्या विविध शिकवणुकी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पाठांतराद्वारे सुपूर्द होत गेल्या. त्यांच्या महापरिनिर्वाणानंतर साधारण ४०० वर्षांनंतर ही शिकवणूक लेखी स्वरूपात प्रथम मांडली गेली.
ज्ञानप्राप्ती संपादन
गृहत्यागानंतर सिद्धार्थ गौतमाने ज्ञानप्राप्तीसाठी खूप चिंतन केले, कठोर तपस्या केली. आताच्या बिहार राज्यातील गया येथे निरंजना नदीच्या काठी पिंपळाच्या वृक्षाखाली धानस्थ बसले असता, इ.स.पू. ५२८ मध्ये वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी त्यांना दिव्य ज्ञानप्राप्ती झाली. या ‘दिव्य ज्ञाना’ला ‘संबोधी’, ‘बुद्धत्व’ किंवा ‘निर्वाण’ असेही म्हणतात. ज्ञानप्राप्तीनंतर सिद्धार्थ गौतमाला सर्वजण ‘बुद्ध’ असे म्हणू लागले. बुद्ध ही व्यक्ती नव्हे ती ज्ञानाची अवस्था आहे. ‘बुद्ध’ म्हणजे अतिशय ज्ञानी मनुष्य. बुद्धांना पिंपळाच्या वृक्षाखाली ‘बुद्धत्व’ प्राप्त झाले म्हणून या वृक्षाला ‘बोधिवृक्ष’ (ज्ञानाचा वृक्ष) असे म्हणतात.
धम्मचक्र प्रवर्तन संपादन
ज्ञानी बुद्धांनी उत्तर प्रदेशातील सारनाथ येथे पाच पंडितांना पहिला उपदेश दिला. त्यांच्या पहिल्या उपदेशास ‘धम्मचक्रप्रवर्तन’ किंवा ‘धम्मचक्कपवत्तन’ असे म्हणतात. या प्रवचनात बुद्धांनी बौद्ध धम्माची मूलतत्त्वे सांगितली. त्यात त्यांना अनेक शिष्य लाभले आणि बौद्ध धर्म वाढीस लागला. तथागत बुद्धांनी स्वतः ६व्या शतकामध्ये जवळजवळ १ लक्ष लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली.
महापरिनिर्वाण संपादन
इ.स.पू. ४८३मध्ये वयाच्या ८०व्या वर्षी कुशीनगर येथे तथागत बुद्धांचे महापरिनिर्वाण झाले.
उत्तर प्रदेशातील कुशीनगरयेथे बुद्धांच्या निर्वाणानंतर त्यांचा अत्यंसंस्कार जेथे झाला,तेथे रामाभर स्तूप उभारला आहे.
तत्त्वज्ञान व शिकवण संपादन
साचा:मुख्य भगवान बुद्धांनी ‘पाली’ या लोकभाषेतून अत्यंत साध्या आणि सोप्या पद्धतीने बौद्ध धर्माची शिकवण, आचार-विचार सांगितले. बुद्धांनी धर्माची शिकवण व आचरण यासाठी त्रिशरण, चार आर्यसत्य, अष्टांगिक मार्ग (मध्यम मार्ग) व पंचशील सांगितलेले आहेत.
चार आर्यसत्ये संपादन
भगवान गौतम बुद्ध म्हणतात, ‘‘मानवी जीवन हे दुःखमय आहे, दुःखाची निर्मिती तृष्णेतून (वासना, इच्छा, आसक्ती, आवड) होते, म्हणून या तृष्णेवर आपल्या इच्छांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. यासाठी मध्यम मार्गाचा अवलंब केला पाहिजे. मानवी व्यवहाराच्या मुळाशी चार आर्यसत्ये आहेत.
- दुःख - मानवी जीवन हे दुःखमय आहे.
- तृष्णा - मनुष्याच्या न संपणाऱ्या इच्छा हे दुःखाचे कारण आहे.
- दुःख निरोध - दुःखाचे निराकरण वा अंत सर्व प्रकारची आसक्ती सोडण्याने होते.
- प्रतिपद् - दुःख निवारण्यासाठी सदाचाराचा मार्ग (अष्टांग मार्ग) आहे.
महान बौद्ध विद्वान व बोधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मते, या चार आर्यसत्यामधील पहिले व शेवटचे ही दोनच आर्यसत्त्वे महत्त्वाची आहेत. पहिले - दुःख आहे आणि शेवटचे प्रतिपद् - दुःख निवारण्याचा (अष्टांग) मार्ग आहे.
पंचशील संपादन
साचा:मुख्य बुद्धांनी आपल्या अनुयायांना खालील पाच शीलांची शिकवण दिलेली आहे.
- अहिंसा :- मी जीवहिंसेपासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
- मी चोरी करण्यापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
- मी कामवासनेच्या अनाचारापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
- मी खोटे बोलण्यापासून अलिप्त रहाण्याची शपथ घेतो.
- मी मद्य, मादक तसेच इतर सर्व मोहांत पाडणाऱ्या मादक वस्तूंच्या सेवनापासून अलिप्त रहाण्याचीं शपथ घेतो.
या बौद्ध तत्त्वांचा, शिकवणुकीचा मानवाने जीवनात अंगीकार केला तर मानवी अस्तित्व असताना नक्कीच तो दुःखमुक्त होऊन आदर्श जीवन जगू शकतो.
अष्टांगिक मार्ग संपादन
साचा:मुख्य महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी सारनाथ येथे धम्मचक्र प्रवर्तनाचे विवेचन करतांना नीती व सदाचाराला महत्त्व देऊन मानवाचे जीवन सुखकर होण्यासाठी तसेच निवार्णाच्या समीप पोहोचण्यासाठी हा ‘अष्टांग मार्ग’ किंवा ‘मध्यम मार्ग’ सांगितला.
- अष्टांगिक मार्ग
अष्टांग मार्ग हा सदाचाराचा मार्ग होय. ह्या आठ गोष्टींच्या पालनामुळे मानवाचे जीवन सुखमय होते.
- सम्यक दृष्टी :- निसर्ग नियमाविरुद्ध कोणतीही गोष्ट होऊ शकते ही गोष्ट न मानणे.
- सम्यक संकल्प :- म्हणजे योग्य निर्धार, विचार.
- सम्यक वाचा :- करुणायुक्त व सत्यपूर्ण वाचा (बोल) ठेवण्याचा प्रयत्न करणे.
- सम्यक कर्मांत :- उत्तम कर्म म्हणजे योग्य कृत्ये करणे.
- सम्यक आजिविका :- वाईट मार्गाने आपली उपजीविका न करता ती सन्मार्गानेच करणे.
- सम्यक व्यायाम :- वाईट विचार निर्माण झाल्यास त्याचा त्वरित नाश करणे.
- सम्यक स्मृती :- तात्त्विक गोष्टींचे स्मरण करून चित्तास (मनाला) जागृत ठेवणे.
- सम्यक समाधी :- कोणत्याही वाईट विकारांना स्पर्श होऊ न देता दुष्ट प्रवृत्तीपासून मन अलग ठेवून चित्त प्रसन्न आणि शांत ठेवणे.
दहा पारमिता संपादन
बुद्धांनी सांगितलेल्या या दहा पारमिता ह्या शील मार्ग होत.
- शील :- शील म्हणजे नीतिमत्ता, वाईट गोष्टी न करण्याकडे असलेला मनाचा कल.
- दान :- स्वार्थाची किंवा परतफेडीची अपेक्षा न करता दुसऱ्याच्या भल्यासाठी स्वतःची मालमत्ता, रक्त, देह अर्पण करणे.
- उपेक्षा :- निरपेक्षतेने सतत प्रयत्न करीत राहणे.
- नैष्क्रिम्य :- ऐहिक सुखाचा त्याग करणे.
- वीर्य :- हाती घेतलेले काम यत्किंचितही माघार न घेता अंगी असलेल्या सर्व सामर्थ्यानिशी पूर्ण करणे.
- शांति :- शांति म्हणजे क्षमाशीलता, द्वेषाने द्वेषाला उत्तर न देणे.
- सत्य :- सत्य म्हणजे खरे, माणसाने कधीही खोटे बोलता कामा नये.
- अधिष्ठान :- ध्येय गाठण्याचा दृढ निश्चय.
- करुणा :- सर्व प्राणिमात्र, मानवाविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता.
- मैत्री :- मैत्री म्हणजे सर्व प्राणी, मित्र, शत्रूविषयी देखील नव्हे तर सर्व जीवनमात्रांविषयी बंधुभाव बाळगणे.
विज्ञाननिष्ठत्व संपादन
बौद्ध धर्माचे तत्त्वज्ञान हे बहुतांशी विज्ञानवादी / विज्ञाननिष्ठ आहे. खालील बाबींत विज्ञान व बौद्ध धर्मात समानता आहे. विज्ञान व बौद्ध धर्माचा एकच उद्देश आहे - ‘सत्याचा शोध’.
देव (ईश्वर) नाही संपादन
विश्वामध्ये देव वा ईश्वर नावाची कसलीही गोष्ट, वस्तू किंवा प्राणी अस्तित्वात नाही. बौद्ध धम्मामध्ये देवाला स्थान नाही. तथागत भगवान बुद्धांनी देव नाही हा सिद्धान्त अनेक दृष्टीने पटवून दिला आहे. विज्ञानाच्या सिद्धांताप्रमाणे जगात देव नाही. कारण, त्याचा आकार कसा, स्थान याबद्दल याबद्दल कोणालाही माहिती नाही. देव ही मानवी मनाची काल्पनिक संकल्पना आहे.
आत्मा नाही संपादन
विज्ञानानुसार शरीरामध्ये कोठेही आत्म्याचे स्थान नाही, हा सिद्धान्त तथागत भगवान बुद्धांनी इसवी सनाच्या सहा शतके आधी सांगितला. शरीर चार महाभूतांनी बनलेले आहे. त्यांमध्ये पृथ्वी, आप, तेज आणि वायू यांचा समावेश आहे. मनुष्यप्राणी जेव्हा मरतो तेव्हा ही चारही महाभूते निसर्गातील आपापल्या घटकामध्ये विलीन होतात. त्यामुळे शरीरामध्ये आत्मा नाही हे सिद्ध होते. मानवाच्या शरीरामध्ये आत्मा नावाचा कोणताही भाग आढळत नाही.
अनैसर्गिक मार्गांनी जन्म नाही संपादन
नैसर्गिक प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कुणाचाही जन्म होत नाही. त्यामध्ये टेस्ट ट्यूब बेबी किंवा आणखी नवीन विज्ञानाच्या नवीन अविष्कार याचा समावेश असतो, कारण आपोआप काहीही होत नाही. म्हणजेच अनैसर्गिक मार्गाने कोणाचाही जन्म होत नाही. या कसोटीला बौद्ध धम्म तंतोतंत उतरतो. बुद्धांना एका ब्राह्मणाने प्रश्न विचारला की, ‘आपण कोण आहात?’ तेव्हा तथागत म्हणतात की, ‘राजा शुद्धोधन आणि महामाया यांचा मी औरस पुत्र आहे. परंतु स्वतःच्या प्रयत्नांनी मी बौद्धिक प्रगती केलेली आहे. तेव्हा तू मला फार तर प्रबुद्ध मानव समज.’
परिणाम सर्वत्र सारखेच संपादन
विज्ञानामध्ये एखादे संशोधन झाले तर त्याचा जो परिणाम होईल किंवा जाणवेल तो जगाच्या पाठीवर कुठेही सारखाच जाणवेल त्यामध्ये कमी अधिक परिणाम किंवा प्रमाण असणार नाही. त्याप्रमाणे बौद्ध धम्माचे आचरण केल्यास, धम्म अनुसरल्यास त्याचा परिणाम सर्वत्र सारखाच जाणवतो.
दैववाद (नशीब) अमान्य संपादन
भगवान बुद्धांनी कर्म सिद्धान्त सांगितला. त्यांच्या म्हणण्यानुसार दैव, देव, नशीब, नियती या सर्व संकल्पना चुकीच्या आहेत. तुम्ही ज्याप्रमाणे वर्तन कराल त्याप्रमाणे तुम्हाला फळ मिळेल, असे विज्ञान सांगते. भगवान बुद्धांच्या कर्म सिद्धांताप्रमाणे आदर्श समाज घडवायचा असेल तर कुशल कर्म करावे म्हणजेच दैववाद, नशीब यांवर अवलंबून राहू नये. स्वकर्म चांगले तर त्याचा परिणाम चांगला ही नीती बौद्ध धम्माचा गाभा आहे.
जगाची उत्क्रांती संपादन
उत्क्रांती वादाचा जनक चार्ल्स डार्विन १९व्या शतकात होऊन गेला. विज्ञानाच्या आधारे जगाचा हळूहळू विकास होत गेला. विश्व कोणी निर्माण केले नाही हा डार्विनचा १९व्या शतकातील विज्ञानवादी सिद्धान्त अगोदर २५०० वर्षापूर्वी इ.स.पू. ६व्या शतकात भगवान बुद्धांनी संपूर्ण जगाला सांगितला आहे. याचाच अर्थ बौद्ध धर्म हा विज्ञानवादी धर्म आहे आणि विज्ञानवाद हा बुद्ध धर्माचाच प्रतिध्वनी होय.
विज्ञानाची नम्रता संपादन
भगवान बुद्ध म्हणतात, ‘‘मी सांगतो म्हणून तुम्ही खरे मानू नका, तर या आणि पहा तुमच्या बुद्धीला पटेल तरच धम्माचा स्वीकार करा. तसेच धम्म हा सर्वांसाठी खुला आहे. त्यामध्ये जात, पंथ, लिंग इत्यादी कोणताही भेद नाही.” विज्ञानाने केलेले संशोधन हे अंतिम आहे, असे विज्ञान मानीत नाही, म्हणजे बौद्ध आचारसंहिता व विज्ञान यामध्ये हे साम्य आहे.
अनित्य संपादन
जगामध्ये सतत बदल होत असतात ते स्थिर (नित्य) असे नसते. ग्रह, तारे, पृथ्वी वगैरे विश्वात काही नित्य नाही. असे विज्ञान स्पष्ट सांगते. भगवान बुद्धांनी सुद्धा सर्व अनित्य आहे. सर्व बदलत असते, सर्व सजीवांमध्येही क्षणाक्षणाला बदल होत असतो.
अकारण काहीही नाही संपादन
प्रत्येक गोष्टीला कारण असते, आपोआप कुठलीही गोष्ट होत नाही असा विज्ञानाचा सिद्धान्त आहे. निसर्गामध्ये चमत्कार अद्भुत शक्ती, मंत्र इत्यादी अस्तित्वात नाही हाच सिद्धान्त भगवान बुद्धांनी प्रतित्य समुपाद या नावाने मांडला. त्यात बुद्धांनी सांगितले की, प्रत्येक गोष्टीला कारण असते. कारणाशिवाय काहीही होत नाही. यालाच धम्मात कार्यकारणभाव सिद्धान्त म्हणतात. बौद्ध धर्माचा प्रत्येक सिद्धान्त विज्ञानाच्या कसोटीला उतरतो. जगाच्या पाठीवर घडणारी प्रत्येक घटना ही ही कुठल्याना कुठल्या कारणामुळे घडत असते हे सांगत असतानाच गौतम बुद्धांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून या जगातील सर्व गोष्टींचा विचार केलेला दिसतो. कुठली गोष्ट नित्य नाही व ती कायम टिकणारी नाही. जी प्रत्येक गोष्ट जगामध्ये निर्माण होते ती अनित्य असून तिचा नाश होतो त्यामुळे सम्यक दृष्टिकोन ठेवून आपण प्रत्येक गोष्टीकडे पाहिले पाहिजे निसर्गाचे चक्र हे कायम असून माणसाची आसक्ती हे त्याच्या दुःखाचे मूळ कारण आहे असे प्रतिपादन गौतम बुद्धांनी केले.
समाज जीवनावर प्रभाव संपादन
बौद्ध धर्माचा जगातील सर्व समाज जीवनावर प्रभाव पडलेला आढळतो. कारण बौद्ध धर्म सर्व श्रेष्ठ धर्म आहे .
बौद्ध तत्त्वज्ञानाचा हिंदू धर्मावरील प्रभाव संपादन
बौद्ध धर्मातील अहिंसा, सर्व प्राणिमात्रांविषयी प्रेम व सहानुभूती इत्यादी विचारांनी हिंदू धर्मावर प्रभाव टाकला. त्यामुळेच वैदिक धर्मीयांना पुढे अहिंसा (non-voilence) तत्त्वाच्या आवश्यकतेवर भर द्यावा असे वाटले.
वैचारिक स्वातंत्र्य संपादन
वैचारिक स्वातंत्र्य हे बौद्ध धर्मात खोलवर रुजलेले असून, त्याचा हिंदूंच्या, कोणत्याही प्रकारची शंका उपस्थित न करता, वैदिक परंपरांचे पालन करण्याच्या पारंपरिक विचारपद्धतीवर परिणाम झाला.
सद्गुणांचा विकास संपादन
बौद्ध धर्माने अहिंसा, सत्य, अस्तेय, इंद्रिय संयम व मादक पदार्थाचे सेवन करू नये ह्या पाच शील तत्त्वे (पंचशील तत्त्वे) पालन करण्याचा उपदेशच केला नाही तर ती शिकविली आहेत व त्यामुळे सद्गुणांचा विकास होण्याला हातभार लागला आहे.
समता तत्त्वाचा प्रभाव संपादन
तथागत गौतम बुद्धांनी जात, संप्रदाय, वर्ण व सामाजिक दर्जा ह्या कोणत्याही बाबींचा विचार न करता सर्व व्यक्तींमध्ये समता (equality) प्रस्थापित करण्याविषयी धर्मोपदेश केला. त्याचा जातिव्यवस्थेवर आधारलेल्या पारंपरिक हिंदू समाजरचनेवर प्रभाव पडला.
वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास संपादन
विज्ञानवादी बौद्ध धर्माने लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन बिंबविण्यासाठी साहाय्य केले आहे. या धर्माची मूलतत्त्वे व तत्त्वज्ञान ही विज्ञानधिष्ठित असल्याने, त्याच्या शिकवणीतून लोकांमध्ये वैज्ञानिक दृष्टी येण्यास हातभार लागला आहे. २० व्या शतकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर व अल्बर्ट आईन्स्टाईनसारख्या अनेक विचारवंतांनी बौद्ध धर्मच खरा विज्ञानवादी धर्म असल्याचे सांगतलेले आहे.
नैतिक सिद्धान्ताचा प्रभाव संपादन
करुणा (दयाबुद्धी), प्रामाणिकपणा, प्रेम, परोपकार, अहिंसा, क्षमाशिलता, शीलसंवर्धन, यांसारख्या नैतिक बाबींवर बौद्ध धर्मात भर देण्यात आला. याचा वैदिक हिंदू धर्माच्या नियतिवादावर परिणाम झाला. यामुळेच बौद्ध धर्म हा अगदी भिन्न असलेला स्वतंत्र व प्रभावशाली धर्म आहे.
बौद्ध धर्माचे कलेतील योगदान संपादन
वास्तुविद्या, लेण्यांचे आणि विहारांचे खोदकाम आदी क्षेत्रांत बौद्ध धर्माचे योगदान खूप मोठे आहे. त्या काळी विहारे, स्तूप, मंदिरे, लेणी (गुंफा) - खोदकाम यांसारख्या वास्तुविद्या क्षेत्रांतील निर्मितीचा स्फोट झाला होता. त्यामुळे इतर धर्मीयांच्या कला क्षेत्रातील निर्मितीलाही चालना मिळाली.
बौद्ध धर्माने लोकांना वास्तुविद्या विकासासाठी प्रोत्साहित केले आहे. सुंदर विहारे, मंदिरे, स्तंभ, स्तूपे यांसारख्या बांधकामांना वाव देऊन, हा विकास साध्य केला आहे. आज जगातील पहिले सर्वाधिक सुंदर असलेले धार्मिक प्रार्थनास्थळ थायलंड मधील पांढऱ्याशुभ्र रंगाचा एक अप्रतिम बुद्ध विहार आहे.
स्थानिक भाषेतील साहित्यविषयक योगदान संपादन
बुद्ध, बौद्ध भिक्खू आणि बौद्ध धर्मप्रचारकांनी धार्मिक विचार हे लोकांच्या नेहमीच्या भाषेत (पाली) मांडल्यामुळे बौद्ध धर्माचा प्रसार जलद गतीने झाला. त्या काळी प्रचलित असलेल्या पालीसारख्या प्राकृत भाषेचा मोठा विकास झाला. बौद्ध धर्माने पाली भाषा व तिच्या धर्मग्रंथ व अन्य धार्मिक पुस्तकांच्या लिखाणाच्या माध्यमातून साहित्य विकासाला हातभार लावला आहे.
शिक्षणास प्रोत्साहन संपादन
बौद्ध धर्माने शिक्षण प्रसारास प्रोत्साहन दिले. बौद्ध विहार व मठ यांनी शिक्षण प्रसाराची केंद्रे म्हणून कार्य केले. बौद्ध भिक्खु हे मोठे विद्वान होते. बौद्ध धर्मास ज्या भारतीय सम्राटांनी व राजांनी पाठिंबा दिला त्यांनीही शिक्षणास प्रोत्साहन दिले. तक्षशिला व नालंदा या विद्यापीठांनी प्राचीन काळात खूप नाव कमावले होते. नालंदा हे बौद्ध विद्यापीठ म्हणूनच ओळखले जाई. बौद्ध धर्माने स्त्रीशिक्षणाचा व कनिष्ठ जातींच्या शिक्षणाचा देखील पुरस्कार केला.
भारतीय संस्कृतीचा परदेशात प्रसार संपादन
बौद्ध धर्माने परदेशात जेथे जेथे आपले पाय रोवले तेथे तेथे भारतीय बौद्ध संस्कृतीचे घटक प्रसारित होण्यास हातभार लागला. श्रीलंका, चीन, जपान, थायलंड, म्यानमार, भूतान, कोरिया, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, सिंगापूर, मंगोलिया, तैवान, हॉंगकॉंग इत्यादी देशांत बौद्ध धर्म हा प्रमुख धर्म असून आज जगातील जवळजवळ सर्वच देशांत बौद्ध धर्माचा प्रसार झालेला आहे. जगातील प्रत्येक देशांत बौद्ध अनुयायी आहेत. बौद्ध धर्माने भारतीय तसेच विदेशी समाजाला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
आर्थिक विकासाला प्रोत्साहन संपादन
बौद्ध धर्माने भारत देशाच्या आर्थिक विकासाला चालना दिली आहे. बौद्ध धर्मीय चक्रवर्ती सम्राट अशोक महान यांचे साम्राज्य जगातील सर्वात संपन्न व शक्तिशाली होते. त्यांच्या साम्राज्याचा बौद्ध धर्म हा राजधर्म होता. जगाच्या एकूण अर्थव्यस्थेत सर्वाधिक म्हणजेच ३४% वाटा हा सम्राट अशोकाच्या साम्राज्याचा होता. आज भारताचा जागतिक अर्थव्यस्थेतील वाटा कमी असला तरी चीन व जपान हे दोन बौद्ध राष्ट्रे जागतिक अर्थव्यस्थेत अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानी आहेत.
बौद्ध साहित्य संपादन
पाली भाषेतील ग्रंथ संपादन
- त्रिपिटक - पाली भाषेतील बौद्ध ग्रंथ फार प्राचीन आहेत. या ग्रंथात त्रिपिटक हा ग्रंथ फार मोठा व अत्यंत महत्त्वाचा आहे. हा महाभारत ग्रंथाच्या तिपटीने मोठा असून त्याची ग्रंथसंख्या सरासरी तीन लक्ष आहे. या ग्रंथाची भाषांतरे सिंहली, ब्रह्मी, चिनी, जपानी, वगैरे अनेक भाषांतून झाली आहेत. या ग्रंथाला त्रिपिटक हे नाव पडण्याचे कारण त्याचे तीन पिटक (पुडे) म्हणजे भाग आहेत. ते खालील प्रमाणे:
- विनयपिटक - यांत भिक्षुकांनी पाळण्याच्या नियमांचा संग्रह आहे. याचे पाच भाग आहेत.
- पाराजिका
- पाचितियादि
- महावग्ग
- चुल्लवग्ग
- परिवारपाठ
- सुत्तपिटक - यात बुद्धांच्या उपदेशांचा संग्रह आहे. याचे पाच मोठे ‘निकाय’ (पोटभाग) आहेत.
- अभिधम्मपिटक - यात बौद्ध तत्त्वज्ञानाचे विवेचन आहे. यात सात भाग आहेत.
- धम्मसंगणि
- विभंग
- धातुकथा
- पुग्गलपज्जत्ति
- कथावत्थु
- यमक
- पठ्ठान
- विनयपिटक - यांत भिक्षुकांनी पाळण्याच्या नियमांचा संग्रह आहे. याचे पाच भाग आहेत.
- मिलिंदपन्हो
- दीपवंस व महावंस
संस्कृत भाषेतील ग्रंथ संपादन
तिबेटी भाषेतील ग्रंथ संपादन
- क्यांग-र
- ग-छेररोल्प
चिनी भाषेतील ग्रंथ संपादन
- महाभिनिष्क्रमणसूत्र
- महापरिनिर्वाणसुत्त
- जातक-निदान
- महावंस
ब्रह्मी भाषेतील ग्रंथ संपादन
म्यानमार देशांत ‘मलंगवत्तु’ नावाचा ग्रंथ प्रसिद्ध आहे. हे एका पाली ग्रंथाचे भाषांतर आहे. याशिवाय अन्य संस्कृत व पाली ग्रंथांची ब्रह्मी भाषेत भाषांतरे झाली आहेत.
सिंहली भाषेतील ग्रंथ संपादन
- दीपवंस
- महावंस — (लेखक- महानाम)
- ज्ञानोदय
मराठी भाषेतील ग्रंथ संपादन
- आपला बौद्ध धर्म (चंद्रकांत बीडकर)
- कथा गौतम बुद्धाची (रमेश पतंगे)
- ख्रिस्त, बुद्ध आणि श्रीकृष्ण (डॉ. वि.रा. करंदीकर)
- भगवान गौतम बुद्ध आणि बौद्ध धर्म (गंगाधर महाम्बरे)
- गौतम बुद्धाचा धम्मच जगाला वाचवू शकेल (डी.डी. बंदिष्टे)
- गौतमबुद्ध ते महात्मा गांधी (न.चिं. केळकर)
- गौतम बुद्ध व त्याचे बौद्धदर्शन (रा.ना. चव्हाण)
- गौतम बुद्ध जीवनकार्य आणि तत्त्वज्ञान (डॉ. शशिकांत साळवे)
- गौतम बुद्धांचे चरित्र (कृष्णराव अर्जुन केळूसकर)
- गौतम बुद्धांच्या गोष्टी (डॉ. प्रभाकर चौधरी)
- गौतम बुद्धांच्या गोष्टी (बालसाहित्य, लेखक - रमेश मुधोळकर)
- जातककथा (गौतम बुद्धाच्या पूर्व जन्मातील कथा. अशा या ५४६ कथा आहेत. बुद्धाने प्रत्येक जन्मात एकेक गुण मिळवून शेवटी बुद्धपद गाठले. दुर्गा भागवत यांनी पालीमधील या कथांचे मराठी भाषांतर करून त्या ७ खंडांत आणि ३,२०० पानांत लिहिल्या)
- जातककथा (धर्मानंद दामोदर कोसंबी)
- जातकमाला (मूळ पाली जातककथांचा संस्कृत अनुवाद)
- जातककथा : खरी मैत्री आणि इतर कथा... (बालसाहित्य, लेखक - संजय कोल्हटकर)
- जातककथा - लबाड कोल्हा आणि इतर कथा...(बालसाहित्य, लेखक - संजय कोल्हटकर)
- थेरवाद बौद्धदर्शन (डॉ. ज.र. जोशी)
- धम्मपदं (नवसंहिता) (आचार्य विनोबा भावे)
- धर्म व धर्मपंथ (प्र.न. जोशी)
- बालजातक : बालांसाठी जातककथा (एकूण ५३ निवडक कथा, लेखिका - दुर्गा भागवत)
- बुद्ध आणि त्यांचा धम्म (डॉ. बाबासाहेब आंबेडकर)
- बुद्ध आणि कार्ल मार्क्स (डॉ. बाबासाहेब आंबेडकर)
- बुद्ध, धर्म आणि संघ (धर्मानंद कोसंबी)
- बुद्ध - बुद्धी का उच्चतम विकास (हिंदी, लेखक - सरश्री)
- बुद्धा : द प्रॅक्टिकल मार्ग (विशाल नंदा )
- बुद्धाचा भौतिकवाद (डी.वाय. हाडेकर)
- बुद्धाचे आर्थिक विचार (मीना शेट्टे-संभू , प्रभावन विरियाखन)
- बुद्ध संप्रदाय आणि शिकवण (चिं.वि. जोशी)
- बोधि-सत्त्व (नाटक, धर्मानंद दामोदर कोसंबी)
- बोधिसत्वाच्या बोधपर ९० गोष्टी (रमेश मुधोळकर)
- बौद्धदर्शनसार (बापटशास्त्री)
- बौद्ध धम्माची पहिली संगीती (डी.टी. सावंत)
- बौद्ध धम्माचे आचरण कसे करावे? (विलास वाघ)
- बौद्ध धम्मात शिक्षेची संकल्पना (विलास वाघ)
- बौद्धधर्म मार्गदीप (हरिभाऊ पगारे)
- बौद्ध धर्माचा इतिहास (डॉ. अशोक भोरजार, प्रभाकर गद्रे)
- बौद्ध धर्माचे भारतीय संस्कृतीला योगदान (आर. डी. जाधव)
- बौद्ध धर्मातील स्त्रीविचार (डॉ. लता दिलीप छत्रे)
- बौद्ध नीतिकथा (डॉ. ज.र. जोशी)
- बौद्ध विचारधारा (संपादक : महेश देवकर, लता देवकर व प्रदीप गोखले)
- बौद्धपर्व अथवा बौद्ध धर्माचा साद्यंत इतिहास (वा.गो. आपटे)
- भगवान बुद्ध (धर्मानंद दामोदर कोसंबी)
- महात्मा गौतम बुद्ध (चरित्र, लेखक - साने गुरुजी)
- विदर्भातील बुद्ध धम्माचा इतिहास (डॉ. प्रदीप मेश्राम)
- विसुद्दीमग्ग (धर्मानंद दामोदर कोसंबी)
- सर्वोत्तम भूमिपुत्र गौतम बुद्ध (डॉ. आ.ह. साळुंखे)
- श्रीहर्ष (पारखीशास्त्री)
बंगाली भाषेतील ग्रंथ संपादन
- बुद्धदेव — प्रो. सतीशचंद्र विद्याभूषण
- बौद्धधर्म — सत्येंद्रनाग टागोर
इंग्रजी भाषेतील ग्रंथ संपादन
- द लाईट ऑफ एसिया — एडविन अर्नोल्ड, १८७९
- द गोस्पेल ऑफ बुद्ध — पॉल कॅरस, १८९४
- बुद्धिझम इन् ट्रान्सलेशन्स — हेन्री क्लर्क वॉरेन, १८९६
- सम सेइंग्ज ऑफ द बुद्ध — एफ.एल. वुडवर्ड, १९२५
- अ बुद्धिस्ट बायबल — ड्वाइट गोडार्ड, १९३२
- अर्ली बुद्धिस्ट स्क्रिप्चर्स — ई.जे. थॉमस, १९३५
- द वेदांतिक बुद्धिझम ऑफ द बुद्ध — जे.जी. जेनिंग, १९४७
- द टीचिंग्ज ऑफ द कम्पॅशनेट बुद्ध — इ. ए. बर्ट, १९५५
- द बुद्ध ॲन्ड हिज धम्म — बाबासाहेब आंबेडकर, १९५७
- गौतम द बुद्ध : हिज लाईफ ॲन्ड हिज टीचिंग्ज (विपक्षणा रिसर्च इन्सिट्यूट)
- बुद्धिझम ॲन्ड मॉडर्न थॉट्स — ई.जी. टेलर
- बुद्धिझम — ई.जे. मिल्स
- बुद्धिझम एथिक्स — डबल्यू.टी. स्टेस
- बुद्धिझम ऑफ विझडम ॲन्ड फेथ — थिच थेईन् ताम, १९९१
- व्हॉट द बुद्धा टॉट् — वालपोल राहुल, १९५९
- लिव्हिंग धम्म — व्हेनेरेबल अजान्ह चाह
- व्हॉट बुद्धिस्ट बिलीव्ह — व्हेन.के. श्री धम्मानंद, १९९३
- आउटलाईन्स ऑफ महायान बुद्धिझम — डी.टी. सुझुकी, २००५
- इसेन्स ऑफ बुद्धिझम - पी. लक्ष्मी नरसु, १९०७
बौद्ध प्रतीके संपादन
बौद्ध धर्माचे बुद्ध, धर्म, संघ या प्रमाणेच अन्य महत्त्वाची प्रतीके वा चिन्हे आहेत.
संप्रदाय संपादन
साचा:थेरवाद बौद्ध धर्म साचा:मुख्य
महायान, थेरवाद, वज्रयान, नवयान इत्यादी बौद्ध धर्माचे प्रमुख संप्रदाय किंवा पंथ आहेत. यांच्याशिवाय शेकडो बौद्ध संप्रदाय आजही अस्तित्वात आहेत.
लोकसंख्या संपादन
साचा:मुख्य संपूर्ण जगात जवळजवळ १.८ अब्ज (१८० कोटी) बौद्ध आहेत. यामध्ये साधारणपणे ७०% ते ७५% महायानी बौद्ध आणि उर्वरित २५% से ३०% थेरवादी, नवयानी (भारतीय) आणि वज्रयानी बौद्ध आहेत. महायान और थेरवाद (हीनयान), नवयान, वज्रयान यांच्या व्यतिरिक्त बौद्ध धर्मात यांचे अनेक उपसंप्रदाय किंवा उपपंथसुद्धा आहेत परंतु त्यांचा प्रभाव खूप कमी आहे. सर्वात जास्त बौद्ध पूर्व आशिया आणि आग्नेय आशियाच्या सर्व देशांत बहुसंख्याकांच्या रूपात राहतात. दक्षिण आशियाच्या दोन किंवा तीन देशांत सुद्धा बौद्ध धर्म बहुसंख्याक आहे. आशिया खंडाची जवळजवळ अर्ध्या पेक्षा अधिक लोकसंख्येवर बौद्ध धर्माचा सखोल प्रभाव आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका और युरोप सारख्या खंडांमध्ये सुद्धा कोट्यवधी बौद्धांचे समुदाय राहतात. जगात साधारणपणे १८ पेक्षा अधिक देश असे आहेत की, जिथे बौद्ध धर्म बहुसंख्याक किंवा बहुमतात आहे. जगात काही देश असेही आहेत की जिथे बौद्ध लोकसंख्येबद्दल कोणतीही विश्वसनीय माहिती उपलब्ध नाही.
| देश | बौद्ध लोकसंख्या | बौद्ध टक्केवारी |
|---|---|---|
| साचा:Flag | १,२२,५०,८७,००० | ९१%[८] |
| साचा:Flag | १२,३३,४५,००० | ९६%[९] |
| साचा:Flag | ७,४५,७८,००० | ८५%[१०][११] |
| साचा:Flag | ६,७९,८७,८९९ | ०६%[१२] |
| साचा:Flag | ६,४६,८७,००० | ९५% |
| साचा:Flag | ४,९९,९२,०००० | ९०% |
| साचा:Flag | २,४६,५६,००० | ५४% |
| साचा:Flag | २,२१,४५,००० | ९३%[१३] |
| साचा:Flag | १,७६,५६,००० | ७२% |
| साचा:Flag | १,६०,४५,६०० | ७५%[१४][१५] |
| साचा:Flag | १,४८,८०,००० | ९७% |
| साचा:Flag | ८०,८५,४०० | ०३% |
| साचा:Flag | ६५,८७,६०३ | ९३% |
| साचा:Flag | ६३,४७,२२० | २२% |
| साचा:Flag | ६२,२८,६९० | २१% |
| साचा:Flag | ६२,८७,६१० | ९८%[१६] |
| साचा:Flag | ६१,५९,९०० | ०२% |
| साचा:Flag | ३७,७५,६६६ | ६७% |
| साचा:Flag | ३०,५५,६९० | ९८% |
| साचा:Flag | २८,६७,५९५ | ०३% |
| साचा:Flag | २०,९६,६०८ | ०२% |
| साचा:Flag | २०,४६,८०० | ०१% |
| साचा:Flag | २१,४७,६०० | ०३% |
| साचा:Flag | ११,४५,६८० | ०१% |
| साचा:Flag | १०,५५,६०० | ०२% |
चित्रदालन संपादन
बुद्ध व बौद्ध धर्माविषयी विचारवंताची मते संपादन
बौद्ध धर्म व गौतम बुद्ध यांच्याविषयी जागतिक विचारवंत व जगप्रसिद्ध व्यक्तींची मते खाललप्रमाणे आहेत.
हे सुद्धा पहा संपादन
संदर्भ संपादन
बाह्य दुवे संपादन
साचा:बौद्ध विषय सूची साचा:गौतम बुद्ध
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:संकेतस्थळ स्रोत
- ↑ साचा:स्रोत बातमी
- ↑ साचा:Cite web
- ↑ साचा:Cite web
- ↑ व्हिएतनाम मध्ये बौद्ध धर्म
- ↑ व्हिएतनाम मध्ये बौद्ध धर्म
- ↑ २००१ च्या जनगणेतील बौद्ध लोकसंख्या ५%
- ↑ तैवान मधील धार्मिक लोकसंख्या
- ↑ बौद्ध धर्म आणि श्रीलंकन संस्कृती
- ↑ साचा:Cite web
- ↑ साचा:Cite web